Saturday, August 13, 2022
Home भारत Breaking News LIVE : जाणून घ्या दिवसभराच्या बातम्या एका क्लिकवर...

Breaking News LIVE : जाणून घ्या दिवसभराच्या बातम्या एका क्लिकवर…
राज्यात अनलॉकची नवी नियमावली जाहीर; सोमवार ते शनिवार दुकानं रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार
राज्य सरकारची अनलॉकसंबंधीची नवी नियमावली काल जारी करण्यात आली आहे. 25 जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये राज्यात वीकेंड लॉकडाऊनमध्ये दिलासा देण्यात आला आहे. परवा म्हणजे 4 ऑगस्टपासून ही नवी नियमावली लागू होणार आहे. नव्या नियमावलीनुसार राज्यात सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु राहणार आहेत.

राज्यातील अधिक रुग्ण संख्यांचा प्रमाण असलेल्या 11 जिल्ह्यांमध्ये लेवल 3 चे नियम कायम ठेवण्यात आले आहेत.  त्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, बीड, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार आहेत. मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात स्थानिक प्रशासन यावर ती निर्णय घेणार आहे. उर्वरित जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ ते दुपारी 3 वाजेपर्यंत दुकान उघडली जातील तर रविवारी पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील. रविवारी केवळ अत्यावश्यस सेवेची दुकानेच सुरु राहतील. वॉकिंग सायकलिंग आणि एक्ससाइजसाठी गार्डन्स मैदाने उघडे राहतील.

आज बारावीचा निकाल; आज दुपारी 4 वाजता जाहीर होणार
काही दिवसांपूर्वी बोर्डाकडून दहावीचा (SSC)चा निकाल जाहीर करण्यात आला होता. तेव्हापासूनच बारावीचा निकाल कधी लागणार? याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे. आता पालक आणि विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे यामुळे दहावी प्रमाणेच बारावीच्या निकालालाही यंदा जवळपास एक-दीड महिना उशीरा झाला आहे. आज दुपारी 4 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदा राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे निकषही ठरवले होते. अशातच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील बारावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. दहावीप्रमाणेच बारावीच्या विद्यार्थ्यांनाही अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारेच आज बारावीचा निकाल दुपारी 4 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होणार आहे.

राज्यात काल 4869  रुग्णांची नोंद, तर 8429 रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात काल 4,869 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 8 हजार 429 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 03 हजार 325 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.65 टक्के झाले आहे.

राज्यात काल कोरोनामुळे 90 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. तब्बल 38 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 75  हजार 303 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण सहा जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली आहेत. नंदूरबार (9), हिंगोली (64), अमरावती (82) वाशिम (89), गोंदिया (97), गडचिरोली (16)   या सहा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 476 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

नंदूरबार, हिंगोली, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक 762 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,83,52,467 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,15,063 (13.6 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,61,637 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,103 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Breaking #News #LIVE #जणन #घय #दवसभरचय #बतमय #एक #कलकवर

RELATED ARTICLES

24 वेळा पाहिला अनुष्काचा सिनेमा; तो सीन पाहून पेटवून घेतलं, तरुणाचा मृत्यू

या तरुणाने स्वतःवरच 20 लिटर पेट्रोल ओतून घेतलं आणि स्वतःलाच पेटवलं. या घटनेत तो गंभीररित्या भाजला. गंभीर अवस्थेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं,...

Track location: एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करता येते का? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

मुंबई: आजकाल असे बरेच अ‍ॅप्स आले आहेत. ज्यांच्या मदतीने आपण अगदी सहजपणे एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करू शकतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पूरस्थितीचा घेणार आढावा

CM Eknath Shinde : राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना...

Most Popular

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक

नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती ‘बीसीसीआय’चे...

प्रति सेनाभवन उभं राहणार? भाजपमध्ये खांदेपालाट, ग्रामपंचायत निवडणुका जाहीर

मुंबई, 13 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. शिंदेंचा गट वारंवार शिवसेना पक्षप्रमुख...

आंबट ढेकर, छातीत जळजळ, अपचन मुळापासून दूर करणारी टिप्स

Acid reflux home remedy :लठ्ठपणा, धुम्रपान, जास्त खाणे, कॅफिनचे जास्त सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव आणि काही औषधे ही स्थिती वाढवू शकतात. या समस्येवर...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

विश्वचषक फुटबॉल स्पर्धा २१ ऐवजी २० नोव्हेंबरपासून

एपी, जीनिव्हा : यजमान कतारला सलामीचा सामना खेळता यावा आणि त्यापूर्वी उद्घाटन सोहळय़ाचे आयोजन करता यावे, या हेतूने आगामी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला नियोजित...

स्टार प्रवाह गणेशोत्सव सोहळ्यात प्रेक्षकांना मिळणार अष्टविनायकाची माहिती

मुंबई, 12 ऑगस्ट : स्टार प्रवाह सध्या महाराष्ट्राची सर्वात लाडकी वाहिनी आहे. या वाहिनीवरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांची मन जिंकत आहेत.  टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या...