Friday, August 12, 2022
Home मुख्य बातम्या Break the Chainची नवी नियमावली; पुण्यासह या 11 जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध कायम

Break the Chainची नवी नियमावली; पुण्यासह या 11 जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध कायम


मुंबई, 2 ऑगस्ट : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती असल्यामुळे अद्यापही महाराष्ट्रात पूर्णत: लॉकडाऊन हटविण्यात आलेला नाही. दरम्यान 2 ऑगस्ट रोजी राज्य सरकारने ब्रेक द चेन (new rules of Break the Chain ) अंतर्गत नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीअंतर्गत राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध जैसे थे (Corona restrictions remain in place in these 11 districts including Pune) ठेवण्यात येणार असून इतर जिल्ह्यांना मात्र काही प्रमाणात शिथिलता अनुभवता येणार आहे. काही दिवसांपूर्वी केरळमध्ये कोरोनाची मोठी रुग्णसंख्या समोर आल्यानंतर इतर राज्यांना सावधान राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय यंदाही सण-उत्सव साजरा करताना निर्बंध असणार आहे.
या 11 जिल्ह्यांतील निर्बंध कायम
1 कोल्हापूर
2 सांगली
3 सातारा
4 पुणे
5 पालघर
6 सोलापूर
7 रत्नागिरीत
8 बीड
9 रायगड
10 अहमदनगर
11 सिंधूदूर्ग
हे ही वाचा-गणपती- दिवाळी यंदाही कोरोनाच्या सावटाखाली; ऑक्टोबरमध्ये असेल भयंकर स्थिती
इतर जिल्ह्यात मात्र काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे.
काय आहेत नवे नियम
– सोमवार ते शुक्रवारपर्यंत रात्री 8 वाजेपर्यंत सर्व दुकानं खुली ठेवण्यास परवानगी. शनिवार दुपारी ३ पर्यंत सर्व दुकाने खुली राहणार (माॅल्स ही खुले राहणार, पण रविवारी सर्व बंद)
– रविवारी फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने राहणार सुरू
– सर्व खासगी आणि शासकीय कार्यालयं ही संपूर्ण क्षमतेने खुली राहणार, पण गर्दीच्या ठिकाणी नियमावली पाळावे लागतील.
– सर्व उद्यानं- बगीचे खुले, याशिवाय मैदानातही खेळता येणार
– ब्युटी पार्लर, स्पा, हेअर सलून आदी दुकानं सोमवार ते शुक्रवार रात्री 8 पर्यंत खुली राहतील. 50 टक्के आसान क्षमतेने तसंच रविवारी पूर्ण बंद राहतील. तर शनिवारी दुपारी 3 पर्यत खुली राहतील
– जिमनॅशिअम, योगा क्लासेसदेखील वरील प्रमाणे खुली असतील
– सिनेमागृह, मस्टिप्लेक्स मात्र अद्याप बंदच राहतील.
– हाॅटेल्स दुपारी 4 पर्यंत 50 टक्क्यांनी खुली राहतील. विकेंडला मात्र बंद असून केवळ पार्सल सेवा सुरू राहतील.
– लोकल याबाबत कोणताच उलेलख नसल्याने लोकल सेवा बंद राहतील असं समोर आलं आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Break #Chainच #नव #नयमवल #पणयसह #य #जलहयत #करनच #नरबध #कयम

RELATED ARTICLES

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

आत्मचिंतन केलं असतं, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला!

Udayanraje Bhosale : प्रत्येकालाच सत्ता हवी असते, पण आत्मचिंतन केलं असत, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, असा...

Most Popular

अशी कोणती कागदपत्रं ट्रम्पकडे आहेत, ज्यामुळे FBI घरापर्यंत पोहचली; अमेरिका हादरली

Donald Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवासस्थानी FBIने टाकलेले छापे कशासाठी होते या संदर्भात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अस्वीकरण: ही...

Health Tips: डोळे अधिक सक्षम आणि दृष्टी वाढवण्यासाठी आहारात या 3 गोष्टींचा समावेश करा, चष्म्याचे नो टेन्शन !

Health Tips: डोळे हा आपल्या शरीराचा सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाचा भाग आहे. आपण फक्त आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. पण आजच्या काम करण्याचा सवईमुळे आणि...

जम्मू-काश्मीरमधील हत्येचं सत्र थांबेना; आणखी एका युवकाची गोळी झाडून हत्या

श्रीनगर 12 ऑगस्ट : जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी शुक्रवारी आणखी एका प्रवाशाची गोळ्या झाडून हत्या केली. मोहम्मद अमरेज असं 19 वर्षीय मृताचं नाव...

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी राहुलकडे नेतृत्व; ‘बीसीसीआय’च्या वैद्यकीय पथकाने तंदुरुस्त जाहीर केल्याने भारतीय संघात निवड

पीटीआय, नवी दिल्ली : अनुभवी फलंदाज केएल राहुलला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वैद्यकीय पथकाने गुरुवारी तंदुरुस्त जाहीर केल्यानंतर आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याची...

12th August 2022 Important Events : 12 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

12th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

दैनंदिन राशीभविष्य: धनु राशीसाठी आज सांभाळून राहण्याचा दिवस; तर कुंभ राशीला लाभ

आज दिनांक १२ऑगस्ट २०२२. वार शुक्रवार. पौर्णिमा समाप्ती सकाळी ७ .२३.आज चंद्र धनिष्ठा नक्षत्रात असेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष दिवस आनंद निर्माण करणारा...