ड्रायव्हर सीटमागे हँड होल्ड –
गाइडलाइन्सनुसार, बाईकच्या मागील सीटच्या दोन्ही बाजूला हँड होल्ड (Hand Hold) आवश्यक आहे. हँड होल्ड बाईकवर मागे बसलेल्या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी आहे. बाईक चालकाने अचानक ब्रेक मारल्यास अशा स्थितीत हँड होल्ड मदतशीर आहे. आतापर्यंत अनेक बाईकमध्ये ही सुविधा नव्हती. तसंच, बाईकच्या मागे बसणाऱ्यांसाठी दोन्ही बाजूने पाय ठेवण्यासाठी पायदान अनिवार्य करण्यात आलं आहे. शिवाय बाईकच्या मागील टायरच्या डाव्या बाजूचा कमीत-कमी अर्धा भाग सुरक्षितरित्या कव्हर असावा, जेणेकरुन मागे बसणाऱ्या व्यक्तीचे कपडे मागील टायरमध्ये अडकू नयेत.
VIDEO:एक-दोन नाही, तर तब्बल 100 चार्जरने चार्ज केला iPhone,पुढे नेमकं काय झालं..
कंटेनर –
बाईकला लहानसा कंटेनर लावण्याचेही निर्देश जारी करण्यात आले आहेत. या कंटेनरची लांबी 550 मिमी, रुंदी 510 मिली आणि उंची 500 मिमीहून अधिक नसावी. जर कंटेनर मागील सीटजवळ लावला, तर केवळ ड्रायव्हरलाच मंजुरी असेल. इतर कोणी बाईकवर बसू शकणार नाही. दुसरा व्यक्ती बाईकवर बसल्यास, ते नियमांचं उल्लंघन मानलं जाईल. जर कंटेनर मागील सीटच्या मागे लावला, तर दुसऱ्या व्यक्तीला बाईकवर बसण्याची परवानगी असेल.
PUC कडे लक्ष न देणं पडेल भारी, RC सस्पेंडसह भरावा लागेल दंड; जाणून घ्या नवा नियम
टायर –
सरकारने टायरबाबत नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. याअंतर्गत 3.5 टन वजनापर्यंतच्या वाहनांसाठी टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टमचा सल्ला देण्यात आला आहे. या सिस्टममध्ये सेंसरद्वारे ड्रायव्हरला माहिती मिळेल, की गाडीच्या टायरची स्थिती काय आहे. त्याशिवाय टायर दुरुस्ती किटचीही शिफारस केली आहे. हे लागू झाल्यानंतर गाडीमध्ये एक्स्ट्रा टायरची गरज लागणार नाही. सरकार वेळोवेळी रस्ते सुरक्षा नियमांत बदल करत असते. मागील काही वर्षात रस्ते सुरक्षा नियम कठोर करण्याबाबत जोर देण्यात आला आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Bike #वर #मग #बसणऱयसठ #सरकरच #नव #नयम #आत #अस #करव #लगणर #टवहलरवर #परवस