हायलाइट्स:
- अभिनेता कमाल आर खान सोशल मीडियावर नेहमीच असतो चर्चेत
- बिग बॉस ओटीटी स्पर्धक मूस जट्टानाबाबत केआरकेनं केलं आहे वादग्रस्त विधान
- केआरकेचं ट्वीट सोशल मीडियावर होतंय व्हायरल
खान कुटुंबाने सोडलं मौन, मुलाच्या नावावर दिलं स्पष्टीकरण
वूट अॅपवर नुकताच बिग बॉस ओटीटी शो सुरू झाला आहे. नेहमीप्रमाणेच या शोची चर्चा पहिल्याच दिवसापासून सोशल मीडियावर सुरू झाली आहे. अशात कमाल आर खाननं काही कमेंट केली नाही तर नवलच. पण त्यानं या शोमधील स्पर्धक मूस जट्टानाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
कमाल आर खान दरवर्षीच बिग बॉसवरून ट्वीट करताना दिसतो. हा शो सलमान खान होस्ट करत असल्यानं तो अनेकदा सलमानवर निशाना साधताना दिसतो. पण नुकत्याच केलेल्या ट्वीटमध्ये कमाल आर खाननं या वर्षी बिग बॉस पाहिलं नाही आणि पाहणारही नाही असं म्हटलं आहे. त्यानं लिहिलं, ‘यावर्षी बिग बॉस पाहण्याचा माझा अजिबात प्लॅन नाहीए. पण मला समजलं आहे की, या शोमध्ये मुस्कान म्हणजेच मूस जट्टाना नावाची एक मुलगी सहभागी झाली आहे. जी वेबसाइटवर न्यूड लाइव्ह स्ट्रीमिंग करते. जर शोमध्ये तिच्यासारखी मुलगी चालत असेल तर मग राज कुंद्रा तुरुंगात का आहे? मी पुन्हा सांगतो कायदा हा सर्वांसाठी समान असायला हवा.’
आईसोबत ठुमकत चालणाऱ्या जान्हवी कपूरची चर्चा, Video Viral
कमाल आर खाननं त्याच्या ट्वीटमध्ये मूस जट्टानाची तुलना राज कुंद्राशी केली आहे. कमाल आर खानचं हे वादग्रस्त ट्वीट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेक युजर्स केआरकेच्या या ट्वीटवर कमेंट करताना दिसत आहेत.
मूस जट्टाना ही केवळ २० वर्षांची आहे आणि ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. मुस्कान अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अनेकदा तिच्या बिनधास्त विधानांमुळे ती सोशल मीडियावर चर्चेत असते. ती महिल्यांच्या तसेच समलैंगिकतेच्या मुद्द्यावर आपली मतं बेधडकपणे मांडताना दिसते. पण ती सर्वाधिक चर्चेत तेव्हा आली होती जेव्हा तिनं न्यूड लाइव्ह सेशन केलं होतं. ज्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#Bigg #Boss #OTT #मस #जटटन #शमधय #तर #मग #रज #कदर #तरगत #क #कआरकच #वदगरसत #वधन