हायलाइट्स:
- प्रतीकने घरातील सर्व सदस्यांसोबत घेतला आहे पंगा
- प्रतीक मुद्दाम वाद उकरून काढत असल्याचं घरातल्यांचं म्हणणं
- बिग बॉसने दिलेल्या टास्कदरम्यान एकमेकांसोबत भांडले जीशान आणि प्रतीक
‘गुम है किसी के प्यार मे’ मध्ये रेखा यांची एण्ट्री? वाढली प्रेक्षकांची उत्सुकता
बिग बॉस कडून देण्यात आला होता टास्क
प्रतीक त्याच्या वागण्यामुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेताना दिसतोय. घरात आल्यापासून प्रतिकने इतर सदस्यांसोबत वाद घालायला सुरुवात केली होती. आता जीशान प्रतीकच्या निशाण्यावर आला. घरात मुलं आणि मुली मिळून १३ सदस्य आहेत. मुलींना घरात एण्ट्री तर मिळाली परंतु, त्यांचं सामान बिग बॉसने जप्त केलं आहे. ते सामान मुलींना परत मिळवून देण्यासाठी त्यांच्या पुरुष साथीदाराने त्यांना मदत करायची आहे. प्रत्येक पुरुष सदस्याला महिला सदस्याला सामान मिळवून देण्यासाठी बिग बॉसने दिलेला टास्क पूर्ण करावा लागणार होता आणि याच टास्क दरम्यान जीशान आणि प्रतीक एकमेकांना मारायला देखील तयार झाले होते.
एकमेकांवर केले आरोप
घरात झालेल्या वादानंतर बिग बॉसने जीशान आणि प्रतीक यांकडे विचारणा केली असता दोघांनीही एकमेकांवर आरोप केले. जिशानने बिग बॉसला सांगितल्याप्रमाणे, प्रतीक वारंवार त्याला मारामारी करण्यासाठी उद्युक्त करत होता. सतत जीशानच्या अंगाला हात लावत होता. त्याला राग येईल असं वागत होता. त्यामुळेच त्यांचं भांडण झालं. यानंतर जीशानने त्याचा माइक काढून बिग बॉसकडे मदत मागितली.
प्रतीकच्या वागण्याबद्दल तक्रार करत जीशानने बिग बॉसला कारवाई करण्याची मागणी केली. बिग बॉसने वारंवार आदेश दिल्यानंतर जीशानने त्याचा माइक पुन्हा घातला. तर दुसरीकडे शमिता, दिव्या आणि रिद्धिमा प्रतीकच्या वागण्याबद्दल आपापसात बोलताना दाखवल्या गेल्या. प्रतीक जाणूनबुजून असं वागत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
राज तुरुंगात, शिल्पा त्रासलेली; कुटुंबाला सोडून का गेली शमिता
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#Bigg #Boss #OTT #पहलयच #टसकमधय #परतक #आण #जशनमधय #जरदर #भडण #बग #बस #च #मधयसत