हायलाइट्स:
- बिग बॉस ओटीटी कार्यक्रमाला येत्या रविवारपासून सुरुवात
- करण जोहर करणार आहे बिग बॉस ओटीटी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
- बिग बॉस ओटीटीमध्ये हे कलाकार होणार सहभागी
हे कलाकार होणार सहभागी
बिग बॉस ओटीटीमध्ये १२ स्पर्धक १२ आठवड्यांसाठी सहभागी होणार आहेत. त्यांच्यात स्पर्धा होणार असून जो विजेता ठरेल त्याला ट्रॉफी मिळणार आहे. त्याचसोबत यामध्ये जे स्पर्धक टॉपला असतील त्यांना सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बॉस १५ या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. तर बिग बॉस ओटीटीमध्ये कोणकोण कलाकार सहभागी होणार आहेत ते जाणून घेऊ या.
बिग बॉस ओटीटीमध्ये नेहा भसीन ही एक स्पर्धक आहे. आता निर्मात्यांनी या कार्यक्रमाचे आणखी दोन टिझर प्रदर्शित करून आणखी दोन कलाकारांची नावे जाहीर केली आहेत. त्यामध्ये पहिला टिझर मध्ये एक हँडसम हंक दिसत आहे. त्याने बॉडी आणि मसल्स दिसत आहे. हा दुसरा तिसरा कुणी नसून करण नाथ आहे. करणने पागलपन आणि ये दिल आशिकाना मध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. आता तो बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी होणार आहे.
बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी होणारा दुसरा कलाकार आहे, अभिनेता जीनाश खान. जीनाशने ‘कुमकुम भाग्य’ मालिकेत काम केले होते. अलिकडेच जीनशने विमानात बाथरोब घालून एक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्याच्या या कपड्यांमुळे विमान कंपनीने त्याला आक्षेप घेतला होता. त्याने हे सगळे प्रकरण सोशल मीडियावर त्याने शेअर केले होते.

करण जोहर सूत्रसंचालन करत असलेल्या या कार्यक्रमात दिव्या अग्रवाल ही देखील सहभागी होणार आहे. दिव्या एस ऑफ स्पेस १ ची विजेती होती. याशिवाय या कार्यक्रमात रिद्धिमा पंडित, राकेश बापट देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या दोघांनी ‘बहू हमारी रजनीकांत’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती.
एमटीव्ही स्टार प्रतीक सहजपाल आणि पंच बीट २ अभिनेता उर्फी जावेद देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मानास्वी वशिष्ठ देखील या कार्यक्रमात सहभागी होणार होती परंतु अखेरच्या क्षणी तिला सहभागी होण्यापासून थांबवण्यात आले. कोरिओग्राफर निशांत भट्ट तिच्या जागी सहभागी होणार आहे. त्याचप्रमाणे भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह, गायक मिलिंद गाबा हे बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी होणार आहेत.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#Bigg #Boss #OTT #ठरल #ह #आहत #बग #बस #ओटटच #फयनल #सपरधक #इथ #पह #सपरण #यद