Monday, July 4, 2022
Home करमणूक Bigg Boss OTT: कोण आहे हा करण नाथ, 'ये दिल आशिकाना' हिट...

Bigg Boss OTT: कोण आहे हा करण नाथ, ‘ये दिल आशिकाना’ हिट सिनेमानंतर झाला गायब


हायलाइट्स:

  • बिग बॉस ओटीटीमध्ये अभिनेता करण नाथ स्पर्धक म्हणून सहभागी
  • माधुरी दिक्षीतचे मॅनेजर राकेश नाथ यांचा मुलगा करण
  • ‘ये दिल आशिकाना’ सिनेमात नायकाची भूमिका साकारली होती

मुंबई : बिग बॉस १५ व्या सिझनला रविवारपासून सुरुवात झाली आहे. सुरुवातीला हा कार्यक्रम वूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रसारित होत आहे. त्यानंतर सहा आठवड्यांनी हा कार्यक्रम टीव्हीवरून दाखवला जाईल. दरम्यान, ओटीटीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण जोहर करत आहे. हा कार्यक्रमाचा सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता ओटीटीवरून प्रसारित केला जाईल. त्यानंतर तो भाग प्रेक्षकांना कधीही वूट अॅपवर पाहता येणार आहे. तर दर रविवारी ८ वाजता एलिमिनेशनचा भाग प्रसारित होईल, त्यावेळी करण जोहर उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात राकेश बापट, जीशान खान, मिलिंद गाबा, निशांत भट्ट, प्रतीक सहजपाल, करण नाथ, शमिता शेट्टी, उर्फी जावेद, नेहा भसीन, मूस जटाना, अक्षरा सिंह, दिव्या अग्रवाल आणि रिद्धिमा पंडित सहभागी झाले आहेत.

कोण आहे करण नाथ?करण नाथने २००२ मध्ये आलेल्या ‘ये दिल आशिकाना’ या सिनेमामध्ये नायकाची भूमिका साकारली होती. त्याचा हा पहिला सिनेमा होता आणि तो सुपरहिट ठरला होता. परंतु त्यानंतर करण नाथचा कोणताही सिनेमा फार चालला नाही. ‘ये दिल आशिकाना’ या सिनेमाचे ‘उठा ले जाऊंगा’ आणि ‘ये दिल आशिकाना’ ही दोन गाणी खूपच लोकप्रिय झाली होती. करण नाथ माधुरी दीक्षितचे मॅनेजर राकेश नाथ यांचा मुलगा आहे.


अपयशी अभिनेता असा शिक्का

‘ये दिल आशिकाना’ हा सिनेमा लोकप्रिय झाल्यानंतर करण नाथ याचे अभिनय करिअर फारसे यशस्वी ठरले नाही. या सिनेमानंतर त्याचे आलेले बहुतांश सर्व सिनेमे अपयशी ठरले आणि त्याच्यावरही फ्लॉप अभिनेता असा शिक्का बसला. करणने ‘पागलपन’ पासून ‘एलओसी कारगिल’, ‘तुम’, ‘तेरा क्या होगा जॉनी’ यांसारख्या सिनेमात काम केले होते. परंतु हे सिनेमे अयशस्वी ठरले. त्यानंतर करण सिनेसृष्टीतून गायबच झाला.


डिप्रेशनचा जडला आजार

सातत्याने सिनेमे अपयशी ठरत गेल्याने करण नाथ डिप्रेशनमध्ये गेला. या गोष्टीचा खुलासा करणने २००३ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये केला होता. त्याचा ‘पागलपन’ हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा तो हिट होईल, अशी त्याची अपेक्षा होता. परंतु हा सिनेमा दणकून आपटला. यात करणने साकारलेल्या भूमिकेवर लोकांनी कडाडून टीका केली. या सगळ्यामुळे करण नाथ डिप्रेशनमध्ये गेला. त्यानंतर त्याने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला.

जवळपास आठ वर्षे करण बेरोजगार होता त्याच्याकडे एकही सिनेमा नव्हता. त्यानंतर दहा वर्षांनी करणने अभिनयाच्या क्षेत्रात पुनरागमन केले ते २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गन्स ऑफ बनारस’ या सिनेमातून. हा सिनेमा अनेक कारणांनी खास होता. हा सिनेमा २००७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या तमिळ सिनेमाचा रिमेक होता. हा सिनेमा शेखर सुरीने दिग्दर्शित केला होता. त्या सिनेमात करणसोबत नतिलाया कौर ही अभिनेत्री होती.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Bigg #Boss #OTT #कण #आह #ह #करण #नथ #य #दल #आशकन #हट #सनमनतर #झल #गयब

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

64MP कॅमेरा असलेला हा सॅमसंग फोन आजसाठी फक्त 10 हजारांत उपलब्ध; वाचा स्पेशल ऑफर

Amazone Deal : जर तुम्ही स्वस्त फोनची डील शोधत असाल तर Amazon वर Samsung Galaxy M32 नक्की पहा....

व्हिप झुगारून 39 आमदारांचे मतदान म्हणजे लोकशाहीची पायमल्ली; सुनील प्रभूंचा घणाघात

Maharashtra Politics : व्हिप झुगारून 39 आमदारांनी केलेले मतदान म्हणजे लोकशाहीची पायमल्ली केली असल्याचा घणाघात शिवसेनेचे प्रतोद सुनील...

वयाच्या 37 व्या वर्षी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, हनीमूनचे खासगी फोटो व्हायरल

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या हनीमूनचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल    अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, 4 जुलैपासून कोकणासह विदर्भात मुसळधार

Maharashtra Rains : सध्या राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात...

विधानसभा अधिवेशन: सत्ताधाऱ्यांची टोलेबाजी अन् विरोधकांचे चिमटे; आजच्या दिवसातील 10 मुद्दे

Maharashtra Assembly Session Highlights : राज्यपालांनी बोलावलेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक कुरघोडी झाली....