हायलाइट्स:
- बिग बॉस ओटीटी सुरू होताच घरातील सदस्यांमध्ये वादाला सुरुवात
- प्रतीक- दिव्या यांच्यातील वादानंतर अक्षरा-मूस यांच्याही भांडण
- मूस जट्टानं भोजपुरीवर केलेल्या कमेंटमुळे अक्षरा सिंहला कोसळलं रडू
अक्षरा सिंहनं मूस जट्टानाला मिलिंद गाबा कुठे आहे असं विचारत त्याला बोलवण्यास सांगितलं. ज्यावर उत्तर देताना मूसनं असं काही म्हटलं ज्यामुळे अक्षराला दुःख झालं आणि ती घरातील सदस्यांशी ही गोष्ट शेअर करून रडू लागली. अक्षरा सिंहनं नेहा भसीन, मिलिंद गाबा आणि अन्य सदस्यांना सांगितलं की, आता ती मूसपासून शक्य तेवढं दूरच राहणार आहे. ती म्हणाली, ‘मी जेव्हा मूसला विचारलं की गाबा कुठे आहे तेव्हा तिनं आपल्या पार्श्वभागाकडे इशारा करत इथे आहे असं म्हटलं. तिनं हे खूप वाईट प्रकारे सांगितलं.’
अक्षरा पुढे म्हणाली, ‘कालही मी तिच्यापासून दूर दूर राहत होते. कारण तिनं भोजपुरीवरून कमेंट केली होती. ज्यामुळे मला दुःख झालं होतं. ती मला म्हणाली, ‘तू ते भोजपुरी गाणं वैगरे गातेस ना…’ चांगलं नाही वाटत यार. मी भोजपुरी गाऊ किंवा अजून काही. माझं ते प्रोफेशन आहे. माझं घर त्यावरच चालतं.’
अक्षरा आणि घरातील सदस्यांचं हे बोलणं सुरू असतानाच मूस त्या ठिकाणी येते आणि असं काहीच झालेलं नाही आणि जे झालं ते केवळ मस्करी होती असं सांगते. पण तरीही मिलिंद गाबा तिला वॉर्निंग देतो आणि तिला मर्यादेत राहण्यास सांगतो. त्यावर मूस त्याला तिनं जे काही बोलली ते सेक्युअल किंवा कोणाचाही अपमान करण्यासारखं काहीच नव्हतं असं सांगते.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#Bigg #Boss #मस #जटटनन #उडवल #भजपरच #खलल #य #कमटवर #ढसढस #रडल #अकषर #सह