राज्य निवडणुकीच्या अवघ्या वर्षभरापूर्वी देब यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शनिवारी साहा यांना भाजप विधिमंडळ पक्षाचे नेतेपद देण्यात आले. साहा हे शिक्षणाने डॉक्टर असून ते दंतचिकित्सक आहेत. ते त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही (Tripura Cricket Association) आहेत. मुख्य प्रवाहातील राजकारणात येण्यापूर्वी साहा हापानिया येथील त्रिपुरा मेडिकल कॉलेजमध्ये शिकवत असत. त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला त्रिपुरातून राज्यसभेची एकमेव जागा जिंकली होती.
हे वाचा – LeT च्या दहशतवाद्याला अटक; सुरक्षा दल, VIP वर हल्ला करण्याचा आखत होता कट
मागील काही वर्षांत देशभरात भाजप आणि पंतप्रधान मोदींची लाट असल्याची चर्चा आहे. यामध्ये अनेक बडे काँग्रेस नेते भाजपवासी झाले आहेत. भाजपकडूनही त्यांना अनेक चांगल्या संधी मिळत आहेत. ईशान्येकडील राज्यांपैकी आसाममध्येही सध्या भाजपची सत्ता असून मुख्यमंत्री हिमांता बिस्वा शर्मा (Himanta Biswa Sarma) हेही आधी काँग्रेसचे नेते होते. त्यांनी 2015 मध्ये भाजपप्रवेश केला. याशिवाय, देशभरात अनेक काँग्रेस नेते भाजपमध्ये गेले आहे. मध्य प्रदेशातले काँग्रेसचे ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनीही 2020 मध्ये भाजपप्रवेश केला होता. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या जवळचे मानले जाणारे तृणमूल काँग्रेसचे सुवेंदु अधिकारी (Suvendu Adhikari) 2021 मध्ये भाजपमध्ये गेले. काँग्रेससह देशभरात इतरही राजकीय पक्षांना गळती लागली असून महत्त्वाचे नेते भाजपमध्ये जात आहेत.
हे वाचा – तरुणीवर अॅसिड हल्ला करून पोलिसांपासून बचावासाठी बनला साधू, अशी झाली पोलखोल
देब यांच्या राजीनाम्यामुळे साहा यांना मुख्यमंत्रीपद मिळून ते प्रकाशझोतात आले आहेत. ज्यांनी त्रिपुरामधील 25 वर्षांची कम्युनिस्ट राजवट संपवून 2018 मध्ये भाजपला जबरदस्त विजय मिळवून दिला होता. साहा यांनी बिप्लब कुमार देब यांची जागा घेतली आहे. आता साहा यांच्यासमोर 2023 च्या निवडणुकीत पक्षाचं नेतृत्व करण्याची कठीण कामगिरी असणार आहे.
Published by:Digital Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Big #News #कगरसमधन #भजपमधय #आललय #डकटरचमखयमतरपद #वरण