
आयपीएलच्या नियमात झाला बदल
आयपीएल 2021 (IPL 2021) च्या उरलेल्या मोसमाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. युएईच्या (UAE) दुबई, शारजाह आणि अबुधाबीमध्ये हे उरलेले 31 सामने खेळवले जातील. आता युएईमधल्या आयपीएलसाठी बीसीसीआय (BCCI) कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. याच कारणामुळे आयपीएलच्या नियमातही बदल करण्यात आला आहे.
मुंबई, 9 ऑगस्ट : आयपीएल 2021 (IPL 2021) च्या उरलेल्या मोसमाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. युएईच्या (UAE) दुबई, शारजाह आणि अबुधाबीमध्ये हे उरलेले 31 सामने खेळवले जातील. 4 मे रोजी कोरोना रुग्ण आढळल्यामुळे आयपीएल 29 मॅचनंतर स्थगित करण्यात आली होती. आता युएईमधल्या आयपीएलसाठी बीसीसीआय (BCCI) कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. याच कारणामुळे आयपीएलच्या नियमातही बदल करण्यात आला आहे.
इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार जर बॉल स्टॅण्डमध्ये गेला, तर तो बॉल पुन्हा खेळण्यासाठी वापरला जाणार नाही, त्याऐवजी दुसरी बॉल घेऊन मॅचला सुरुवात होईल. कोरोना प्रोटोकॉलसाठी (Corona Protocol) हा नियम करण्यात आला आहे. स्टॅण्डमध्ये गेलेल्या बॉलला सॅनिटाईज करून लायब्ररीमध्ये ठेवलं जाईल. मागच्यावेळी आयपीएलदरम्यान स्टॅण्डमध्ये कोणीही सामना बघायला नव्हतं, त्यामुळे बॉल सॅनिटाईज करून पुन्हा वापरला जायचा.
यावेळी युएईमध्ये मॅच बघण्यासाठी प्रेक्षक येऊ शकतात, या कारणामुळे बीसीसीआयने सुरक्षेसाठी हा नियम केला आहे. आयपीएलशिवाय टी-20 वर्ल्ड कपसाठीही चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाईल, असं युएई बोर्डाने आधीच स्पष्ट केलं आहे. यासाठी युएई क्रिकेट बोर्ड बीसीसीआय आणि आयसीसीसोबत चर्चा करत आहे. टी-20 वर्ल्ड कपला 17 ऑक्टोबरपासून युएईमध्ये सुरुवात होणार आहे.
आयपीएलच्या या मोसमाचं दुसरं सत्र 19 सप्टेंबरपासून 15 ऑक्टोबरपर्यंत होणार आहे. या 31 मॅचपैकी 13 मॅच दुबईमध्ये, 10 मॅच शारजाहमध्ये आणि 8 मॅच युएईमध्ये खेळवल्या जातील. दुपारच्या मॅच भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता आणि संध्याकाळच्या मॅच 7.30 वाजता सुरू होतील. कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचा 2020 सालचा मोसमही युएईमध्येच खेळवला गेला होता. त्यावेळी मुंबई इंडियन्सने रेकॉर्ड पाचव्यांदा ट्रॉफी जिंकली होती. आयपीएलच्या या मोसमात दिल्लीची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#BCCI #ल #करनच #धसत #IPL #मचचय #नयममधय #मठ #बदल