Saturday, July 2, 2022
Home भारत balu dhanorkar : चंद्रपूरच्या काँग्रेस खासदारांमुळे लोकसभेत हशा पिकला; आधी नाही, मग...

balu dhanorkar : चंद्रपूरच्या काँग्रेस खासदारांमुळे लोकसभेत हशा पिकला; आधी नाही, मग हो म्हणाले


नवी दिल्लीः लोकसभेत आज १२७ व्या घटनादुरुस्ती विधेयकार चर्चा करण्यात आली. या चर्चेत महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनीही हिरीरीने आपलं मत मांडलं. पण यावेळी त्यांनी घटनादुरुस्ती विधेयकाला समर्थन देण्याऐवजी आपला विरोध असल्याचं म्हटलं. मात्र लोकसभेतील तालिका अध्यक्षांनी पुन्हा विचारल्यावर धानोरकर यांनी आपला पाठिंबा असल्याचं म्हटलं. यावरून सभागृहात हस्याची कारंजी उडाली.

काय झालं नेमकं?

लोकसभेत आज १२७ वी घटनादुरुस्ती विधेयक सरकारकडून मांडण्यात आलं. यावर चर्चेला सुरुवात करताना लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी या घटनादुरुस्ती विधेयकाला पक्षाचा पाठिंबा असल्याचं सांगितलं. यानंतर एक-एक करून इतर खासदारांनीही आपली मतं मांडली. मग महाराष्ट्रातील चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनीही मत मांडलं.

supriya sule : ‘आरक्षणावर महाराष्ट्रातून दिशाभूल केली जातेय’, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर निशाणा

बाळूभाऊ धानोरकर यांनी इंदिरा सहानी खटल्यात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयापासून ते महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द करण्यापर्यंत इतिहास वाचून दाखवला. तसंच महाराष्ट्रात कुठल्या समाजाला किती टक्के आरक्षण देण्यात आले आहे, हे ही धानोरकर यांनी सांगितलं. यासोबतच त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवरही टीका केली. विविध धर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचे काम या केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. आता हे सरकार जाती-जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम हे सरकार करत आहे. यामुळे मी या विधेयकाचा विरोध करतो, असं धनोरकर म्हणाले. यानंतर तालिका अध्यक्ष असलेल्या एन. के. रामचंद्रन यांनी धानोरकर यांना पुन्हा प्रश्न केला. तुम्ही विधेयकाला समर्थन देता की त्याच्या विरोधात आहात? असं तालिका अध्यक्षांनी विचारलं. यावर बाळूभाऊ धानोरकर यांनी आपण विधेयकाला समर्थन करतो, असं उत्तर देताच लोकसभेत हस्याची कारंजी उडली.

maratha reservation : ‘आरक्षणासाठी समाजा-समाजाने रस्त्यावर उतरून एकमेकांची डोकी फोडायची का?’अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#balu #dhanorkar #चदरपरचय #कगरस #खसदरमळ #लकसभत #हश #पकल #आध #नह #मग #ह #महणल

RELATED ARTICLES

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंकडून व्हीप जारी, बंडखोर काय करणार?

मुंबंई, 2 जुलै : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेनेतील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील मुख्य...

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा!

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Most Popular

डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स : नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानी

पीटीआय, स्टॉकहोम : ऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने प्रतिष्ठेच्या डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्समध्ये गुरुवारी ८९.९४ मीटर अंतरासह स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत दुसरे स्थान...

‘पुढच्या जन्मी प्रार्थना फक्त माझीच’ नवऱ्यासाठी लिहिलेल्या खास पोस्टवर फॅनची भलतीच प्रार्थना!

मुंबई 2 जुलै: प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) ही अभिनेत्री सध्या बरीच प्रसिद्ध होताना दिसत आहे. प्रार्थना सध्या छोट्या पडद्यावर एका चांगल्या भूमिकेत दिसत...

Benefits Banana: केळी खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीय? जाणून घेतल्यावर आजच सुरु कराल खाणं

जर तुम्ही याचा आहारात समावेश केलात तर तुम्हाला आश्चर्यकारक फायदे मिळतील.याचे एक नाही तर अनेक मोठे फायदे आहेत. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...

पावसाळ्यात साखरेला ओलाव्यापासून वाचवण्यासाठी वापरा या टीप्स

मुंबई, 02 जुलै : पावसाळा (Rainy Season) खूप आनंद घेऊन येणारा ऋतू असतो. अनेकांना हवाहवासा वाटणारा हा पावसाळा काही गोष्टींमुळे त्रासदायक देखील ठरतो. पावसाळ्यात स्वयंपाकघरात ठेवलेले...

मानव विरहित विमानाचं यशस्वी उड्डाण, संरक्षण मंत्र्यांनी केलं  DRDO चे अभिनंद

Unmanned Fighter Aircraft : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेला (DRDO) मानव विरहीत विमान विकसीत करण्यात यश मिळालं आहे....

Goregaon Aarey Colony : आरे कारशेड परिसरात पोलीस बंदोबस्त, कारशेडविरोधात उद्या आंदोलनाची हाक

<p>Goregaon Aarey Colony : आरे कारशेड परिसरात पोलीस बंदोबस्त, कारशेडविरोधात उद्या आंदोलनाची हाक</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...