Saturday, July 2, 2022
Home लाईफस्टाईल Anti Aging Skin : वाढत्या वयामुळे दिवसेंदिवस हरवत आहे चेह-यावरील ग्लो? मग...

Anti Aging Skin : वाढत्या वयामुळे दिवसेंदिवस हरवत आहे चेह-यावरील ग्लो? मग ‘या’ उपायांच्या मदतीने रोखू शकता वाढतं वय व दिसू शकता तरुण!


जस जसे वय वाढत जाते तस तसा चेहऱ्यावरचा ग्लो कमी होत जातो हे आपण सर्वजण जाणतो. अर्थात ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. जर तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेतली नाही तर साहजिकच हा परिणाम दिसून येणार. पण आपल्या प्रत्येकालाच आपली त्वचा नेहमी सुंदर दिसावी, कितीही वय वाढले तरी आपण सुंदरच दिसावे, आपली त्वचा सदा तरुण व आकर्षक राहावी अशी तीव्र इच्छा असते. पण यासाठी नेमके करायचे काय हे अनेक लोकांना ठावूकच नसते.

तुम्ही सुद्धा असे उपाय शोधत असाल आणि अजूनही तुम्हाला प्रभावी उपाय मिळाले नसतील तर काळजी करू नका. आज तुमचा तो शोध इथे संपतो आहे. चला तर जाणून घेऊया आज असे काही रामबाण आणि प्रभावी उपाय जे वाढत्या वयासोबत तुमच्या त्वचेचा ग्लो सुद्धा टिकवून ठेवतील.

मसाज करत राहा

आपल्या चेहऱ्याला तुम्ही वेळोवेळी मसाज देत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मसाज केल्याने तुमच्या चेहऱ्याचे स्नायू मजबूत होतात. रक्ताचा प्रवाह वेगाने आणि चांगल्या पद्धतीने होतो. यामुळे कॉलेजन प्रोडक्शन वाढण्यास सुद्धा मदत होते. याशिवाय चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या सुद्धा यामुळे कमी होतात. म्हणून तुम्ही न चुकता ठराविक वेळेने आपल्या चेहऱ्याला मसाज द्यायला हवा. यासाठी तुम्ही ब्युटी पार्लर मध्ये जाऊ शकता किंवा घरच्या घरी सुद्धा चेहऱ्याला मसाज करू शकता.

(वाचा :- Skin Care Tips : मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा 10 ते 15 वर्षांनी दिसाल लहान व तरुण, सुरकुत्या व पिंपल्सही होतील दूर!)

फेस मास्कचा वापर

वाढत्या वयात त्वचेची काळजी घ्यायची असेल तर फेस मास्कचा वापर करणे महत्त्वाचे आहे. यामुळे तुमची त्वचा मॉइस्चराइज होईल. त्वचेवरील सुरकुत्या कमी होतील. जास्तीचे थेरपेटिक चेहऱ्याला मिळेल, चेहरा अधिक जास्त सॉफ्ट होईल आणि मुख्य म्हणजे त्वचा हेल्दी होईल आणि हीच हेल्दी त्वचा तुमच्या वाढत्या वयात सुद्धा तुमची त्वचा तरुण राखेल. त्वचेला अगदी आतून पोषण मिळेल. सर्वात फायद्याची गोष्ट म्हणजे त्वचा जर हेल्दी आणि चांगली राखायची असेल तर ती हायड्रेटेड असणे गरजेचे आहे. फेस मास्क तुमची त्वचा हायड्रेटेड राखण्यास मदत करतो.

(वाचा :- पंजाबच्या या हॉट-बोल्ड अभिनेत्रीला पाहून भले भले झाले कन्फ्युज, फोटोज बघून तोंडून निघालं ‘ओ तेरी! ही तर कतरीना कैफ’)

त्वचा साफ करत राहा

तुम्ही रोज तुमचा चेहरा वेळोवेळी धुतला पाहिजे. आपल्या त्वचेला हलक्या पद्धतीच्या क्लींजरने साफ करण्याची सवय लावा. यामुळे तुमची त्वचा अतिशय योग्य पद्धतीने साफ होईल. तुमच्या चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर होईल. त्वचेमधील आर्द्रता टिकून राहण्यास विशेष मदत होईल. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्वचेतील पीएच लेव्हल संतुलित राहिली पाहिजे आणि ते काम तुम्ही रोज त्वचा धूत राहिल्याने होईल. त्यामुळे न चुकता दररोज त्वचा साफ करा.

(वाचा :- Stop Hair Fall : करीनाच्या डाएटिशियनने सांगितले केसगळती रोखण्याचे रामबाण उपाय, लागेल कायमचा फुलस्टॉप फक्त भरभरून करा ‘या’ 3 गोष्टी!)

अँटी एजिंग नाईट क्रीम

अनेक तरुणी अँटी एजिंग नाईट क्रीमचा वापर करणे टाळतात, त्यांना वाटते यामुळे दुष्परिणाम होतील. पण असे काही होत नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा अँटी एजिंग नाईट क्रीमचा वापर केला पाहिजे. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते आणि सोबत हाइपरपिग्मेंटेशन कमी करण्यास देखील मदत मिळते. याशिवाय या क्रीमच्या वापराने तुमच्या त्वचेची टोन ब्राईट होते, काळे डाग कमी होतात आणि त्वचेवरील ग्लो परत येतो. कोणती अँटी एजिंग नाईट क्रीम वापरावी याचा सल्ला तुम्ही तज्ज्ञ वा जाणकारांकडून घेऊ शकता. आपल्या त्वचेसाठी योग्य असणारीच अँटी एजिंग नाईट क्रीम वापरा.

(वाचा :- Isha Ambani Glamorous Looks : ईशा अंबानीने केली भावाच्या लग्नात ग्लॅमरस अंदाजात एंट्री, रूप असं की नवरी सोडून ईशावरच खिळल्या सर्वांच्या नजरा!)

भरपूर पाणी प्या

आज अगदी पन्नाशी मध्ये गेलेल्या पण दिसायला तिशीतल्या वाटणाऱ्या अभिनेत्रींच्या सौंदर्याचे रहस्य अगदी साधे सोपे आहे. या सर्व अभिनेत्री दिवसाला भरपूर पाणी पितात. त्वचेचा ग्लो वाढवण्यात पाणी महत्त्वपूर्ण योगदान देते. म्हणून तुम्ही दिवसाला 8 ते 10 ग्लास पाणी अवश्य प्यायला हवे. जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर निघून जातात आणि शरीर एकप्रकारे स्वच्छ होते. यामुळे त्वचेचा जो नैसर्गिक ग्लो आहे तो त्वचेवर खुलू लागतो. तुमची हेल्थ आणि ग्लो थेट स्कीन वर रिफ्लेक्ट होण्यास सुरुवात होते. तर मैत्रीणींनो नक्की हे उपाय वापरायला सुरुवात करा म्हणजे तुमची त्वचा देखील वाढत्या वयासोबत अधिक खुलू लागेल.

(वाचा :- Genelia Dsouza Deshmukh : महाराष्ट्राच्या या सुप्रसिद्ध सुनबाईने समजली बदलत्या जनरेशनची टेस्ट, सिल्वर स्क्रिनवर दाखवलेल्या अदांनी चाहते घायाळ!)अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Anti #Aging #Skin #वढतय #वयमळ #दवसदवस #हरवत #आह #चहयवरल #गल #मग #य #उपयचय #मदतन #रख #शकत #वढत #वय #व #दस #शकत #तरण

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

श्रीलंकेला लोळवत टीम इंडियाला दिला धक्का; ऑस्ट्रेलियाने घेतली निर्णायक आघाडी

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१-२३ चा अंतिम सामना कोणत्या दोन संघांमध्ये खेळला जाईल हे नंतर ठरवले जाईल, पण ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्ध १० विकेट्सने मिळवलेल्या...

लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये विश्वास टिकवूणं सर्वात महत्त्वाचं, या टिप्स ठरतील..

लाँग डिस्टन्स रिलेशनशिप (Long Distance Relationship) म्हणजे तुम्ही काय समजता? लाँग डिस्टन्स रिलेशनशिप म्हणजे फक्त एकमेकांना वेळ देणे किंवा एकत्र वेळ घालवणे नव्हे...

National Doctors’ Day : डॉक्टरांच्या जीवनाची ‘ही’ 4 चक्रे माहित आहेत का? तुमच्या विचारांच्या पलीकडील जग..!

भारत 1 जुलै हा 'नॅशनल डॉक्टर्स डे' (national doctors day) किंवा राष्ट्रीय डॉक्टर्स डे म्हणून साजरा करतो आणि दरवर्षी इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)...

अभिनेत्री प्रियांकाला कशाची कमी, आता का विकतेय भांडी?

लेकीच्या जन्मानंतर काय काय करतेय देसी गर्ल, चाहत्यांनाही पडलाय प्रश्न; आधी जेवण आता भांडी पुढे काय अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

VIDEO: नीरज चोप्राची नवी भरारी, स्वत:चाच रेकॉर्ड तोडला

नवी दिल्ली, 01 जुलै : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा स्टार अॅथलीट नीरज चोप्राने नव-नवीन विक्रमांची नोंद करणे सुरूच...

‘या’ ठिकाणी सापडलाय दुतोंडी दुर्मिळ साप,फोटो पाहून थक्क व्हालं

असा दुतोंडी दुर्मिळ साप तुम्ही पाहिलाच नसेल,फोटो एकदा पाहाच अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...