Saturday, November 27, 2021
Home भारत anil deshmukh : ठाकरे सरकारला झटका; अनिल देशमुखांप्रकरणी सुप्रीम कोर्टाने अपील फेटाळले

anil deshmukh : ठाकरे सरकारला झटका; अनिल देशमुखांप्रकरणी सुप्रीम कोर्टाने अपील फेटाळले


नवी दिल्लीः माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुखांवर राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नेमणुका यातील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी सीबीआय एफआयआरमधील संबंधित दोन परिच्छेद वगळण्याची विनंती सुप्रीम कोर्टानेही बुधवारी स्पष्टपणे फेटाळून लावली. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे.

अनिल देशमुखांवर झालेल्या आरोपांप्रकरणी सीबीआयला सर्वबाजूंनी चौकशी करू द्या. सीबीआय चौकशीवर मर्यादा आणता येणार नाही. असं केल्यास राज्यघटनेने स्थापन केलेल्या कोर्टाचे अधिकार नाकारल्या सारखं होईल, असं सुप्रीम कोर्टाच्या पीठाने याचिका फेटाळत नमुद केलं.

सुप्रीम कोर्टात वकील राहुल चिटणीस यांनी महाराष्ट्र सरकारची बाजू मांडली. महाराष्ट्र सरकारने सीबीआय चौकशीला दिलेली संमती मागे घेतली आहे. तसंच हायकोर्टाने दिलेले आदेश आणि सीबीआय चौकशी ही बार आणि रेस्टॉरंटकडून खंडणी घेण्याच्या आरोपांपुरतेच मर्यादित होते, असा युक्तिवाद राहुल चिटणीस यांनी कोर्टात केला. यावर सुप्रीम कोर्टाने कडक शब्दात महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले. आपल्या गृहमंत्र्यांविरोधातील चौकशीला कुठलं सरकार संमती देईल का? असा सवाल यावेळी न्यायमूर्ती एम. आर. शहा यांनी केला.

cji on media reports : ‘व्यथित झालो’, सरन्यायाधीश रमना यांची माध्यमांच्या वृत्तांकनावर तीव्र ना

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांविषयी सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमधील दोन परिच्छेदांना राज्य सरकारने आक्षेप घेतला होता. ‘राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नेमणुका यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी सीबीआय करू पाहत आहे. मुंबई हायकोर्टाचा मूळ आदेश हा अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यापुरता मर्यादित आहे. परंतु सीबीआय त्यापुढे जाऊन आपल्या अधिकारक्षेत्राबाहेर तपास करू पाहत आहे. पूर्वी राज्य सरकारने महाराष्ट्रातील कोणत्याही प्रकरणाविषयी तपास करण्यासाठी सीबीआयला दिलेली सरसकट संमती मागे घेण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या पूर्वसंमतीविना सीबीआय राज्य सरकारच्या कारभारात हस्तक्षेप करणारा असा तपास करू शकत नाही’, असा युक्तिवाद मांडत राज्य सरकारने यापूर्वी मुंबई हायकोर्टात याचिका केली होती. मात्र, न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाने सुनावणीअंती २२ जुलै रोजी ती फेटाळली होती. त्यानंतर राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात हे अपिल केले होते.

supreme court : ‘पेगाससद्वारे फोनमध्ये हेरगिरी केली का?’ सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीसअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#anil #deshmukh #ठकर #सरकरल #झटक #अनल #दशमखपरकरण #सपरम #करटन #अपल #फटळल

RELATED ARTICLES

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

अमिताभ बच्चन ‘वाईट व्यक्ती’ करीनाचा समज, बिग बींनी पाय धुतल्यानंतर बदललं मत

असं काय झालं की चक्क बिग बींना करीनाचे पाय धुवावे लागले, त्यानंतर करीनाचं बदललं मत    अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

Most Popular

नवीन कोरोना व्हायरस ‘चिंतेचा’, WHOनं दिलं ‘हे’ नाव, धोका अधिक!

Omicron B.1.1.529 : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नवीन कोरोनाव्हायरस व्हेरिएंट अतिशय "चिंतेचा" ( concern) असल्याचे घोषित केले आहे....

श्रेयस अय्यरनं शतक झळकात पूर्ण केली अट, आता घरी जेवायला येणार खास पाहुणा

कानपूर, 27 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात कानपूरमध्ये सुरू असलेल्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरनं शतक (Shreyas Iyer)...

IPS शिवदीप लांडे पुढील महिन्यात बिहारला परतणार, मुंबईतही धडाकेबाज कामगिरी

Shivdeep Lande : भारतीय पोलीस सेवा दलातील अधिकारी शिवदीप लांडे (Shivdeep Lande) पुन्हा एकदा बिहारमध्ये परतणार आहेत. सुपर...

Vodafone Idea: Vi ने पुण्यात केले ५जी ट्रायल, मिळाला भन्नाट स्पीड; पाहा डिटेल्स

हायलाइट्स:वीआयने केले ५जी ट्रायल.पुणे आणि गांधीनगरमध्ये पार पडले ट्रायल.ट्रायलसाठी Ericsson, Nokia सारख्या कंपन्यांशी भागीदारी.नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी Vi (Vodafone Idea) ने ५जी...

उर्फी जावेदचा फ्रंट ओपन टॉप, ट्रोलर्स म्हणाले, ‘अचानक सोसाट्याचा वारा आला तर….’

उर्फी जावेदचा विचित्र फॅशन सेन्स, आता तर फ्रंट ओपन टॉप घालून....   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

ST Workers Strike : एसटी संप सुरु ठेवल्यास वेतनवाढही रद्द करण्याचा परिवहनमंत्री अनिल परब यांचा इशारा

<p>वेतनवाढीनंतरही अनेक एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री अनिल परब यांनी गर्भित इशारा दिलाय. वेतनवाढ केल्यानंतर संप सुरुच ठेवणार असाल...