व्हेरीवेलहेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, प्रौढ व्यक्तींनी दररोज 7 ते 18 ग्रॅम लोहाचे सेवन केले पाहिजे. तुम्ही शाकाहारी असाल किंवा गरोदर असाल तर तुम्हाला तुमच्या आहारातील लोहाच्या सेवनाबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. आता फूड कॉम्बिनेशनमार्फत तुम्ही रक्ताची कमतरता कशी भरून काढू शकता पाहुयात.
शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी 5 फूड कॉम्बिनेशन्स (Food Combinations To Increase Blood Level)
भाज्यांच्या ज्यूससोबत मिक्स करा लिंबू वर्गीय फळांचा ज्यूस (Vegetable Juice And Citrus Fruit Juice)
हिरव्या भाज्यांमध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक, फॉलिक अॅसिड यांसारखे पोषक घटक असतात. या भाज्यांच्या ज्यूसमध्ये लिंबू वर्गीय फळे म्हणजेच आवळा किंवा लिंबाचा ज्यूस मिक्स करून प्यायल्यास शरीरात लोहाचे शोषण चांगले होते.
झोपेत कोणताच आवाज ऐकू येत नाही, असं का? जाणून घ्या झोपेसंबंधी महत्वाच्या गोष्टी
भाज्यांमध्ये सेलेरी घाला (Vegetable And Celery)
तुम्हाला लोहयुक्त भाज्या अधिक फायदेशीर बनवायच्या असतील. तर त्यामध्ये ओवा मिक्स करा. जेव्हा तुम्ही भाजीसोबत ओवा खाता. तेव्हा लोहाचे शोषणही चांगले होते. ओवा तुम्ही चपातीमध्ये घालूनही खाऊ शकता.
मसूर डाळीत हिंग घाला
आत्तापर्यंत तुम्ही हिंग घालून केवळ भाज्यांची चव वाढवण्याबद्दल ऐकले असेल. मात्र हिंगाचा अजून एक फायदा आहे. मसूरच्या डाळीमध्ये असलेल्या लोहाचे प्रमाण शरीरात वाढवायचे असेल तर त्यामध्ये हिंग घाला. रक्ताभिसरण सुधारण्यासोबतच ते रक्त पातळ करते.
मनुका आणि भोपळ्याच्या बिया
भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात. त्याचबरोबर मनुक्यामध्ये लोहाचे प्रमाणही चांगले असते. हे दोन्ही एकत्र खाल्ल्यास रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी खूप फायदा होतो.
OMG! 2, 3, 4 नव्हे तर तब्बल 13; एकाच वेळी इतक्या बाळांना जन्म देणार ही महिला
लिंबूपाणीसोबत लोह सप्लिमेंट घ्या (Iron Supplements And Lemon Water)
जर तुम्ही आयर्न सप्लिमेंट किंवा गोळ्या घेत असाल तर त्यासोबत लिंबूपाणी घ्या. काही संशोधनात असे आढळून आले आहे की असे केल्याने लोहाची कमतरता दूर होते आणि शरीरात लोहाचे शोषण चांगले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#Anemia #Tips #रकतच #कमतरत #दर #करणयसठ #बसट #आहत #ह #फड #कमबनशनस