Saturday, May 21, 2022
Home क्रीडा Andrew Symonds चा कार अपघातात मृत्यू; ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूच्या निधनाने क्रिकेटविश्व हादरले |...

Andrew Symonds चा कार अपघातात मृत्यू; ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूच्या निधनाने क्रिकेटविश्व हादरले | Aussie cricket legend Andrew Symonds dies in car crash scsg 91Andrew Symonds dies in car crash: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्सचा अपघाती मृत्यू झालाय. ४६ वर्षीय सायमंड्सचा ऑस्ट्रेलियामध्ये एका कार अपघातात मृत्यू झाला. समोर आलेल्या माहितीनुसार क्विन्सलॅण्डमधील अॅलिक रिव्हर ब्रीज येथील हार्वे रेंज रोडवर सायमंडच्या गाडीचा अपघात झाला.

गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता सोडून बाजूला जाऊन उलटल्याची माहिती पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकात दिलीय. सायमंड्सचा मृत्यू हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्यांसाठी या वर्षातील तिसरा धक्का आहे. यापूर्वी शेन वॉर्न आणि रॉड मार्श या दोघांचाही अशाच प्रकारे आकस्मिक मृत्यू झालाय.

सायमंड्सच्या मृत्यूनंतर अनेक दिग्गजांनी ट्विटरवरुन त्याला श्रद्धांजली अर्पण केलीय. ऑस्ट्रेलियाचा माजी प्रशिक्षक आणि क्रिकेटपटू जॉनस निल गिलेस्पीने सायमंड्सच्या मृत्यूसंदर्भात धक्का बसल्याची प्रतिक्रिया दिलीय. “धक्कादायक बातमी आहे. आम्ही सर्वचजण तुला कायमच मीस करु मित्रा,” असं गिलेस्पीने म्हटलंय. तर दुसरीकडे अॅडम गिलक्रीस्टने, “हे खरोखर वेदनादायी आहे,” अशी प्रतिक्रिया दिलीय.

ऑस्ट्रेलियामधील वरिष्ठ क्रिकेट रिपोर्टर अशणाऱ्या रॉबर्ट कारडॉक यांनी दिलेल्या माहितीनुसार टाउनस्वीलीपासून ५० किलोमीटर अंतरावर झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाला. क्विन्सलॅण्ड पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकानुसार अपघात झाला तेव्हा सायमंड्स हा गाडीमध्ये एकटा प्रवास करत होता. स्थानिक वेळेनुसार रात्री साडेदहा वाजता हा अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झालं पण त्यांना सायमंड्सला वाचवण्यात यश आलं नाही. सायमंड्सने ऑस्ट्रेलियासाठी २६ कसोटी सामने खेळले आहेत. व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व असणाऱ्या कालावधीत म्हणजेच १९९७ ते २००७ दरम्यान सायमंड्स हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा अविभाज्य भाग होता. त्यानंतर सायमंड्स हा फॉक्स क्रिकेटसाठी समालोचक म्हणून काम करत होता.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Andrew #Symonds #च #कर #अपघतत #मतय #ऑसटरलयन #करकटपटचय #नधनन #करकटवशव #हदरल #Aussie #cricket #legend #Andrew #Symonds #dies #car #crash #scsg

RELATED ARTICLES

IPL 2022 : दोन कारणांमुळे दिल्ली कॅपिटल्स अडचणीत, आता चूक झाली तर खेळ समाप्त

मुंबई, 21 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील साखळी फेरीचे सामने रविवारी संपणार आहेत. शनिवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians...

मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180, वडाळा आरटीओ, विजयनगर

BMC Election 2022 Ward 180, Wadala RTO, Vijayanagar : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180  हा वडाळा आरटीओ, विजयनगर...

चार वर्षांपासून फुटकी दमडीही कमवत नाहीये; आर. माधवननं म्हणून सोडला देश?

या सर्व प्रवासात एक मुद्दा महत्त्वाचा की, माधवनला मागील 4 वर्षांपासून पैसे कमवण्यात सपशेल अपयश आलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

Most Popular

बॉलिवूडला पुन्हा एकदा पायरसीचा फटका! रिलीजच्या अवघ्या काही तासांतच ‘धाकड’, ‘भूलभुलैया 2’ लीक!

Dhaakad, Bhool Bhulaiyaa 2 Online Leaked : बॉलिवूडचे दोन बिग बजेट चित्रपट शुक्रवारी (20 मे) रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित...

देशाच्या माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या जीवनातील काही रंजक गोष्टी

Rajiv Gandhi Death Anniversary : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृतीदिन. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त देशभरात त्यांचे स्मरण...

BMC Election 2022 : आपनं कंबर कसली; दिल्ली, पंजाबनंतर आता मुंबई जिंकण्यासाठी सज्ज

Mumbai Mahapalika Election 2022 : संपुर्ण देशाचं लक्ष लागलेलं शहर म्हणजे मुंबई (Mumbai) शहर. या मुंबई शहरात आगामी...

संभाजीराजेंना मुख्यमंत्र्यांकडून ऑफर, पण सोमवारपर्यंत राजेंचा होकार न आल्यास…

मुंबई, 21 मे : राज्यसभेच्या रक्त झालेल्या सहा जागांच्या निवडणुकांसाठी (Rajya Sabha Election) राजकीय घटामोडींना वेग आला आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आवश्यक इतकी...

Rajya Sabha election: राज्यसभेसाठी संजय राऊतांचा ‘चौकार’, 26 मे रोजी भरणार अर्ज

मुंबई, २० मे -राज्यसभा निवडणुकीसाठी (rajya sabha election 2022) राज्यात रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. एकीकडे संभाजीराजे छत्रपती अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहे तर...

Parenting Tips | तुमच्या ‘या’ गोष्टींमुळे मुलांच्या मनावर येतं मोठं दडपण; लगेचच थांबवा

मुंबई : Parenting Tips : आपण सर्वजण आपल्या मुलांना इतर मुलांपेक्षा चांगले बनवण्यासाठी स्पर्धा करीत असतो. कधी डान्सिंग क्लासमध्ये, कधी गाण्याच्या क्लासमध्ये, कधी...