Saturday, November 27, 2021
Home विश्व amrullah saleh : 'मी आहे आता अफगाणिस्तानचा राष्ट्रपती', उपराष्ट्रपती सालेह यांची ...

amrullah saleh : ‘मी आहे आता अफगाणिस्तानचा राष्ट्रपती’, उपराष्ट्रपती सालेह यांची घोषणा; तालिबानला आव्हान तर बायडनवर टीका


काबुलः अफगाणिस्तानमध्ये काबुलवर कब्जा केल्यानंतर तालिबानने सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दुसरीकडे अफगाण नागरिकांना संकटात सोडून पळालेले उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह ( amrullah saleh ) यांनी आता स्वतःला राष्ट्रपती घोषित केलं आहे. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यावरही निशाणा साधला आहे. बायडन यांच्याशी चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. नॉर्दन अलायन्सप्रमाणे अफगाण नागरिकांनी तालिबान विरोधात एकजूट व्हावं, असं आवाहन सालेह यांनी केलं आहे.

सालेह यांनी केले ट्वीट

अफगाणिस्तानच्या घटनेनुसार राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत, पलायन, राजीनामा किंवा निधन झाल्यास उपराष्ट्रपती हे काळजीवाहू राष्ट्रपती बनतात. मी सध्या आपल्या देशात आहे आणि वैध देखभाल करणारा राष्ट्रपती आहे. मी सर्व नेत्यांना त्यांचे समर्थन आणि सर्वांच्या सहमतीसाठी संपर्क करतोय, असं सालेह यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

बायडन यांच्यावर टीका

आता अफगाणिस्तानसाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्याशी चर्चा करणं निरर्थक आहे. त्यांना सोडून द्या. आपण व्हिएतनाम नाही आणि तालिबानही व्हिएतनाम कम्युनिस्टांसारखे नाही, हे अफगाण नागरिकांनी सिद्ध करायला हवं. अमेरिका आणि नाटोसारखी आपण हिंमत गमवलेली नाही. पुढे अनेक शक्यता आहेत. आव्हानं संपली आहेत. आता विरोधात सहभागी व्हा, असं सालेह म्हणाले.

facebook bans taliban : तालिबानवर फेसबुकने घातली बंदी; म्हटले, ‘दहशतवादी संघटनांना स्थान

‘तालिबानसमोर झुकणार नाही’

आपण कधीच आणि कुठल्याही स्थितीत तालिबानच्या दहशतवाद्यांसमोर झुकणार नाही. मी आमचे नायक अहमद शाह मसूद यांच्या आत्म्याशी आणि वारशाशी कधीच विश्वासघात करणार नाही. ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे, त्यांना मी कधीच निराश करणार नाही. तालिबानसोबत कधीच एका छताखाली राहणार नाही. कधीच नाही.

तालिबानला रोखू शकला नाहीत, आमचं काय वाकडं करणार?; चीनने अमेरिकेला डिवचले

पंजशीर खोऱ्यात लपलेत सालेह

तालिबानच्या भीतीने अमरुल्लाह सालेह हे अफगाणिस्तानच्या पंजशीर खोऱ्यात लपले आहेत. याला नॉर्दन अलायन्सचे माजी कमांडर अहमद शाह मसूदचा गड मानलं जातं. हा भाग इतका धोकादायक आहे की आजपर्यंत तालिबानीही त्यावर कब्जा करू शकलेले नाहीत. पंजशीर असा एकमात्र प्रदेश आहे ज्यावर आजूनही तालिबानचा कब्जा नाहीए. उत्तर-मध्य अफागणिस्तानच्या या खोऱ्यात १९७० च्या दशकात सोव्हिएत संघ किंवा १९९० च्या दशकात तालिबानला कधीच कब्जा करत आला नाही.

अफगाणिस्तानमधील ‘हे’ राज्य अजूनही तालिबानच्या ताब्यात नाही!

अफगाणांचे हिरो होते अहमद शाह मसूद

१९९० च्या दशकात अहमद शाह मसूदने तालिबानविरोधातील संघर्षात मोठी प्रतिष्ठा मिळवली होती. भारतही त्यांची मदत करत होता. तालिबानच्या हल्लात एकदा अहमद शाह मसूद हे गंभीर जखमी झाल्यानंतर भारताने त्यांना एअरलिफ्ट करून ताकिजिस्तानच्या फर्कहोर विमानतळावर त्यांच्यावर उपचार केले होते. हे भारताचे पहिले विदेशी लष्करी तळही आहे. हे तळ नॉर्दन अलायन्सच्या मदतीसाठी भारताने बनवले होते.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#amrullah #saleh #म #आह #आत #अफगणसतनच #रषटरपत #उपरषटरपत #सलह #यच #घषण #तलबनल #आवहन #तर #बयडनवर #टक

RELATED ARTICLES

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक...

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची...

Most Popular

गंभीर आजाराशी झुंजतायत अनिल कपूर? जर्मनीतून व्हिडीओ शेअर

अनिल कपूर यांच्या चाहत्यांना मोठा धक्का  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही....

नवीन कोरोना व्हायरस ‘चिंतेचा’, WHOनं दिलं ‘हे’ नाव, धोका अधिक!

Omicron B.1.1.529 : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नवीन कोरोनाव्हायरस व्हेरिएंट अतिशय "चिंतेचा" ( concern) असल्याचे घोषित केले आहे....

ST Workers Strike : एसटी संप सुरु ठेवल्यास वेतनवाढही रद्द करण्याचा परिवहनमंत्री अनिल परब यांचा इशारा

<p>वेतनवाढीनंतरही अनेक एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री अनिल परब यांनी गर्भित इशारा दिलाय. वेतनवाढ केल्यानंतर संप सुरुच ठेवणार असाल...

Corona च्या नव्या स्ट्रेनला WHO नं दिलं नाव, म्हणाले…

जिनेव्हा, 27 नोव्हेंबर: कोरोना व्हायरस (Corona Virus) पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटनं सर्वांचीच चिंता वाढवली आहे. जागतिक...

महागाईचा भडका : सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ

Inflation :दिवसागणिक महागाईचा भडका उडताना दिसत आहे.   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...