Saturday, August 13, 2022
Home टेक-गॅजेट Alert! 27 सप्टेंबरपासून या स्मार्टफोनमध्ये नाही चालणार Gmail, YouTube आणि Google

Alert! 27 सप्टेंबरपासून या स्मार्टफोनमध्ये नाही चालणार Gmail, YouTube आणि Google


नवी दिल्ली, 2 ऑगस्ट : अँड्रॉईड फोन युजर्ससाठी (Android Users) महत्त्वाची माहिती आहे. आता गुगल (Google) 2.3.7 किंवा त्याहून कमी वर्जनवर चालणाऱ्या अँड्रॉईड फोनवर साइन-इन सपोर्ट करणार (Google Sign-in) नाही. हे बदल 27 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. जुन्या अँड्रॉईड फोन युजर्सला सप्टेंबरनंतर गुगल अॅप्स (Google Apps) चालू ठेवण्यासाठी कमीत-कमी अँड्रॉईड 3.0 हनीकॉम्बमध्ये अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

9to5Google ने आपल्या रिपोर्टमध्ये युजर्सला पाठवण्यात आलेल्या ईमेलचा एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. सध्या अशा युजर्सची संख्या अतिशय कमी आहे, जे अँड्रॉईडच्या अतिशय जुन्या वर्जनचा वापर करत आहेत. Google हे बदल युजर्सच्या अकाउंट सिक्योरिटी आणि डेटा सिक्योरिटीसाठी करत आहे.

Photo Credit: 9to5Google.

27 सप्टेंबरपासून अँड्रॉईड वर्जन 2.3.7 आणि त्याहून कमी वर्जनवर चालणाऱ्या फोनवर युजर्स ज्यावेळी गुगल अॅप्समध्ये साइन-इन करण्याचा प्रयत्न करतील, त्यावेळी त्यांना ‘username error’ किंवा ‘password error’ दिसेल. हा ईमेल अद्यापही अतिशय जुनं अँड्रॉईड वर्जन, सॉफ्टवेअर वर्जन वापरणाऱ्या युजर्सला पाठवण्यात आला आहे. अशा युजर्सला सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी किंवा फोन स्वीच करण्यासाठी सांगण्यात आलं आहे.

Mobile Phone चोरी झाल्यास आता सरकारच करणार मदत, करावं लागेल हे एक काम

रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 27 सप्टेंबरनंतर जुनं अँड्रॉईड वर्जन वापरणारे युजर्स जीमेल, यूट्यूब आणि मॅप्ससारखे गुगल प्रोडक्ट आणि सर्विसेज वापरू शकत नाहीत. या सर्विसेजमध्ये साइन-इन करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना एरर येईल. युजर्सने याच अँड्रॉईड वर्जनवर नवीन गुगल अकाउंट बनवण्याचा किंवा फोन फॅक्टरी रिसेट करुन साइन-इन करण्याचा प्रयत्न केल्यासही फोन स्क्रिनवर एरर दिसेल. नवीन पासवर्ड केल्यासही एरर येईल. त्यामुळे अतिशय जुनं 2.3.7 किंवा त्याहून कमी वर्जनवर चालणाऱ्या अँड्रॉईड फोनला स्वीच करणंच फायद्याचं ठरेल.



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Alert #सपटबरपसन #य #समरटफनमधय #नह #चलणर #Gmail #YouTube #आण #Google

RELATED ARTICLES

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...

पुढील तीन दिवस कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट, धरणांच्या पाणी साठ्यात वाढ

Maharashtra Rain : राज्यात अनेक ठिकाणी पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे....

Most Popular

पुढील तीन दिवस कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट, धरणांच्या पाणी साठ्यात वाढ

Maharashtra Rain : राज्यात अनेक ठिकाणी पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे....

बेन्झिमा, कोर्टवा, डीब्रूएनेला नामांकन; ‘युएफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी तिघे शर्यतीत

वृत्तसंस्था, निऑन : चॅम्पियन्स लीग विजेत्या रेयाल माद्रिद संघाचा तारांकित आघाडीपटू करीम बेन्झिमा आणि गोलरक्षक थिबो कोर्टवा यांच्यासह मँचेस्टर सिटीचा प्रमुख मध्यरक्षक केव्हिन...

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक

नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती ‘बीसीसीआय’चे...

स्टार प्रवाह गणेशोत्सव सोहळ्यात प्रेक्षकांना मिळणार अष्टविनायकाची माहिती

मुंबई, 12 ऑगस्ट : स्टार प्रवाह सध्या महाराष्ट्राची सर्वात लाडकी वाहिनी आहे. या वाहिनीवरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांची मन जिंकत आहेत.  टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....