Monday, July 4, 2022
Home मुख्य बातम्या Alcohol at Mantralaya : हे मंत्रालय आहे की 'मदिरा'लय? मंत्रालयाला दारुचा अड्डा...

Alcohol at Mantralaya : हे मंत्रालय आहे की ‘मदिरा’लय? मंत्रालयाला दारुचा अड्डा बनवणाऱ्यांचा पर्दाफाश<p>राज्याचा गाडा ज्या मंत्रालयातून हाकला जातो. सर्वसामान्यांची तपासीणी केल्याशिवाय, पासशिवाय आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. त्याच मंत्रालयात चक्क दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळत आहे. एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात मंत्रालयातील दारूच्या बाटल्यांचा ढिग कैद झाला आहे. एवढी मोठी सुरक्षा यंत्रणा असूनही मंत्रालयात दारूच्या बाटल्या आल्या कशा? मंत्रालयातील मुख्य भाग असलेल्या त्रिमूर्तीच्या मागील बाजूस या दारूच्या बाटल्यांचा ढिगारा आहे. विशेष म्हणजे संपूर्ण मंत्रालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तरी या दारूच्या बाटल्या आल्या कुठून आणि ही दारु रिचवणारे नेमके आहेत तरी कोण? याची माहिती कोणालाच नाही.&nbsp;</p>
<p>मंत्रालयातील अनागोंदी कारभाराचा एबीपी माझाकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. या दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्या कशा? हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्याचं कारणही महत्वाचं आहे. कारण मंत्रालय कुठलं मॉल सेंटर नाही किंवा कुठलीही खाऊ गल्ली नाही. तर ते राज्याच मुख्यालय आहे. संपूर्ण राज्याचा कारभार या मंत्रालयातून पाहिला जातो. याच मंत्रालयात सर्वसामान्य जनता आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपल्या आयुष्यातील गंभीर प्रश्न मांडण्यासाठी मंत्रालयात येत असतात. जर सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश करायचा असेल तर येथील सुरक्षा यंत्रणांचा सामना करावा लागतो. त्यांची चौकशी केली जाते. पण मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून या दारुच्या बाटल्या आत आल्याच कशा? असा प्रश्न सध्या सर्वच स्तरांतून व्यक्त केला जात आहे.&nbsp;</p>
<p>या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल, तसेच हे कृत्य करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. दत्तात्रय भरणे याबाबत बोलताना म्हणाले की, "ही अत्यंत गंभीर बातमी आहे. याप्रकरणाची योग्य ती चौकशी करुन दोषींवर कारवाई केली जाईल." पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, मंत्रालयाची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था ही पोलीस प्रशासनाकडेच असते. पण मंत्रालय म्हणजे, सर्व मंत्री, सर्व विभागांचा विषय येतो. हा केवळ गृहमंत्री किंवा पोलिसांचा विषय नाही."&nbsp;</p>अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Alcohol #Mantralaya #ह #मतरलय #आह #क #मदरलय #मतरलयल #दरच #अडड #बनवणऱयच #परदफश

RELATED ARTICLES

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

ताब्यात घ्यायला शिवसेना म्हणजे काय युक्रेन आहे का? संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On Maharashtra Election :  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर शिंदे गटाला थेट आव्हान दिलं आहे....

Most Popular

धर्म, मानवता आणि वेदांताचा सुरेख मिलाप घालणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात…

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा...

boAt च्या ४ हजारांच्या हेडफोनला फक्त ९९९ रुपयात करा खरेदी, फीचर्स भन्नाट

नवी दिल्ली : Discount on boAt Headphone: boAT ने खूप कमी कालावधीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कंपनी सातत्याने कमी किंमतीत येणारे...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

Maharashtra Assembly session Live updates : विधिमंडळ अधिवेशनाचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Politics Floor Test Live Updates : आज शिंदे-फडणवीस सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करायचं आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय...

इंग्लंडचा पराभव निश्चित; बर्मिंघम फक्त एकदा असे घडले, भारताला इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी

बर्मिंघम: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीला सुरूवात होण्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला होता. कर्णधार रोहित शर्माला करोना झाल्याने तो संघाबाहेर झाला आणि जसप्रीत बुमराहकडे...

Flu Symptoms : कोरोना आहे की व्हायरल फ्लू? कसा ओळखाल? जाणून घ्या…

Flu Symptoms : देशात एकीकडे कोरोना संसर्ग (Coronavirus) अद्याप कायम असून वाढताना दिसत आहे, तर दुसरीकडे पावसाळा सुरु...