Saturday, May 21, 2022
Home करमणूक Akshay Kumar : अक्षय कुमारला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

Akshay Kumar : अक्षय कुमारला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण


Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला (Akshay Kumar) कोरोनाची लागण झाली आहे. खिलाडी कुमारला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे अक्षय कुमाक कान्स चित्रपट महोत्सावात हजेरी लावणार नाही. अक्षय कुमारने ट्वीट करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.अक्षयने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. अक्षय पोस्ट शेअर करत लिहिले आहे,”माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने मी कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होऊ शकत नाही. याचं मला खूप वाईट वाटत आहे. पण कान्स चित्रपट महोत्सावाला माझ्या शुभेच्छा आहेत.” ही पोस्ट अक्षयने अनुराग ठाकूरला टॅग केली आहे. 

अक्षय कुमारला याआधीदेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यावेळी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी अक्षय ‘राम सेतु’ सिनेमाचे शूटिंग करत होता. अक्षय कुमार आणि चित्रीकरणाशी संबंधित 45 जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे चित्रीकरणदेखील थांबवले होते. 

अक्षय कुमारचा पृथ्वीराज हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दरम्यान अक्षय कुमार म्हणाला होता, देशभरातील शाळांनी विद्यार्थ्यांना ‘पृथ्वीराज’ चित्रपट दाखवणं अनिवार्य करावं”. पृथ्वीराज सिनेमा 3 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच या सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात होणार आहे. या सिनेमात अक्षय कुमारसोबत मानुषी छिल्लरदेखील दिसून येणार आहे. या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

मीडिया रिपोर्टनुसार, अक्षय कुमार कान्स चित्रपट महोत्सवात एआर रहमान, आर माधवन, नवाजुद्दीन सिद्दीकी, नयनतारा, तमन्ना भाटिया आणि शेखर कपूरसोबत हजेरी लावणार होता. अक्षय कुमार कान्स चित्रपट महोत्सवात दिसणार नसल्याने त्याचे चाहते नाराज झाले आहेत. अक्षयचे चाहते त्याला आराम करण्याचा सल्ला देत आहेत. 

गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात आज 248 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 263 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासामध्ये राज्यातील एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 

संबंधित बातम्या

अक्षय कुमार रुग्णालयात तर ‘राम सेतु’शी संबंधित 45 जण कोरोना पॉझिटिव्ह, चित्रीकरण थांबलं

Prithviraj: ‘पृथ्वीराज’साठी खिलाडी कुमारनं घेतलीये इतकी मोठी रक्कम; इतर कलाकारांचं मानधन ऐकून व्हाल अवाक्

Akshay Kumar On The Kashmir Files : अक्षयनं केलं कश्मीर फाईल्सचं कौतुक; विवेक अग्निहोत्री म्हणाले, ‘हा तर अक्षयचा नाईलाज’

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Akshay #Kumar #अकषय #कमरल #दसऱयद #करनच #लगण

RELATED ARTICLES

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

Sim Card: तुमच्या नावावर किती जणांनी घेतले आहे सिम कार्ड? या सोप्या प्रोसेसने मिळेल संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : Sim Card: आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकाकडे असणे गरजेचे झाले आहे. प्रत्येक कामासाठी आज आधार कार्ड अनिवार्य आहे. बँकेत...

”भारतातील परिस्थिती चांगली नाही”,लंडनमध्ये जाऊन राहुल गांधींचा BJP वर हल्लाबोल

लंडन, 21 मे: काँग्रेस (Congress) पक्षाची सध्याची स्थिती फारशी चांगली नाही. गुजरातमध्ये तर विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकण्यास सुरुवात केली आहे....

Most Popular

Sony Smart TV: घरच बनेल थिएटर! Sony ने भारतात लाँच केले मोठ्या स्क्रीनसह येणारे ५ स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या फीचर्स-किंमत

नवी दिल्ली : Sony Smart TV Launched: Sony Bravia X80K स्मार्ट टीव्ही सीरीज भारतात लाँच झाली आहे. कंपनीचा लेटेस्ट ४के स्मार्ट टीव्ही लाइनअप...

बळकावलेल्या भागात चीनकडून पूल; परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण

परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरणवृत्तसंस्था, नवी दिल्ली: सन १९६०पासून चीनने बळकावलेल्या भागात सध्या पूलउभारणी सुरू आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. लडाखमधील पँगाँग सरोवराच्या...

नवाब मलिकांचा पाय खोलात?मलिकांनी डी-गँगसोबत मनीलॉन्ड्रिंग केलं,कोर्टाचं निरीक्षण

मुंबई, 21 मे : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने (ED) अटक केली आहे. या प्रकरणात...

राज्यात 311 कोरोना रूग्णांची नोंद; सर्वाधिक रूग्ण मुंबईत

महाराष्ट्रात कोरोनाचे 311 नवीन रुग्ण आढळले आहे. ज्यामध्ये सर्वाधिक रुग्ण मुंबईतील आहेत. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Mumbai Water Reduction : मुंबईतील ‘या’ भागांत चार दिवस पाणी कपात

Mumbai Water Reduction : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. मुंबईत 24 मे ते 27 मे दरम्यान, सकाळी 11 ते दुपारी...

ब्रिटेनमध्ये कोरोना पाठोपाठ मंकीपॉक्सचा वाढता प्रादुर्भाव; आतापर्यंत 20 रुग्णांची नोंद

Monkey Pox Cases Increase in Britain : कोरोना प्रादुर्भावानंतर आता आणखी एका आजारानं जगाची धाकधूक वाढवली आहे. कोरोनाची...