Thursday, May 26, 2022
Home भारत Ajit Pawar : बारामतीच्या नावानं सारखं ओरडू नका ; विमानतळाच्या जागेवरून अजित...

Ajit Pawar : बारामतीच्या नावानं सारखं ओरडू नका ; विमानतळाच्या जागेवरून अजित पवार संतापले 


Pune Airport : “पुण्यातील विमानतळ बारातमतीला नेहणार असा अनेकांचा गैरसमज झाला आहे. परंतु, पुण्यातील विमानतळ बारामतीला नेहलं जाणार नाही. त्यामुळं उगाच सारखं बारामती, बारामती असं ओरडू नका, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांनी पुण्यातील विमानतळ कोणत्याही परिस्थित बारामतीला हलवणार नसल्याचे स्पष्ट केले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार आज चाकण एमआयडीसी हद्दीत एका खासगी कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ इथं होणार होतं. मात्र, आता ते विमानतळ बारामतीत होणार आहे. ते विमानतळ इथं झालं असतं तर आणखी पंचतारांकित हॉटेल इथं उभारली गेली असती. पण काही कारणास्तव विमानतळ बारामतीच्या हद्दीत जातंय. पण आता आमच्या हद्दीत किमान डोमेस्टिक विमानतळ उभारावे. अशी मागणी मी अजित पवार यांच्याकडे केलीय असे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यावेळी म्हणाले. त्यामुळे अजित पवार यांनी यावेळी पुण्यातील विमानतळ पुण्यातच होणार असल्याचे सांगितले.  

“विमानतळाच्या जागेसाठी सर्व्हे महत्वाचा असतो. सर्व्हेनंतरच विमानतळाची जागा निश्चित केली जाते. झालेलं विमानतळ चोवीस तास सुरू रहायला हवं, त्याअनुषंगाने जागा निश्चित केली जाते. मुंबईनंतर सर्वाधिक लोकसंख्येच्या दृष्टीने पुण्याकडे पाहिलं जातं. अशा ठिकाणी मोठमोठे उद्योगधंदे येतात. यासाठी येणारे उद्योगपती स्वतःचे विमान घेऊन येतात. त्यांना लगेच परतावे लागते. त्यामुळे पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणे गरजेचे आहे. मुंबईतील विमानतळाचा भार कमी करण्यासाठीचं नियोजन सुरु आहे. पुण्यातील विमानतळ कुठं व्हावं याची पाहणी केंद्रीय हवाई मंत्रालय करत आहे. मुख्यमंत्री देखील यावर लक्ष देऊन आहेत. या सर्वांकडे माझी मागणी आहे की आता या विमानतळाचे काम तातडीनं सुरू करावे, जास्तीची दिरंगाई आता टाळावी, असे  अजित पवार म्हणाले. 

मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन होणार

मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन होणार असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले. अजित पवार म्हणाले,  “मुंबई ते हैदराबाद अशी एक बुलेट ट्रेन होणार आहे. मुंबई, नवी मुंबई, मावळ, थोडी खेड, हडपसर, पुरंदर, बारामती, इंदापूर, पंढरपूर, सोलापूर ते हैदराबाद अशी बुलेट ट्रेनची आखणी केंद्र सरकार करत आहे. यात खूप कमी थांबे असणार आहेत. दळणवळणच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्था उभी करण्याची आमची तयारी आहे.” 
 
एमआयएमचे तेलंगणातील आमदार अकबरुद्दीन औवेसी यांनी काल औरंगाबादमधील खुल्ताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतलं. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “काही गोष्टींना फार महत्व देऊ नका. तुम्ही काहीतरी विचारायचं मग आम्ही तरी बोलायचं, हे ताबडतोब थांबवा. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे. या महाराष्ट्रात छत्रपतींचाच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन वागलं पाहिजे.”

दरम्यान, पुण्यातील बालगंधर्व नाट्य मंदिराबाबतही अजित पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं. “नाट्यमंदिर विकसित करण्याचा हा निर्णय महापालिकेत सत्तेत असताना भाजपने घेतला आहे. मी बातम्यांमध्येच हे वाचलं. मला याबाबत जास्त काही माहिती नाही, मला फक्त प्रेझेंटेशन दिलं गेलं. महत्वाच्या कलाकारांच्या कमिटीसमोरच झालेला हा निर्णय आहे. त्यातच त्यांनी तीन ऑडिटोरियम करायचे ठरले आहे. त्यामध्ये पार्किंग देखील असेल. त्यामुळे कोणताही नवा निर्णय घ्यायचा म्हटलं की त्याला दोन बाजू असतात. आम्ही राज्यकर्ते बहुमताचा आदर करूनच निर्णय घेतो, असे अजित पवार यावेळी म्हणाले. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Ajit #Pawar #बरमतचय #नवन #सरख #ओरड #नक #वमनतळचय #जगवरन #अजत #पवर #सतपल

RELATED ARTICLES

IPL : मॅचवेळी मैदानात घुसला प्रेक्षक, पोलिसांनी पकडताच विराटने दिली अशी रिएक्शन

मुंबई, 26 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) एलिमिनेटरचा सामना बुधवारी आरसीबी आणि लखनऊ सुपर जाएंट्स (RCB vs LSG) यांच्यात झाला, या...

शेंगदाणा की सूर्यफूल? कोणतं खाद्यतेल आहे शरीरासाठी सर्वात चांगलं आणि का?

मुंबई, 26 मे : भारतातील खाद्यसंस्कृती खूप भव्य आणि विस्तृत आहे. आपल्याकडे अतिशय वैविध्यपूर्ण पदार्थ बनवले जातात. प्रत्येक संस्कृतीतील लोकांच्या अन्नपदार्थ बनवण्याच्या पद्धती...

‘हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’, संयमी एकनाथ शिंदे भडकले

मुंबई, 26 मे : शिवसेनेचे (Shiv Sena) ठाण्यातील बडे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिवहन मंत्री अनिल परब...

Most Popular

IPL : मॅचवेळी मैदानात घुसला प्रेक्षक, पोलिसांनी पकडताच विराटने दिली अशी रिएक्शन

मुंबई, 26 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) एलिमिनेटरचा सामना बुधवारी आरसीबी आणि लखनऊ सुपर जाएंट्स (RCB vs LSG) यांच्यात झाला, या...

शिखर धवनला वडिलांकडून मारहाण, आधी कानाखाली मारली मग लाथा बुक्क्यांनी मारहाण केली; Viral झाला घरातील ‘तो’ Video | IPL 2022 Shikhar Dhawan beaten up...

आयपीएल २०२२ च्या सुरुवातीला पंजाबच्या संघाने त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का देत उत्तम कामिगिरी केली. याच कामगिरीमुळे आता पहिल्यांदाच पंजाबचा संघ किमान अंतिम फेरीपर्यंत...

दगडफेक आणि काठीने हल्ला करत नेहरूंच्या पुतळ्याची तोडफोड; धक्कादायक VIDEO

भोपाळ 26 मे : मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात शहरातील चौकात असलेल्या माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू...

ED Raids On Anil Parab : परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीचा छापा

ED Raids On Anil Parab : राज्याचे परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांच्या...

बापरे, भारतात Omicron BA.5 चा प्रकोप, लक्षणांशिवाय पसरतोय व्हायरस, ‘या’ 11 संकेतांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष..!

भारतातील कोरोना विषाणूचा (Coronavirus pandemic) उद्रेक सध्यातरी संपताना दिसत नाही. अर्थात, देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेत (Covid 4th wave) नवीन रुग्णांची संख्या फारशी वाढलेली...

Diet For Healthy Skin: त्वचेचा आणि संतुलित आहाराचा आहे जवळचा संबंध, नितळ त्वचेसाठी या टिप्स लक्षात ठेवा

सौंदर्य आणि आहार यांचा खुप जवळचा संबंध आहे. पण, ही गोष्ट अनेक महिलांना माहित नसल्याने त्या आहाराकडे दुर्लक्ष करून केवळ विविध सौंदर्यवृद्धीसाठी उपाय...