Saturday, August 13, 2022
Home लाईफस्टाईल Aishwarya Rai Beauty Secret : ऐश्वर्या राय सुंदर दिसण्यासाठी काय खाते? सुपरहॉट...

Aishwarya Rai Beauty Secret : ऐश्वर्या राय सुंदर दिसण्यासाठी काय खाते? सुपरहॉट मॉमच्या आकर्षक चेहऱ्यामागचं रहस्य झालं उघड


आकर्षक चेहरा, मनमोहक सौंदर्य आणि सडपातळ बांधा म्हटलं की बी-टाउनमधील ग्लॅमरस अभिनेत्रींचा चेहरा डोळ्यासमोर हमखास उभा राहतो. ऐश्वर्या राय-बच्चन, माधुरी दीक्षित-नेने, मलायका अरोरापासून ते अगदी आताच्या तरुण पिढीमधील अभिनेत्री सारा अली, जान्हवी कपूर यांचं सौंदर्य पाहून या नट्या सुंदर दिसण्यासाठी काय बरं करत असतील? असा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो. तरुण मुली तर फॅशन, सौदर्याच्या बाबतीत बॉलिवूडच्या अभिनेत्रींना फॉलो करू पाहतात. काही अभिनेत्री देखील त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे त्यांचं ब्युटी सीक्रेट चाहत्यांबरोबर शेअर करतात.

इतकंच नव्हे तर बऱ्याच अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपायांचा देखील वापर करतात. तुम्ही देखील त्वचेसाठी बऱ्याच घरगुती पद्धतींचा वापर करत असाल. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण विश्व सुंदरी ऐश्वर्या राय बच्चन देखील चेहऱ्यासाठी घरगुती उपाय करते. बऱ्याच मुली चेहऱ्यासाठी महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण अशा मुलींसाठी ऐश्वर्या काही खास टिप्स घेऊन आली आहे. ऐश्वर्याचं ब्युटी सीक्रेट नेमकं काय हे आपण जाणून घेऊया. Aishwarya Rai Bachchan Beauty Secrets

त्वचेतील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यासाठी ऐश्वर्या काय करते?

– ऐश्वर्या राय बच्चन त्वचेमधील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मॉयश्चरायझरचा आवर्जून वापर करते. पण ती पूर्णपणे फक्त मॉयश्चरायझरवरच अवलंबून राहत नाही. मॉयश्चरायझरबरोबरच दही आणि घरगुती फेस पॅकचा ऐश्वर्या चेहऱ्यासाठी वापर करते. घरगुती उपाय करण्यास ती अधिक प्राधान्य देते.

– घरगुती फेस पॅक तयार करण्यासाठी बेसन पीठ, दही, हळदी पावडर, मिल्क पावडर एकत्र मिक्स करा. याची एक पेस्ट तयार होईल. ही तयार पेस्ट चेहऱ्याला तसेच संपूर्ण शरीराला देखील तुम्ही लावू शकता.

(Hair Care Tips : माधुरी दीक्षितने चाहत्यांबरोबर शेअर केलं हेअर सिक्रेट, वाढत्या वयात केसांसाठी वापरते ‘हे’ घरगुती तेल)

​हवामानानुसार बदल

– ऐश्वर्याच्या सुंदर त्वचेमागचं सगळ्यात मोठं रहस्य म्हणजे ती बदलत्या हवामानानुसार त्वचेची काळजी घेते. तसेच त्वचेसाठी करत असलेले उपाय यामध्ये देखील बदल करते. विशेष म्हणजे ऐश्वर्याचे प्रत्येक उपाय हे घरगुतीच असतात. यामुळे तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं.

– कोरफड जेल, केळ्याची पेस्ट, एव्होकॅडो पॅक सारख्या घरगुती उपायांचा ऐश्वर्या वापर करते. घरगुती उपायांमुळे तुमचं नैसर्गिक सौंदर्य कायम टिकून राहतं. याव्यतिरिक्त काही गोष्टींवर ती विशेष लक्ष देते. म्हणजेच पुरेसं पाणी पिणे, संतुलित आहार, नियमित व्यायाम ऐश्वर्या करते.

(Curd Hair Care : अशाप्रकारे लावा केसांना दही, लांबसडक, घनदाट केसांबरोबरच केस गळतीपासून मिळेल कायमची सुटका)

स्किन डिटॉक्ससाठी काय करते?

– डागविरहीत चेहरा दिसावा म्हणून प्रत्येक दिवशी डिटॉक्स करणं हा सर्वोत्तम उपाय आहे. डिटॉक्स म्हणजे त्वचेमधील विषारी पदार्थ बाहेर काढण्याची पद्धत. शरीरामध्ये वारंवार घडत असलेल्या रासायनिक प्रक्रियांमुळे त्वचेमध्ये विषारी पदार्थ निर्माण होतात.

– यामध्ये पचन क्रियेदरम्यान निर्माण झालेल्या अनावश्यक घटकांचा देखील समावेश असतो. त्वचा तसेच शरीरामधून विषारी पदार्थ जर बाहेर पडत नसतील तर यामुळे त्वचेविषयक अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. यापासून सुटका मिळावी म्हणून ऐश्वर्या नेहमी ८ ते १० ग्लास पाण्याचे सेवन करते. तसेच वर्कआउट कधीही चुकवत नाही.

(सुंदर दिसण्यासाठी रेखा यांनी आयुष्यभर खाल्ले ‘हे’ खाद्यपदार्थ, वयाची साठी ओलांडल्यानंतरही तरुणींना लाजवेल असं सौंदर्य)

​ऐश्वर्याचं ब्युटी सीक्रेट

– भरपूर पाणी पियाल्यामुळे शरीरामधील विषारी पदार्थ नैसर्गिकरित्या बाहेर पडण्यास मदत मिळते. भरपूर पाणी हेचं ऐश्वार्याचं महत्त्वाचं ब्युटी सीक्रेट आहे. यामुळे त्वचेवरील मुरुम, सूज, लालसरपणा सारख्या समस्यांना ऐश्वर्याला सामोरं जावं लागत नाही. आजही तिच्या चेहऱ्यावर कोणतेच डाग, मुरुम तुम्हाला दिसणार नाहीत.

– आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची हे ऐश्वर्याला अचूक ठाउक आहे. त्याचबरोबरीने तिने स्वतःसाठी काही नियम तयार केले आहेत. त्याचे ती काटेकोरपणे पालन करते. वेळेवर झोपणे, उठणे, डाएटकडे विशेष लक्ष देणं या गोष्टी ती नियमित करते.

(Hair Fall Tips : ‘या’ आयुर्वेदिक शॅम्पूचा वापर कराल तर केसगळतीपासून मिळेल सुटका, केसांच्या वाढीसाठी रामबाण उपाय)

​योग्य आहार

विश्व सुंदरी म्हणून ऐश्वर्याने किताब पटकावला आणि आज तिच्या सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत. आजही तिची एक झलक पाहिली की तिच्या मनमोहक सौंदर्यावरून नजरच हटत नाही. ऐश्वर्या दिवसामधून छोट्या-छोट्या मिलचं सेवन करते. आहारतज्ज्ञ देखील दर दोन तासांनी पौष्टिक पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. ऐश्वर्या अधिकाधिक उकळलेले पदार्थ खाण्याचा प्रयत्न करते. हिरव्या भाज्या, सलाड, स्प्राउट्स अशा पदार्थांचा तिच्या आहारामध्ये समावेश असतो. मैदा तसेच तेलकट पदार्थांपासून ऐश्वर्या लांब राहते. तसेच अधिक मसालेदार पदार्थांचे सेवन करणं तिला आवडत नाही.

(Skin Care Tips : मुरुम, त्वचेवरील डागांपासून सुटका हवी असेल तर रात्री झोपण्यापूर्वी करा ‘हे’ सोपे उपाय, आयुष्यभर त्वचा राहिल चमकदार)अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Aishwarya #Rai #Beauty #Secret #ऐशवरय #रय #सदर #दसणयसठ #कय #खत #सपरहट #ममचय #आकरषक #चहऱयमगच #रहसय #झल #उघड

RELATED ARTICLES

सावधान! या 3 पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, पाहा कोणती आहेत ती पेय

मुंबई, 13 ऑगस्ट : ज्याप्रमाणे त्वचा, केस आणि शरीराला योग्य पोषण, आहार मिळाला नाही, तर वृद्धत्वाचा परिणाम त्यांच्यावर लवकर दिसून येतो, त्याचप्रमाणे आपला...

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...

Most Popular

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...

Laal Singh Chaddha : भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा आरोप, अभिनेता आमिर खानविरोधात तक्रार दाखल

Laal Singh Chaddha : सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदाल (Vinit Jindal) यांनी आमिर खानविरोधात (Aamir Khan) दिल्ली पोलिसांकडे...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

Hing Water Benefits : हिंगाचं पाणी पोटाच्या आजारांवर रामबाण उपाय, आहेत अनेक फायदे, वाचा सविस्तर

Health Tips : पोटाचं आरोग्य जपायचं असेल तर हिंगाचे फायदे नक्की जाणून घ्या. हिंग पोटासाठी अतिशय फायदेशीर आहे....

पुण्यश्र्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांची आज पुण्यतिथी; यानिमित्त जाणून घ्या त्यांचे जीवनचरित

Ahilyabai Holkar Death Aniversary : एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण आणि कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar)...