Saturday, November 27, 2021
Home भारत afghanistan crisis : 'भारतीयांना सुरक्षित बाहेर काढा, अल्पसंख्यकांना मदत करा', PM मोदींचे...

afghanistan crisis : ‘भारतीयांना सुरक्षित बाहेर काढा, अल्पसंख्यकांना मदत करा’, PM मोदींचे निर्देश


नवी दिल्लीः अफगाणिस्तानमधील अराजक स्थितीने भारताची चिंता ( afghanistan crisis ) वाढली आहे. तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची ( cabinet committee on security ) बैठक घेतली. ही बैठक मोदींच्या निवासस्थानी झाली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवलही उपस्थित होते. यांच्यासह परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि अफगाणिस्तानमधील राजदूत रुद्रेंद्र टंडन ही उपस्थित होते. राजदूत टंडन यांना मंगळवारी सकाळीच काबुलमधून सुरक्षितपणे मायदेशी आणण्यात आलं.

मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीला अफगाणिस्तानमधील सध्याची आणि विकसित सुरक्षा आणि राजकीय परिस्थिती आणि अलीकडील स्थलांतर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. येत्या काही दिवसांत अफगाणिस्तानातून भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यास पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना सांगितलं, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भारताने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसोबत जे भारतात येण्यास इच्छुक आहेत अशा शिख आणि हिंदू अल्पसंख्यकांना आश्रय दिला पाहिजे. आणि आपल्याला शक्य ती सर्व मदत केली पाहिजे. आपल्या अफगाण बंधु आणि भगिनींनाही मदत करावी, जे भारताकडे मदतीसाठी आशेने बघत आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

pm modi chairs ccs meeting : अफगाणिस्तानवर PM मोदींची उच्चस्तरीय बैठक; गृह, संरक्षण,

भारताने काबुलमधील आपल्या दुतावासातील सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढलं आहे. भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या (ITBP) जवानांना दोन विमानांद्वारे मायदेशात आणण्यात आलं. पंतप्रधान मोदींना अफगाणिस्तानमधील स्थितीची सतत अपडेट्स देण्यात येत आहेत, असं सूत्रांनी सांगितलं.

afghanistan crisis : ‘हवाई दलाचे धन्यवाद’, काबुलमधील भारतीय राजदुतांची भावुक प्रतिक्रियाअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#afghanistan #crisis #भरतयन #सरकषत #बहर #कढ #अलपसखयकन #मदत #कर #मदच #नरदश

RELATED ARTICLES

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची...

Vodafone Idea: Vi ने पुण्यात केले ५जी ट्रायल, मिळाला भन्नाट स्पीड; पाहा डिटेल्स

हायलाइट्स:वीआयने केले ५जी ट्रायल.पुणे आणि गांधीनगरमध्ये पार पडले ट्रायल.ट्रायलसाठी Ericsson, Nokia सारख्या कंपन्यांशी भागीदारी.नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी Vi (Vodafone Idea) ने ५जी...

Most Popular

गंभीर आजाराशी झुंजतायत अनिल कपूर? जर्मनीतून व्हिडीओ शेअर

अनिल कपूर यांच्या चाहत्यांना मोठा धक्का  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही....

devendra fadnavis meets amit shah : दिल्लीत अमित शहांना भेटले फडणवीस; सत्ता बदलाच्या राजकीय चर्चांवर म्हणाले…

नवी दिल्लीः महाराष्ट्र भाजपमधील अनेक बडे नेते दिल्लीत ( devendra fadnavis meets amit shah ) आहेत. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय...

सिंधू उपांत्य फेरीत; सात्त्विक-चिराग यांचीही विजयी घोडदौड

साईप्रणीत पराभूत इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू तसेच सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय बॅर्डंमटनपटूंनी शुक्रवारी इंडोनेशिया खुल्या बॅर्डंमटन...

उर्फी जावेदचा फ्रंट ओपन टॉप, ट्रोलर्स म्हणाले, ‘अचानक सोसाट्याचा वारा आला तर….’

उर्फी जावेदचा विचित्र फॅशन सेन्स, आता तर फ्रंट ओपन टॉप घालून....   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

Vodafone Idea: Vi ने पुण्यात केले ५जी ट्रायल, मिळाला भन्नाट स्पीड; पाहा डिटेल्स

हायलाइट्स:वीआयने केले ५जी ट्रायल.पुणे आणि गांधीनगरमध्ये पार पडले ट्रायल.ट्रायलसाठी Ericsson, Nokia सारख्या कंपन्यांशी भागीदारी.नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी Vi (Vodafone Idea) ने ५जी...

IPS शिवदीप लांडे पुढील महिन्यात बिहारला परतणार, मुंबईतही धडाकेबाज कामगिरी

Shivdeep Lande : भारतीय पोलीस सेवा दलातील अधिकारी शिवदीप लांडे (Shivdeep Lande) पुन्हा एकदा बिहारमध्ये परतणार आहेत. सुपर...