Saturday, November 27, 2021
Home टेक-गॅजेट Afganisthan Crisis Update : अमरुल्लाह सालेह अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती

Afganisthan Crisis Update : अमरुल्लाह सालेह अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती


Afganisthan Crisis Update : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने ताबा घेतल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोक आपला जीव वाचवण्यासाठी देश सोडण्यासाठी धावपळ करत आहेत. तर दुसरीकडे अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती  अमरुल्लाह सालेह यांनी तालीबान समोर झुकण्यास नकार दिला आहे. अमरुल्लाह सालेह  यांनी स्वत:ला काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून घोषित केले आहे. या मुद्द्यावर अमेरिकेच्या राष्ट्रपतींशी चर्चा करणे व्यर्थ असून अफगाणी नागिरकांनी आपली लढाई स्वत: लढावी लागणार आहे, असे सालेह म्हणाले. 

सालेह यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, अफगाणिस्तानच्या नियमानुसार राष्ट्रपती वारले, पळून गेले तर उपराष्ट्रपतींना राष्ट्रपती म्हणून घोषित करण्यात येते. सध्या मी आपल्या देशाचा काळजीवाहू  राष्ट्रपती आहे. सध्या मी सगळ्या मंत्र्यांना त्यांच्या समर्थन आणि पाठिंब्यासाठी संपर्क करत आहे. आता अफगाणिस्तानच्या विषयावर अमेरीकेच्या राष्ट्रपतींशी चर्चा करणे व्यर्थ आहे. आता अफगाणिस्तानच्या नागरिकांना ही लढाई स्वत: लढावी लागणार आहे. आता विरोध करण्यात काही उपयोग नाही. आता लढाईमध्ये सहभागी व्हा.

अफगाणिस्तानवर आता तालिबानने संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित केलं असून राष्ट्रपती अशरफ घनी हे देश सोडून गेले होते. तर दुसरीकडे सालेह पंजशीक घाटीमध्ये गेले होते. सालेह यांनी या अगोदर देखील तालिबानच्या विरुद्ध आवाज उठवला होता. रविवारी जेव्हा काबुलसह संपूर्ण अफगाणिस्तान जेव्हा तालिबान्यांच्या नियंत्रणात गेले तेव्हा देखील सालेह यांनी आपली भूमीका मांडली. सालेह म्हणाले होते की, “मी कधीच कोणत्याही परिस्थितीत तालिबानच्या दहशतवाद्यांसमोर झुकणार नाही. मी लाखो नागरिकांचा विश्वास तोडणार नाही, ज्यांनी माझे ऐकले. मी तालिबान सोबत कधीच राहणार नाही.”

 बिघडलेल्या परिस्थितीमुळे अफगाणिस्तानमध्ये आता अनागोंदी माजली आहे. त्या पार्श्वभूमीवर जगभरातल्या 60 हून अधिक देशांनी आपल्या देशातील नागरिकांची सुखरुपपणे सुटका करावी अशी विनंती तालिबानकडे केली आहे.  काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन देश सोडून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या किमान सात जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. तालिबानच्या प्रश्नावर आज युरोपियन युनियनची आज महत्वाची बैठक असून या प्रश्नावर काय भूमिका घ्यायची यावर चर्चा होणार आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि सचिव ब्लिन्केन यांनी अमेरिकन सैन्याच्या माघारीचे समर्थन केलं आहे. संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अॅन्टोनिया गुटेरस यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर बोलताना तालिबानने हिंसाचाराचा मार्ग सोडावा असं आवाहन केलं होतं. महिला आणि बालकांचे अधिकार आणि सुरक्षा यावर त्यांनी विशेष चिंता व्यक्त केली होती.

संबंधित बातम्या :

 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Afganisthan #Crisis #Update #अमरललह #सलह #अफगणसतनच #कळजवह #रषटरपत

RELATED ARTICLES

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

Arjun Khotkar : ईडीकडून खोतकरांच्या घराची तब्बल 18 तास झाडाझडती, आजदेखील छापेमारी होणार

Arjun Khotkar : माजी मंत्री आणि जालन्यातील शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीने ( सक्तवसुली संचालनायलय) शुक्रवारी...

Most Popular

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

तुम्हाला हिवाळ्यात आल्याचा चहा प्यायला आवडतो का? मग या गोष्टीही माहीत असाव्यात

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : हिवाळ्यात (Winter) चहा पिणं कोणाला आवडत नाही? बाहेरची थंड हवा आणि हातात गरम चहाचा कप प्रत्येक माणसाचा मूड बदलतो....

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

Bigg Boss 15: राखीच्या नवऱ्याची बिग बॉसच्या घरात एन्ट्री? नेटकऱ्यांची भन्नाट रिअॅक्शन

Bigg Boss 15 : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो बिग बॉस सध्या चर्चेत आहे. या शोचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता...

IPL 2022 Mega Auction: कोण होणार नव्या अहमदाबाद टीमचा कर्णधार?

नव्या अहमदाबाद टीमच्या कर्णधारपदासाठी 5 नावं प्रामुख्याने समोर आहेत. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

जर तुम्हाला हा आजार असेल तर जिऱ्याचे पाणी पिऊ नका, तब्येत बिघडेल

मुंबई : Health News : वजन कमी (Weight Loss) करण्यासह कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी जिरे पाणी  (Jeera Water) पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु जिऱ्याच्या पाण्याचे...