Friday, May 20, 2022
Home करमणूक Aashram 3: समोर येणार ढोंगी बाबाचं सत्य?बहुचर्चित वेबसीरिजचा धमाकेदार Trailer

Aashram 3: समोर येणार ढोंगी बाबाचं सत्य?बहुचर्चित वेबसीरिजचा धमाकेदार Trailer


मुंबई, 13 मे- बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol)  स्टारर ‘आश्रम’ (Aashram) ही वेबसीरिज प्रचंड चर्चेत आली होती. या वेबसीरिजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. तर दुसरीकडे या वेबसीरिजवर आक्षेपसुद्धा घेण्यात आले होते. त्यामुळे ही सीरिज चांगलीच वादात अडकली होती. आश्रमच्या दोन यशस्वी भागानंतर आता या वेबसीरिजचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. आज या वेबसीरिजचा पहिला ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

या ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा आश्रममधील बाबासाठी भक्त जोरजोरात घोषणा देताना दिसत आहेत. या बाबाचं नाव आहे ‘काशीपूरवाले बाबा निराला’. ही भूमिका अभिनेता बॉबी देओलने साकारली आहे. सोबतच एक तरुणी बाबाच्या हत्येचा कट रचताना दिसत आहे. परंतु हा कट अयशस्वी ठरतो हे या ट्रेलरमधून स्पष्ट होतं. या 1 मिनिटा 11 सेकंदच्या ट्रेलरमधून या सीजनमध्ये किती थरारक गोष्टी घडणार याचा अंदाज येत आहे. हा ट्रेलर पाहून प्रेक्षक फारच उत्सुक झाले आहेत. सीजन 3 पाहण्यासाठी प्रेक्षक मोठे उत्सुक झाले आहेत. येत्या ३ जूनला हि वेबसीरिज एमएक्स प्लेयरवर रिलीज होणार आहे. तत्पूर्वीच या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्कंठा वाढविली आहे.

याआधी ‘आश्रम’चे दोन्ही सीजन प्रचंड चर्चेत आले होते. प्रकाश झा यांच्या या वेबसीरिज बाबत सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या. काहींनी या वेबसीरिजचं कौतुक केलं होतं. तर काहींनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपदेखील केला होता. याबाबत बॉबी देओल यांनी फेसबुकवर न्यूज 18 शी बोलताना म्हटलं होतं की, ‘या वेब सीरिजमध्ये धर्माच्या नावाखाली फसवणूक करणा बाबांविरूद्ध भूमिका मांडली गेली आहे. कोणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही. पण समाजात जे घडत आहे ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला असंही त्यांने म्हटलं होतं.’

Published by:Aiman Desai

First published:

Tags: Bobby deol, Entertainment, Web seriesअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Aashram #समर #यणर #ढग #बबच #सतयबहचरचत #वबसरजच #धमकदर #Trailer

RELATED ARTICLES

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह, दौरा स्थगित होण्याची शक्यता

मुंबई, 20 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर (Raj Thackeray Ayodhya Tour) जाणार आहेत. मात्र,...

अनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास

दिल्ली, 19 मे: जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात....

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...

Most Popular

Oppo Smartphones: लवकरच लाँच होणार Oppo Reno 8 Series चे तीन स्मार्टफोन्स, ५० MP कॅमेरासह मिळतील हे फीचर्स

नवी दिल्ली : Upcoming Oppo Smartphones: Oppo आपली आगामी Reno 8 स्मार्टफोन सीरीज २३ मे रोजी चीनमध्ये लाँच करणार असून रिपोर्ट्सनुसार, आगामी फ्लॅगशिप...

प्रियांका चोप्राचा दीपिकाला जोरदार झटका…नाव मात्र आलिया, कॅटरिनाचं

प्रियांका चोप्रा सध्या 'जी ले जरा' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान बोलताना प्रियांकाने दीपिका पदुकोणवर निशाणा लगावलाय   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी...

दिशा पाटणीने गुपचूप केलं लग्न? आता टायगरचं काय होणार असा प्रश्न विचारतात नेटकरी.

मुंबई 19 मे- झगमगत्या बॉलिवूड तारकांसारखे हुबेहूब दिसणारे अर्थात हमशकल्स किंवा लुकअलाईक यांचे विडिओ सतत सोशल मिडियावर पाहायला मिळतात. त्यातले बरेचसे तर कन्टेन्ट...

‘माझ्या कृत्याचा पश्चाताप नाही’, वडिलांनीच मुलगा-सूनेचा संसार संपवला

वडिलांनी असं का केलं? आधी सुखी संसाराचा आशीर्वाद दिला मग मुलाचाच संसार उद्ध्वस्त केला....   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

…. तेरा बाप आया! विराटच्या खेळीनं फॅन्स खूश, सोशल मीडियावर जोरदार सेलिब्रेशन

मुंबई, 20 मे : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) साठी 'करो वा मरो' असलेल्या सामन्यात विराट कोहलीला (Virat Kohli) फॉर्म गवसला आहे....