Friday, August 12, 2022
Home करमणूक Aai Kuthe Kai Karte : अरूंधतीसाठी यश का आहे खास?

Aai Kuthe Kai Karte : अरूंधतीसाठी यश का आहे खास?


मुंबई : स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका आता वेगळ्या वळणावर आहे. मालिकेत लोकप्रिय पात्र अरूंधती आणि अनिरूद्ध यांचा घटस्फोट झाला आहे. अरूंधती आणि अनिरूद्ध यांच्यातील गेल्या वर्षभराचा काळ हा अतिशय कठीण होता. अरूंधती घटस्फोट झाल्यानंतर डोंबिवलीत आपल्या आईकडे गेलीय. (Aai Kuthe Kai Karte : Why Yash is so closed to her mother Arundhati?) 

पण तिच्या या संपूर्ण काळात यश अतिशय खंबीरपणे उभा राहतो. अरूंधतीच्या तिन्ही मुलांपैकी यश तिच्या घटस्फोटाच्यावेळी देखील न सांगता आईसाठी धावून येतो. संजना आणि अनिरूद्ध यांच्या नात्याबद्दल कळल्यानंतर अरूंधती घटस्फोट घेण्याचा निर्णय घेते. अरूंधतीसाठी हा निर्णय आणि एका वर्षाचा कालावधी हा खडतर होता. पण या कालावधीत यश अरूंधतीचा मोठा आधार बनतो. 

अनिरूद्ध आणि संजनाचं नातं कळल्यावर यशने अरूंधतीला वेगळ होण्याचा निर्णय घेताना साथ दिली. अरूंधती आणि अनिरूद्धला तीन मुले अभिजीत, यश आणि इशा. अभिजीतवर कायमच वडिलांचा म्हणजे अनिरूद्धचा पगडा राहिला. त्यामुळे त्याने कळत नकळत आईचा म्हणजे अरूंधतीचा अपमान केला. त्यानंतर इशा ही कायमच अल्लड राहिली. लाडावलेली आणि वडिलांवर सर्वाधिक प्रेम करणारी. आईचं वेगळेपण तिला कळलंच नाही. पण यश हा कायमच आईच्या म्हणजे अरूंधतीच्या बाजूने राहिला आहे. 

यशचं वेगळेपण कायमच दिसलं आहे. मग ते कधी संजनाला सडेतोड उत्तर देणं असो वा वडिल आणि कुटुंबियांच्या विरोधात जाऊन गौरीसोबत ठाम राहणं असो. यश लग्नानंतरही गौरीला घेऊन अरूंधती जेथे असेल तेथे जाणार असल्याच म्हणतो. त्यामुळे यश हा कायमच अरूंधतीसोबत असेल असा विश्वास अप्पा आणि खास करून कुटुंबियांना आहे. 

अरूंधतीचा घटस्फोट होतो तेव्हा ती कुणालाही सोबत येऊ नका असं ठाम सांगते. मात्र तसं असूनही यश तेथे पोहोचतो. घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केल्यावरही अरूंधती ठाम राहते. मात्र गळ्यातून मंगळसूत्र काढताना अरूंधती कोलमडते. आणि त्याच क्षणी यश तेथे पोहोचतो. हेच यशचं वेगळेपण यावेळी अधोरेखित होतं. 

यशची भूमिका अभिषेक देशमुख साकारत आहे. प्रेक्षकांच्या पसंतीला हे पात्र उतरत आहे. 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Aai #Kuthe #Kai #Karte #अरधतसठ #यश #क #आह #खस

RELATED ARTICLES

सर्वसामान्य दाम्पत्याची ‘असामान्य’ कहाणी; दत्तक मुलीचा आज सर्वानाच अभिमान

गांधीनगर, 12 ऑगस्ट : अनेकजण विरोध झुगारुन असे काही निर्णय घेतात की कालांतराने ते समाजासाठी एक आदर्श उदाहरण बनतात. ही माणसं समाजात आपली...

कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे दीड फुटांनी उचलले, 10 हजार 100 क्युसेकने नदीत पाण्याचा विसर्ग 

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी 2 हजार 147 फुटांवर गेली असून एकूण पाणीसाठा 85.31 टीएमसी झाला आहे....

Paytm New Feature: तुमची ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार? कितीला पोहचणार? आता लगेच समजणार

मुंबई: अनेकदा प्रवाशांना रेल्वे (Railway) प्रवासापुर्वी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ट्रेनची वाट पाहत असताना ती नेमकी कोणत्या प्लॅटफॉर्म येईल याची माहिती नसते....

Most Popular

Shocking News ! देशातून Dominos pizza हद्दपार

या कंपनीवर गाशा गुंडाळण्याची वेळ  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. #Shocking...

Nokia मोबाईलची पुन्हा धमाकेदार एन्ट्री! एकदम तगडा 5G Smartphone, मोठा बॅटरी बॅकअप आणि जबरदस्त लूक

मुंबई : Nokia Smartphone : नोकिया बाजारात पुन्हा धमाका करण्याची तयारी करीत आहे. नोकिया नेक्स्ट सीरीजचा फोन आणत आहे. हा  5G Smartphone असणार...

‘छोटू भैय्या तू बॅट बॉल खेळ’; पंत आणि उर्वशीमध्ये जोरदार जुंपली

Urvashi Rautela Reply On Rishabh Pant- प्रसिद्ध क्रिकेटपटू ऋषभ पंत याने इन्स्टाग्राम स्टोरीवर उर्वशीचं नाव न घेता, 'ए बहीण माझा पाठलाग सोड' अशी...

सुपर चषक फुटबॉल : रेयाल माद्रिदला जेतेपद; अलाबा, बेन्झिमाच्या गोलमुळे एनट्रॅक फ्रँकफर्टवर मात

एपी, हेलसिंकी : डेव्हिड अलाबा आणि कर्णधार करीम बेन्झिमा यांनी केलेल्या गोलच्या बळावर स्पॅनिश संघ रेयाल माद्रिदने जर्मन संघ एनट्रॅक फ्रँकफर्टवर २-० अशी...

WhatsApp आणि Messenger च्या नोटिफिकेशन्सने वैताग आणलाय?, फक्त हे काम करा

नवी दिल्लीः whatsapp and messenger notification : सोशल मीडिया हे आता आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग बनले आहे. दिवसात किती तरी वेळा व्हॉट्सॲप...