Saturday, May 21, 2022
Home मुख्य बातम्या Aaditya Thackeray : मुंबईच्या विकासासाठी एकच नियोजन प्राधिकरण पॅकेज ; आदित्य ठाकरेंची...

Aaditya Thackeray : मुंबईच्या विकासासाठी एकच नियोजन प्राधिकरण पॅकेज ; आदित्य ठाकरेंची घोषणा 


Mumbai News Updates : मुंबईच्या विकासासाठी एकच नियोजन प्राधिकरण स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असून येत्या वर्षभरात हे प्राधिकरण सुरु होईल अशी घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  ( Aditya Thackeray) यांनी केली. याबरोबरच मुंबई महानगर पालिकेच्या महापौरांना अधिकचे अधिकार दिले जाणार असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.   

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा विकास करायचा असेल तर लालफितीत अडकलेल्या फाईलींवर काम करावे लागेल. अनेक विभागांच्या परवानग्या घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात धावाधाव करावी लागते, हा अडथळा दूर करण्यासाठी यावर उपाय म्हणून मुंबईत एकच नियोजन प्राधिकरण सुरु करत असल्याची घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली आहे.  

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी आज सूचवलेले उपाय हे पहिल्यांदाच सुचवले आहेत असे नाही. तर याआधी ही अनेक वेळा याच्या घोषणा झाल्या आहेत. मुंबईच्या विकासासाठी जवळपास 16 विविध यंत्रणा कार्यरत आहेत आणि त्या 42 प्रकारची कामं हाताळतात. म्हाडा, एसआरए, एमएमआरडीए, एमएसआरडीसी पीडब्ल्यूडी, सेंट्रलपीडब्ल्युडी , बीपीटी, एमटीएनएल, बीएसटी, गॅस निगम, मेरी टाईम बोर्ड, कोस्टल मॅनेजमेंट, पर्यावरण विभाग, डिफेन्स, पोस्ट आणि टेलीग्राम, सिआरझेड आणि महावितरण या महत्त्वाच्या यंत्रणा आहेत. त्यामुळे या सर्व यंत्रणांच्या परवानग्या घेण्यासाठी वेळ लागतोच. मात्र विकास कामांना मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होतोय. त्यामुळे या निर्णयाचे तज्ज्ञांकडून स्वागत होत आहे. 

 आदित्य ठाकरे यांच्या एकच प्राधिकरण करण्याच्या निर्णयाचे मुंबईकरांकडून स्वागत केलं जात आहे. मात्र, महापौरांच्या अधिकारात वाढ करण्याच्या निर्णयाला विरोध होताना पाहायला मिळत आहे. महापौरांना अधिकचे अधिकार देणे यात स्पष्टता नाही. तसेच जास्त अधिकार दिल्यास त्याचा दुरुपयोग ही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असही अनेक तज्ज्ञांचे मत आहे. 

मुंबईतील विकास कामांसाठी एकच प्राधिकरण करण्याचा निर्णय योग्य आहे. मात्र त्याचा सर्व सामान्यांना किती फायदा होणार? भ्रष्टाचार कमी होणार का? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अशा घोषणा करत असल्याचा आरोप विरोधकानी केलाय. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Aaditya #Thackeray #मबईचय #वकससठ #एकच #नयजन #परधकरण #पकज #आदतय #ठकरच #घषण

RELATED ARTICLES

चार वर्षांपासून फुटकी दमडीही कमवत नाहीये; आर. माधवननं म्हणून सोडला देश?

या सर्व प्रवासात एक मुद्दा महत्त्वाचा की, माधवनला मागील 4 वर्षांपासून पैसे कमवण्यात सपशेल अपयश आलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

Best 5G Phone: नवीन फोन खरेदी करताय? त्याआधी ‘या’ वर्षातील आतापर्यंतच्या सर्वात बेस्ट स्मार्टफोन्सची लिस्ट एकदा पाहाच

Best 5G Phone 2022: गेल्या काही वर्षात भारतीय स्मार्टफोन बाजारात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अनेक कंपन्या दरआठवड्याला नवनवीन स्मार्टफोन्स लाँच करत...

Rajiv Gandhi यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, स्टोन आर्ट साकारत वाहिली आदरांजली ABP Majha

<p>भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृतिदिन. आजचा दिवस दहशतवाद विरोधदिन म्हणून संपूर्ण देशभरात पाळला जातो. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील...

Most Popular

TOP 25 : महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा 21 मे 2022 : ABP Majha

इंडियन प्रीमियर लीग, 2022 | सामना 69 | वानखेडे स्टेडियम, मुंबई - 21 May, 07:30...

”भारतातील परिस्थिती चांगली नाही”,लंडनमध्ये जाऊन राहुल गांधींचा BJP वर हल्लाबोल

लंडन, 21 मे: काँग्रेस (Congress) पक्षाची सध्याची स्थिती फारशी चांगली नाही. गुजरातमध्ये तर विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकण्यास सुरुवात केली आहे....

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

Mumbai : Nawab Malik यांचे डी-गँगशी संबंध असल्याचे सकृतदर्शन पुरावे : कोर्ट

<p>मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांखाली तुरुंगात असलेले मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी आणखी वाढल्यात. मलिक यांचे दाऊद टोळीच्या सदस्यांशी थेट संबंध होते याचे सकृतदर्शनी पुरावे...

‘या’ तारखेला Redmi Note 11T सोबत Xiaomi Band 7 होणार लॉन्च, जाणून घ्या संपूर्ण माहिती

xioami band 7 launch in india : तुम्हीसुद्धा बॅंडप्रेमींपैकी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पुढील आठवड्यात 24...

Cannes महोत्सवाला गालबोट; विवस्त्र महिलेच्या आक्रोशानं रेड कार्पेट हादरलं

मुंबई : (Cannes) साऱ्या कलाजगताची नजर लागून राहिलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतासोबतच जगभरातील बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली. जिथं एकिकडे सर्व सेलिब्रिटी फॅशनचे नवनवीन...