Saturday, May 21, 2022
Home भारत Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात बदल, सूत्रांची माहिती  

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात बदल, सूत्रांची माहिती  


Aaditya Thackeray :  शिवसेना नेते (shiv Sena ) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्यात बदल होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राज्यसभेच्या  महाराष्ट्रातील सहा जागांसाठी 10 जून रोजी मतदान होणार आहे आणि याच दिवशी आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा निश्चित करण्यात आला होता. परंतु, राज्यसभेच्या मतदानाची तारीख काल जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या तारखेमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तयारी सुरू झाली आहे.  10 जून रोजी आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु, 10 जून रोजी होणाऱ्या मतदानामुळे आदित्य ठाकरे आपल्या दौऱ्यात बदल करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आदित्य ठाकरे यांच्या 10 जून रोजीच्या दौऱ्याची तारीख बदलल्यानंतर अयोध्या दौऱ्याची नवीन तारीख उद्या जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या  दौऱ्याआधिच शिवसेनेचे नाशिकमधील पदाधिकारी अयोध्येत पोहोचले आहेत. अयोध्येत आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शरयू नदीची आरती होणार आहे. तसेच रामलल्लासह इतर देवतांचेही आदित्य ठाकरे दर्शन घेणार आहेत. अयोध्येत पोहोचलेल्या या पदाधिकाऱ्यांनी घाटाची पाहणी केली असून तेथे आरती देखील केली आहे. आदित्य ठाकरे यांनी ऐनवेळी सभा घेण्याचं ठरवल्यामुळे पदाधिकाऱ्यांकडून सभास्थळ, होर्डिंग लावण्याच्या जागा याची पडताळणी केली जाणार आहे. शिवाय हॉटेल बुकिंग, भाविकांची राहण्याची सोय या सर्व गोष्टींची चाचपणी होणार आहे.

येत्या 5 जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा देखील अयोध्या दौरा आयोजित केला आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर आदित्य ठाकरे जात असल्यामुळे शक्तिप्रदर्शन केलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेना जय्यत तयारी करत आहे. काका अयोध्येत जाण्याआधीच पुतण्याचे होर्डिंगही लागले आहेत, तेही काकाच्या विरोधात, त्यामुळे अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने काका आणि पुतण्याचा अयोध्या दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे.  या पोस्टरबाजीतून शिनसेनेने ‘असली आ रहा है, नकली से सावधन’ असे लिहून राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.   

आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याआधी शिवसेनेने पोस्टरबाजीतून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ‘असली आ रहा है, नकली से सावधन’ असा आशय असणारे अनेक पोस्टर आयोध्येत लावण्यात आले आहेत. राज ठाकरे यांनी आपला आयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर मनसेकडूनही अयोध्येत पोस्टर लावण्यात आले होते. ‘राज’ तिलक की करो तैयारी आ रहे है भगवा धारी, चलो अयोध्या…’ असं या पोस्टर्सवर लिहिण्यात आलं होतं. 

महत्वाच्या बातम्या 

शिवसेना मनसेतील वाद थेट अयोध्येत? ‘असली आ रहा है, नकली से सावधान’ शिवसेनेची पोस्टरबाजी

Raj Thackeray : खबरदार! माझ्या अयोध्या दौऱ्याबाबत बोलाल तर…, राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना सज्जड दम

 अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Aaditya #Thackeray #आदतय #ठकरचय #अयधय #दऱयत #बदल #सतरच #महत

RELATED ARTICLES

चार वर्षांपासून फुटकी दमडीही कमवत नाहीये; आर. माधवननं म्हणून सोडला देश?

या सर्व प्रवासात एक मुद्दा महत्त्वाचा की, माधवनला मागील 4 वर्षांपासून पैसे कमवण्यात सपशेल अपयश आलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

Rajiv Gandhi यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, स्टोन आर्ट साकारत वाहिली आदरांजली ABP Majha

<p>भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृतिदिन. आजचा दिवस दहशतवाद विरोधदिन म्हणून संपूर्ण देशभरात पाळला जातो. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील...

Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha

<p>Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

Most Popular

माणसांपेक्षाही संवेदनशील हत्ती, मृत्यूनंतरही एकटं सोडत नाही; रिसर्चमधून खुलासा

या हत्तींकडून माणसानं शिकायला हवं... जिवंतपणीच नाही तर मृत्यूनंतरही कशी साथ निभावायची अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

छातीत दुखण्याची ही आहेत 5 कारणं; वेळीच सावध व्हा !

Chest Pain Recognization : आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक कारणांमुळे शारीरिक समस्या उद्भवू लागतात. अचानक सांधे दुखू लागतात, मानेचा...

पहिल्याच भेटीत राणी मुखर्जीच्या प्रेमात पडले आदित्य चोप्रा, कुटुंबाची नाराजी पत्करत ‘या’ देशात

Aditya Chopra Birthday : ज्येष्ठ चित्रपट निर्माते यश चोप्रा आणि पामेला चोप्रा यांचा मुलगा आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक...

श्रीकृष्ण जन्मभूमीवर बांधलीये इदगाह मशीद?; मंदिर- मशीद वाद नेमका काय?

मथुराः वाराणसीतील काशी विश्वेशर मंदिराच्या बाजूला उभ्या असलेल्या ज्ञानवापी मशिदीवरुन सध्या देशातील वातावरण तापलं आहे. ज्ञानवापी मंदिराच्या सर्व्हेक्षणात शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात...

YouTube चं नवं अपडेट, युजर्सला Video पाहताना असा होणार फायदा

नवी दिल्ली, 21 मे : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media) आपल्या युजर्सच्या सुविधेसाठी वेळोवेळी नवे अपडेट जारी करत असतं. याचदरम्यान व्हिडीओ प्लॅटफॉर्म यूट्यूबने...

IPL 2022: मुंबईच्या शेवटच्या मॅचमध्ये तरी अर्जुनला संधी मिळणार का?

मुंबई, 21 मे : मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) आयपीएल 2022 मधील शेवटचा सामना आज (शनिवार) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरूद्ध होणार आहे. दिल्लीचं...