Friday, August 12, 2022
Home करमणूक 7 दिवसात बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई; 50 कोटींहून अधिक कमाई

7 दिवसात बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई; 50 कोटींहून अधिक कमाई


मुंबई, 01 जुलै: वरूण धवन ( varun dhawan)  कियारा अडवाणी (  kiara advani)  नीतु कपूर ( Neetu Kapoor) आणि अनिल कपूर ( Anil Kapoor) यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘जुग जुग जियो’ (JugJugg Jeeyo) हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्याची प्रचंड चर्चा सुरू आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील तगडी कमाई केली. प्रत्येक दिवशी चित्रपटाने आधीच्या दिवसाचा रेकॉर्ड मोडला. (JugJugg Jeeyo box office collection Day 7) आजतकने दिलेल्या वृत्तानुसार,  जुग जुग जियो हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या सातव्या दिवशी चित्रपटाने एकूण ८५ कोटींची एवढी कमाई केली आहे. मागच्या आठवड्यात म्हणजे २४ जून रोजी  हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. राज मेहता यांनी दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांनी संमिश्र प्रदिसाद दिला आहे. काही प्रेक्षकांना चित्रपट मनोरंजक वाटलं तर काहींनी चित्रपट बोरिंग असल्याचं मत व्यक्त केलं आहे. असं असलं तरीसुद्धा पहिल्या आठवड्यातच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर  ५० कोटींपेक्षा जास्त  कमाई करण्यात यशस्वी ठरला आहे.

संपूर्ण जगभरात या चित्रपटाने आतापर्यंत ८५ कोटींची कमाई केली असून भारतात ५३ कोटी कमावले आहेत. तर येत्या काही काळातच हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा गाठेल असा अंदाज चित्रपट तज्ञांनी लावला आहे.
जुग  जुग जियो या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अलीकडे प्रदर्शित झालेल्या  भूल भुलैय्या २, सम्राट पृथ्वीराज, द काश्मीर फाईल्स आणि गंगुबाई काठियावाडी या चित्रपटांना जोरदार धडक दिली आहे.  जुग  जुग जियो या वर्षातील सर्वात जास्त कमाई करणारा पाचवा चित्रपट ठरला आहे.

हेही वाचा – रणबीरच्या ‘शमशेरा’मध्ये दिसणार मराठमोळा अभिनेता; स्टार प्रवाहवर साकारतोय महत्त्वाची भूमिका

याआधी कार्तिक आर्यन आणि कियारा  अडवाणी यांच्या भूल भुलैय्या २ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. दिगदर्शक अनीस बजमी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने वर्ल्ड वाईड २३० कोटींपेक्षा जास्त  कमाई केली होती.
येणाऱ्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर आर माधवनचा ‘रॉकेटरी’ आणि आदित्य रॉय कपूरचा ‘ओम’ हे दोन नवीन  चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. प्रदर्शित होताच रॉकेटरी या चित्रपटाला समीक्षकांनी चांगले रिव्हयुज दिले आहेत. आता येणाऱ्या काळात हे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करताय  हे पाहणं महत्त्वाचं असेल. त्याचप्रमाणे जुग  जुग  जियोच्या कमाईवर काही परिणाम होणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#दवसत #बकस #ऑफसवर #धडकबज #कमई #कटहन #अधक #कमई

RELATED ARTICLES

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

‘छोटू भैय्या बॅट बॉल खेळ…’, उर्वशी रौतेलाचा ऋषभ पंतवर पलट वार

मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यात काहीतरी वाद सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, हे प्रकरण समोर येण्याआधीच...

Most Popular

राज्यातील विविध भागात पावसाची हजेरी, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट  

Maharashtra Rain Live Updates : सध्या राज्यात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. या पावसामुळं काही...

श्रावणात वरदलक्ष्मी व्रत का केले जाते? जाणून घ्या पूजा, विधी आणि महत्त्व

Varad Lakshmi Vrat 2022 : श्रावण मासातील शुक्लपक्षात येणाऱ्या शेवटच्या शुक्रवारी वरदलक्ष्मी हे व्रत करतात. पूर्वी ज्यांनी हे...

लाल सिंह चड्ढा

आमिर खानच्या नावावर असलेले अनेक चित्रपट हे मुळात इतर भाषांतील चित्रपटांचा रिमेक आहेत किंवा त्या एखाद्या सिनेमाच्या कथानकावरून प्रेरित असलेले आहेत. चोखंदळ असलेला...

जगातील पहिला असा Smartphone,बॉडीला चिकटणारे Earbuds; पाण्यात होणार नाही खराब, किंमत जाणून घ्या

मुंबई : Smartphone News : Ulefone ने किकस्टार्टर वर बिल्ट-इन TWS इअरबड्ससह जगातील पहिला तगडा स्मार्टफोन Ulefone Armor 15 लॉन्च केला आहे. Armor 15 के साथ...

हृदयद्रावक! राखी बांधण्यासाठी निघालेल्या बहिणींना यमुनेत जलसमाधी, ४ जणांचा मृत्यू, १७ जण अद्यापही बेपत्ता

बांदा (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात मोठी दुर्घटना समोर आली आहे. रक्षाबंधनाला महिला मुलांसोबत राखी बांधण्यासाठी बोटीतून माहेरी जात असताना यमुना...

घरच्या घरीच करा हा सोपा उपाय आणि अपचनाला करा बायबाय!

मुंबई, 12 ऑगस्ट : मसाल्यातील प्रमुख घटक असलेला हिंग आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही फायदेशीर आहे. सर्वसाधारणपणे जेवणाची चव वाढवण्यासाठी हिंगाचा वापर केला जातो. हिंगाचे अनेक...