Thursday, May 26, 2022
Home भारत 50 वर्ष सोबत जगले अन्..; पत्नीच्या निधनानंतर 10 मिनिटातच पतीचाही मृत्यू

50 वर्ष सोबत जगले अन्..; पत्नीच्या निधनानंतर 10 मिनिटातच पतीचाही मृत्यू


जयपूर 15 मे : शुक्रवारी राजस्थानमधील बांसवाडा येथे पत्नीच्या मृत्यूनंतर काही मिनिटांतच पतीचाही मृत्यू झाल्याची घटना घडली. लग्नानंतर 50 वर्षे एकत्र आयुष्याचा प्रवास केल्यानंतर दोघांनी काही मिनिटांच्या अंतरातच जगाचा निरोप घेतला. दोघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्नीच्या मृत्यूच्या धक्क्याने पतीचा मृत्यू झाला. पत्नीने निधनाच्या आधी पाणी पिण्यासाठी मागवलं होतं. पती पाणी घेऊन पत्नीकडे गेला, मात्र तिने पाणी पिलं नाही. पत्नीचा मृत्यू झाला होता. हा धक्का पतीला सहन झाला नाही आणि अवघ्या 10 मिनिटात ते जमिनीवर कोसळले. खाली पडताच पतीचाही मृत्यू झाला (Husband and Wife Die on Same Day).

मुली झाल्या म्हणून नवऱ्यानं घराबाहेर काढलं! हिंमत न हारता लक्ष्मीनं धरलंय बसचं स्टेरिंग

हे प्रकरण बांसवाडा जिल्ह्यातील बस्सी चंदनसिंह गावचं आहे. इथे राहणाऱ्या रूपा गायरी यांच्या पत्नी केसर गायरी यांना दोन महिन्यांपूर्वी अर्धांगवायू झाला होता. तेव्हापासून त्या फक्त बेडवरच पडून असायच्या. उदयपूरमध्ये केसर यांच्यावर उपचार केले जात होते. शुक्रवारी त्यांनी पिण्यासाठी पाणी मागितलं. हे ऐकताच त्यांचे पती रूपा, त्यांना पाणी देण्यासाठी गेले. रूपा यांनी पत्नीला पाणी दिलं असता तिने ते प्यायलं नाही. यानंतर वृद्धाने पत्नीची नाडी तपासली असता तिचं निधन झाल्याचं समजलं.
हे पाहून रूपा यांना धक्काच बसला. दुःखात ते तिथून बाजूला झाले. यानंतर अवघ्या 10 मिनिटांत रूपा जमिनीवर कोसळले. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात नेलं. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

पतीने केलं दुसरं लग्न; पहिल्या पत्नीने संतापाच्या भरात घर जाळलं; 4 जणांचा होरपळून मृत्यू
बांसवाडा जिल्ह्यातील बस्सी चंदनसिंह गावात पहिल्यांदाच हा प्रकार घडला आहे. इथे पती-पत्नीचा एकत्र मृत्यू झाल्याच्या घटनेची चर्चा सुरू आहे. दोघांचा विवाह 55 वर्षांपूर्वी झाला होता. दोघांनीही आयुष्याचा बराच काळ एकत्र घालवला. पत्नीच्या मृत्यूचा धक्का रूपा यांना सहन झाला नाही. पत्नीच्या मृत्यूची बातमी समजताच रूपा यांचा मृत्यू झाला. ते बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले. कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पती-पत्नी दोघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

Published by:Kiran Pharate

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#वरष #सबत #जगल #अन #पतनचय #नधननतर #मनटतच #पतचह #मतय

RELATED ARTICLES

शेंगदाणा की सूर्यफूल? कोणतं खाद्यतेल आहे शरीरासाठी सर्वात चांगलं आणि का?

मुंबई, 26 मे : भारतातील खाद्यसंस्कृती खूप भव्य आणि विस्तृत आहे. आपल्याकडे अतिशय वैविध्यपूर्ण पदार्थ बनवले जातात. प्रत्येक संस्कृतीतील लोकांच्या अन्नपदार्थ बनवण्याच्या पद्धती...

‘हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’, संयमी एकनाथ शिंदे भडकले

मुंबई, 26 मे : शिवसेनेचे (Shiv Sena) ठाण्यातील बडे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिवहन मंत्री अनिल परब...

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

Most Popular

IPL 2022 : लागोपाठ 5 मोसमात 600 रन करून फायदा काय? KL Rahul करतोय तीच चूक

मुंबई, 26 मे : आयपीएल 2022 च्या एलिमिनेटरमध्ये (IPL Eliminator) आरसीबीने लखनऊ सुपर जाएंट्सचा (LSG vs RCB) पराभव केला. याचसोबत लखनऊचं आयपीएलमधलं आव्हान...

ममतादीदी महाराष्ट्राच्या एक पाऊल पुढे, राज्यपालांचे कुलपती पद स्वत: कडे घेण्याचा निर्णय

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) लवकरच राज्यातील विद्यापीठांच्या कुलपती होऊ शकतात. आज झालेल्या पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय...

Important Days in June : जून महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

Important Days in June 2022 : अवघ्या पाच दिवसांवर जून महिना येऊन ठेपला आहे. अशातच, आम्ही तुम्हाला सांगणार...

बापरे, भारतात Omicron BA.5 चा प्रकोप, लक्षणांशिवाय पसरतोय व्हायरस, ‘या’ 11 संकेतांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष..!

भारतातील कोरोना विषाणूचा (Coronavirus pandemic) उद्रेक सध्यातरी संपताना दिसत नाही. अर्थात, देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेत (Covid 4th wave) नवीन रुग्णांची संख्या फारशी वाढलेली...

Anil Parab Chembur ED Raid : अनिल परबांच्या संबंधित चेंबूरच्या बांधकाम व्यावसायिकाच्या घरी छापेमारी

<p>अनिल परबांच्या संबंधित चेंबूरच्या बांधकाम व्यावसायिकाच्या घरी छापेमारी. सकाळपासून परबांशी संबंधित ठिकाणांवर ईडीचे छापे.&nbsp;</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...