Saturday, July 2, 2022
Home मुख्य बातम्या 48 तासात 160 शासन निर्णय! भाजपनं घेतला आक्षेप, राज्यपालांकडे तक्रार

48 तासात 160 शासन निर्णय! भाजपनं घेतला आक्षेप, राज्यपालांकडे तक्रार


Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने 48 तासात 160 शासन निर्णय काढले आहेत. यावर भाजपनं आक्षेप घेतला आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्यपालांना पत्र लिहून याबाबत तक्रार केली आहे.  मात्र या आधीही 160 पेक्षा अधिक शासन निर्णय निघाल्याची माहिती समोर आली आहे.  2019 साली निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधी फडणवीस सरकारच्या काळात तीन दिवसात तब्बल 322 शासन निर्णय निघाल्याची नोंद आहे. त्यावेळी आचारसंहिता लागण्याच्या आधी 17 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या तीन दिवसात तब्बल 322 शासन निर्णय काढण्यात आले होते. 

प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांना पत्र लिहित म्हटलं आहे की,  एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. राज्यातील राजकीय स्थिती ही अत्यंत अस्थिरतेची गेल्या तीन दिवसांत बनली आहे. शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात बंडाळी झाल्याने आणि तदनंतर स्वत: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची मनिषा जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान सुद्धा त्यांनी रिक्त केल्याचे माध्यमांमधून कळले आहे. 

दरेकर यांनी पत्रात म्हटलं आहे की, अशात राज्य सरकारतर्फे अंधाधुंद पद्धतीने शासकीय आदेश (जीआर) काढून निर्णयसपाटा राबविला जात आहे. कधी नव्हे इतके महाविकास आघाडीचे सरकार निर्णय घ्यायला लागले आहे. आज माध्यमांमध्ये यासंदर्भातील विस्तृत वृत्त सुद्धा प्रकाशित झाले आहे. 160 च्या वर शासनआदेश 48 तासांत जारी करण्यात आले आहेत. विकास प्रकल्पांच्या नावाखाली होत असलेला हा प्रकार संशय वाढविणारा आहे. अडीच वर्ष निर्णयशून्य असलेले महाविकास सरकार कोट्यवधी रुपयांना मान्यता देत आहे. त्यामुळे या गंभीर आणि संशयास्पद परिस्थितीत आपण तातडीने लक्ष घालावे, अशी स्थिती आहे. पोलिस दल आणि अन्य महत्त्वाच्या विभागातील बदल्यांचा सुद्धा घाट घातला जात आहे. आपल्याला विदित आहेच की, यापूर्वी पोलिस दलांत झालेल्या महाभ्रष्टाचारात थेट राज्याच्या गृहमंत्र्यांनाच जेलमध्ये जावे लागले आहे, असं दरेकर यांनी म्हटलं आहे. 

महाराष्ट्राच्या व्यापक हिताच्या दृष्टीने आणि जनतेच्या हक्काच्या असलेल्या या निधीच्या गैरवापरात आपण तातडीने हस्तक्षेप करावा आणि या प्रकाराला पायबंद घालावा, ही आपल्याला नम्र विनंती आहे, असं दरेकरांनी पत्रात म्हटलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Sanjay Raut :  शिंदे गटाची वेळ संपली, आता आमची वेळ; संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंना चॅलेंज

अजय चौधरी, सुनील प्रभूंच्या नियुक्तीविरोधात एकनाथ शिंदे हायकोर्टात जाणार

शिंदे गटाचे 12 आमदार निलंबित केल्यानं काय साधणार? ‘मविआ’ची फ्लोअर टेस्ट सोपी होईल?अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#तसत #शसन #नरणय #भजपन #घतल #आकषप #रजयपलकड #तकरर

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

Most Popular

Mumbai Rain: मुंबईतल्या पावसाच्या परिस्थितीची माहिती ABP Majha

<p>मुंबईतल्या पावसाच्या परिस्थितीची माहिती</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. #Mumbai #Rain...

शिंदेंच्या मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ मंत्र्यांना मिळणार संधी,

Maharashtra Political Crisis : राज्यात नवीन सरकार आले आहे. एकनाथ शिंदेंनी सायंकाळी विधानभवनात त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली....

विधिमंडळाच्या अधिवेशनाची तारीख बदलली, एक दिवसानं अधिवेशन ढकललं पुढे

Assembly session : विधानसभेच्या अधिवेशनाची तारीख बदलली आहे. विधानसभेचं अधिवेशन एक दिवसानं पुढे ढकलण्यात आलं आहे. शनिवारी आणि...

INDvsENG: टीम इंडियाची वन-डे, टी20 सीरिजसाठी घोषणा, IPL स्टारला पहिल्यांदा संधी

नवी दिल्ली, 01 जुलै : बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा दोन्ही संघात कर्णधार म्हणून पुनरागमन...

shweta tiwari in yellow top : ४० वर्षांच्या श्वेता तिवारीचा हॉट लूक, फोटो पाहून चुकला चाहत्यांच्या हृदयाचा ठोका

टिव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या मोहक अदांनी सर्वांचेच लक्ष वेधून येते. श्वेता तिवारीचे फोटो पाहून तिच्या वयाचा अंदाज लावता येणार नाही.नुकतेच तिने तिच्या...

एकनाथ शिंदेंना खरंच मोठा झटका? व्हायरल पत्रामुळे संभ्रम वाढला

मुंबई, 1 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावर...