लंडन : दारुच्या नशेत लोक काय करतात याचा त्यांना स्वत:लाच पत्ता लागत नाही. दारु ही अशी गोष्ट आहे, जी व्यक्तीला पूर्णपणे बदलते, ज्यामुळे त्या माणसासोबत काय घडू शकतं, हे त्याचं त्यालाच समजत नाही. दारुशी संबंधीत अशीच एक घटना समोर आली आहे. जी फार विचीत्र आहे. कारण दारुच्या नशेत एका व्यक्तीच्या गर्लफ्रेंडसोबत असा काही प्रकार घडला, ज्याचा त्याला थांगपत्ताच लागला नाही आणि जेव्हा त्याला हे कळलं तेव्हा फार उशीर झाला होता.
हे प्रकरण इंग्लंडमधील डार्लिंग्टनचे आहे. येथे 32 वर्षीय सॅम पायबस हा त्याची गर्लफ्रेंड सोफी मॉसच्या फ्लॅटवर गेला. सॅम पायबस विवाहित होता आणि सोफी दोन मुलांची आई होती आणि तिचे सॅमसोबत संबंध होते. हे दोघेही एकमेकांशी लैंगिक संबंधात होते.
एके दिवशी सॅम त्याच्या गर्लफ्रेंडसोबत तिच्या फ्लॅटमध्ये गेला आणि तेथे 24 बिअर प्यायला त्यानंतर त्याने आपल्या गर्लफ्रेंडसोबत शरीरीक संबंध ठेवले.
परंतु दरम्यान, सॅम पायबसने त्याच्या मैत्रिणीच्या मानेवर दबाव आणला ज्यामुळे तिचा गुदमरुन जीव गेला आणि सॅमला ते कळलेही नाही. नशेच्या अवस्थेत तो झोपला. जेव्हा तो दुसऱ्या दिवशी सकाळी उठला तेव्हा त्याला सोफी बेडवर मृतावस्थेत आढळली.
सॅमला हे आठवत नव्हते की, त्याने नक्की असे काय केलं किंवा त्यांच्यासोबत असं काय घडलं ज्यामुळे त्याच्या गर्लफ्रेंडचा जीव गेला. त्यानंतर सॅमने पोलिसांना मदतीसाठी धाव घेतली आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सरेंडर केले आणि संपूर्ण घटना सांगितली.
डेलीमेलच्या अहवालानुसार, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सोफीचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी तिचे पोस्टमॉर्टम केलं, ज्यामध्ये गुदमरल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे उघड झाले.
या प्रकरणात, टीसाइड क्राउन कोर्टाने दोषीला म्हणजेच सॅमला 5 वर्षांची शिक्षा सुनावली, ज्यावर अटर्नी जनरलने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ज्यानंतर दोषींच्या शिक्षेत वाढ होऊ शकते.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#बअर #पऊन #तयन #सबध #ठवल #आण #गरलफरडन #गमवल #जव #तय #रतर #नकक #अस #कय #घडल