Friday, May 20, 2022
Home करमणूक 24वर्षे संसारानंतर काडीमोड; मलायकानंतर खान कुटुंबातून वेगळी होणारी सीमा आहे कोण?

24वर्षे संसारानंतर काडीमोड; मलायकानंतर खान कुटुंबातून वेगळी होणारी सीमा आहे कोण?


मुंबई, 13 मे : बॉलिवूडमधील महत्त्वाच्या कुटुंबापैकी एक असलेल्या खान कुटुंबात आणखी एक घटस्फोट होतो आहे. अभिनेता सलमान खानच्या पहिला भाऊ (Salman khan borther) अरबाज खानपाठोपाठ आता त्याचा दुसरा भाऊ सोहेल खानही घटस्फोट घेतो आहे (Sohail khan Seema khan divorce). सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा खान दोघांनी मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. कोर्टाबाहेरी त्यांचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. अभिनेत्री मलायका अरोरापाठोपाठ सीमा खानही 24 वर्षांच्या संसारानंतर खान कुटुंबापासून विभक्त होते आहे. ही सीमा खान नेमकी आहे कोण? पाहुयात.
सोहेल आणि सीमाची पहिली भेट प्यार किया तो डरना क्याच्या शूटिंगवेळी झाली होती. त्यावेळी सीमा मुंबईत राहत होती. ती फॅशन डिझाइनिंगमध्ये आपलं करिअर बनवत होती. त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली आणि आयुष्यभऱ एकमेकांचं होण्याचा निर्णय घेतला. 1998 साली त्यांनी लग्न केलं.
सोहेल आणि सीमाचं लग्न होणं इतकं सोपं नव्हतं. सीमाच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. तेव्हा दोघांनी पळून लग्न केलं. त्यांचे काही नातेवाईक आणि जवळचे मित्रमैत्रिणी यांच्या उपस्थितीत त्यांनी सिक्रेट वेडिंग केल्याचं सांगितलं जातं. दोन वर्षांनंतर या दोघांचे तीन झाले. त्यांनी निरवान या आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला. 2011 साली दुसरा मुलगा योहानचा जन्म झाला. त्यानंतर सीमाच्या कुटुंबानेही त्यांच्या लग्नाचा स्वीकार केला.
हे वाचा – ….पण मला सून बनवा, ‘या’ मुलीने कार्तिक आर्यनच्या आईकडे केली होती अजब मागणी
सीमा खान आता एक फॅशन डिझाइनर आणि अभिनेत्री आहे.  पण कधी काळी एकमेकांवर खूप प्रेम करणारे सोहेल-सीमा आता वेगळे का होत आहेत, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. या कपलने त्याबाबत काहीच अधिकृत माहिती दिलेली नाही. पण ते दोघं बऱ्याच कालावधीपासून एकत्र राहत नव्हते. 2017 सालीही त्यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आली होती. सीमाने फॅब्युलस लाइव्हज ऑफ बॉलिवूड वाइफ (Fabulous Lives of Bollywood Wives) या शोमध्ये काही संकेतही दिले होते.

तिने सांगितलं होतं, “सोहेल आणि मी एका साचेबद्ध लग्नात नाहीत पण आम्ही एक कुटुंब आहोत. आम्ही एक आहोत, आमच्यासाठी, त्याच्या आणि माझ्यासाठी आणि आमच्या मुलांसाठी. ती आपल्या स्पेसमध्ये राहते. दोन्ही मुलांचं दोन्ही घरात येणं-जाणं असतं”. दोघंही आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात. आपल्या मुलांसोबत ते सोशल मीडियावर फोटोही शेअर करतात.
हे वाचा – लता मंगेशकरांनी का केलं नाही लग्न? आता होणार खुलासा
अरबाज खान आणि मलायका अरोरा या दाम्पत्याच्या घटस्फोटाच्या काही वर्षांनंतरच सोहेल आणि सीमानेही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. अरबाज-मलायकाने 18 वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. 2016 मध्ये दोघंही एकमेकांपासून वेगळे झाले आणि मे 2017 साली त्यांनी घटस्फोट घेतला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#24वरष #ससरनतर #कडमड #मलयकनतर #खन #कटबतन #वगळ #हणर #सम #आह #कण

RELATED ARTICLES

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह, दौरा स्थगित होण्याची शक्यता

मुंबई, 20 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर (Raj Thackeray Ayodhya Tour) जाणार आहेत. मात्र,...

भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी; देशात सापडला ओमिक्रॉनच्या BA.4 व्हेरियंटचा पहिला रुग्ण

हैदराबादः भारतात करोना संसर्ग आता आटोक्यात येत आहे. महाराष्ट्रातही करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असताना भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. भारतात...

अनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास

दिल्ली, 19 मे: जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात....

Most Popular

संभाजीराजे महाविकास आघाडीकडून राज्यसभेची निवडणूक लढवणार? मुख्यमंत्री संभाजीराजे यांच्यात चर्चा

Sambhaji Raje  meets cm Uddhav Thackeray : संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गुरुवारी रात्री वर्षा बंगल्यावर...

IPL: अंपायरच्या एका चुकीमुळे KKR प्ले-ऑफमधून बाहेर! रिंकूच्या विकेटमुळे नवा वाद

मुंबई, 20 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) आता अखेरच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. प्ले-ऑफमध्ये आतापर्यंत दोन टीम पोहोचल्या आहेत, तर काही टीम...

पावसापासून संरक्षण नाही तरीही छत्री अतिशय महाग, किंमत ऐकून स्तब्ध व्हाल!

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> लवकरच पावसाळा सुरु होणार आहे. जेव्हा आपण छत्री पाहतो तेव्हा आपल्या मनात काय विचार येतो? तर छत्रीचं पहिलं काम...

Upcoming Phones: पुढील महिन्यात भारतात एंट्री करणार Realme चा ‘हा’ पॉवरफुल स्मार्टफोन, फीचर्स एकदा पाहाच

नवी दिल्ली : Realme GT Neo 3T To Debut in India : Realme लवकरच आपल्या नवीन दमदार स्मार्टफोनला भारतीय बाजारात लाँच करण्याची शक्यता...

कांद्याने केला पुन्हा वांदा, देशातील कांदा उत्पादक पुन्हा संकटात; दरात मोठी घसरण

मुंबई, 19 मे : किमान आधारभूत किमतीपेक्षा (msp) 2-4 रुपये किलोने अधिक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याचे चित्र दिसत आहे परंतु हे...

IPL 2022 : RCB च्या विजयाने आणखी दोन टीमचा द एण्ड, प्ले-ऑफचं स्वप्न भंगलं

मुंबई, 20 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) आता शेवटाकडे येऊन ठेपली आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनऊ सुपर जाएंट्स (LSG) या...