Friday, May 20, 2022
Home करमणूक 2 बायकांसह सुखी संसार करणाऱ्या सलीम खान यांच्या मुलांवर का आली घटस्फोटाची...

2 बायकांसह सुखी संसार करणाऱ्या सलीम खान यांच्या मुलांवर का आली घटस्फोटाची वेळ?


मुंबई, 13 मे : बॉलिवूडच्या महत्त्वाच्या कुटुंबापैकी एक असलेलं खान कुटुंब. या खान कुटुंबातून पुन्हा एकदा घटस्फोटाचं वृत्त आलं आहे. या कुटुंबातील दुसऱ्या कपलचा आता घटस्फोट होतो आहे (Sohail khan Seema Khan divorce). सलीम खान (Salim khan) यांचा  मुलगा अरबाज खाननंतर आता दुसरा मुलगा सोहेल खान यानेही घटस्फोटाचा निर्णय घेतला. दोन लग्न करून एकाच छताखली दोन बायकांसोबत इतकी वर्षे सुखाने संसार करणाऱ्या सलीम यांचा मुलांना मात्र त्यांचं एक लग्नही टिकवता आलं नाही. त्यांच्यावर घटस्फोट घेण्यासारखी वेळ का ओढावली असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.
सलीम यांना एक मुलगा सलमान खान अविवाहित आहे. दुसरा मुलगा अरबाज खानचा मलायका अरोरासोबत घटस्फोट झाला आहे आणि आता तिसरा मुलगा सोहेल खानही सीमा खानशी घटस्फोट घेतो आहे. या दापम्त्याने मुंबईच्या फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केल्याचं वृत्त आहे. दोघंही कोर्टाबाहेर दिसले, ज्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
लग्नाच्या 24 वर्षांनंतर सोहेल-सीमाचा घटस्फोटाचा निर्णय
सोहेल आणि सीमाची पहिली भेट प्यार किया तो डरना क्याच्या शूटिंगवेळी झाली होती. त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. 1998 साली त्यांनी लग्न केलं. त्या दोघांना निरवान आणि योहान ही दोन मुलं आहेत. कधी काळी एकमेकांवर खूप प्रेम करणारे सोहेल-सीमा आता वेगळे का होत आहेत.
हे वाचा – 24 वर्षांच्या संसारानंतर Sohail Khan ला Divorce; Malaika Aroroa नंतर खान कुटुंबापासून वेगळी होणारी Seema Khan आहे तरी कोण?
दरम्यान या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय का झाला याचा खुलासा अद्याप झालेला नाही. या कपलने त्याबाबत काहीच अधिकृत माहिती दिलेली नाही. पण ते दोघं बऱ्याच कालावधीपासून एकत्र राहत नव्हते.
2017 सालीही त्यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आली होती. सीमाने फॅब्युलस लाइव्हज ऑफ बॉलिवूड वाइफ (Fabulous Lives of Bollywood Wives) या शोमध्ये काही संकेतही दिले होते. तिने सांगितलं होतं, “सोहेल आणि मी एका साचेबद्ध लग्नात नाहीत पण आम्ही एक कुटुंब आहोत. आम्ही एक आहोत, आमच्यासाठी, त्याच्या आणि माझ्यासाठी आणि आमच्या मुलांसाठी. ती आपल्या स्पेसमध्ये राहते. दोन्ही मुलांचं दोन्ही घरात येणं-जाणं असतं”.
लग्नाच्या 19 वर्षांनंतर अरबाज-मलायकाने घेतला होता घटस्फोट
सोहेलचा मोठा भाऊ अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांचा 2017 साली घटस्फोट झाला होता. लग्नाच्या 19 वर्षांनंतर त्यांचं नातं तुटलं. त्यांच्यात नेमकं का झालं हे कळायला मार्गच नव्हता. पण मलायका आणि अर्जुनची मैत्री याला कारणीभूत असल्याचं सांगितलं जात होतं. दोघांनीही आपल्या घटस्फोटाचं नेमकं कारण सांगितलं नाही. पण त्यानंतर मलायका-अर्जुनचं नातं सर्वांसमोर आलं आणि अरबाजही अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीसोबत दिसू लागला. त्यामुळे दोघांनाही आपले नवे जोडीदार मिळाले म्हणून त्यांचा संसार मोडला असं सर्वांनाच वाटलं. मलायका आणि अरबाजला एक मुलगा आहे. ज्याच्यासाठी ते दोघं अनेकदा एकत्र दिसतात. दोघांनी आपली मैत्री कायम ठेवल्याचं दिसतं.
घटस्फोटाशिवाय सलीम खान यांचा दोन बायकांसोबत सुखी संसार
अरबाज आणि सोहेल यांचे वडील सलीम यांनी घटस्फोटाशिवायच दोन लग्न केली आहेत. इतकंच नव्हे तर दोन्ही पत्नींसह ते एकाच ठिकाणी एकत्र राहतात.  सलीम खान यांनी 1964 साली हिंदू असलेल्या सुशीला चरक ज्यांचं नाव आता सलमा खान आहे त्यांच्याशी लग्न केलं. त्यांना सलमान, अरबाज, सोहेल आणि अलविरा ही चार मुलं. त्यानंतर सलीम यांनी  1981 साली अभिनेत्री-डान्सर हेलनशी लग्न केलं. त्यांना मूल नाही पण त्यांनी अर्पिताला आपली मुलगी म्हणून दत्तक घेतलं.
घटस्फोटाशिवाय दोन बायकांसोबत एकाच छताखाली सुखी संसार करणाऱ्या सलीम यांच्या मुलांच्या घटस्फोटामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. खान कुटुंबात काही ठिक नाही का? असाच प्रश्न अनेकांना पडला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#बयकसह #सख #ससर #करणऱय #सलम #खन #यचय #मलवर #क #आल #घटसफटच #वळ

RELATED ARTICLES

Raj Thackeray : राज ठाकरेंकडून अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा; पण पुण्यातील सभा होणार

Raj Thackeray :  गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा अखेर...

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह, दौरा स्थगित होण्याची शक्यता

मुंबई, 20 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर (Raj Thackeray Ayodhya Tour) जाणार आहेत. मात्र,...

भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी; देशात सापडला ओमिक्रॉनच्या BA.4 व्हेरियंटचा पहिला रुग्ण

हैदराबादः भारतात करोना संसर्ग आता आटोक्यात येत आहे. महाराष्ट्रातही करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असताना भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. भारतात...

Most Popular

IPL 2022 : विराटने गुजरातला धुतलं, तरी मुंबईच ठरवणार RCB चं भवितव्य!

मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) करो या मरो सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans vs RCB) 8 विकेटने पराभव...

केतकीला समज देऊन सोडून दिलं पाहिजे, पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादीला सल्ला

मुंबई, 19 मे -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे ( Ketaki Chitale Case...

अजय-अतुलमुळे झाला होता ‘पुष्पा’फेम गायकाचा बॉलिवूड डेब्यू

मुंबई 19 मे- दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध असणारा गायक सिड श्रीराम (Sid Sriram) आज त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.  अत्यंत गोड आणि...

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह, दौरा स्थगित होण्याची शक्यता

मुंबई, 20 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर (Raj Thackeray Ayodhya Tour) जाणार आहेत. मात्र,...

…. तेरा बाप आया! विराटच्या खेळीनं फॅन्स खूश, सोशल मीडियावर जोरदार सेलिब्रेशन

मुंबई, 20 मे : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) साठी 'करो वा मरो' असलेल्या सामन्यात विराट कोहलीला (Virat Kohli) फॉर्म गवसला आहे....

IPL 2022 : ‘उडता मॅक्सी’, डू ऑर डाय सामन्यात मॅक्सवेलने घेतला सुपर कॅच, VIDEO

मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबी (RCB vs Gujarat Titans) त्यांचा महत्त्वाचा सामना खेळत आहे. प्ले-ऑफच्या (IPL Play Off)...