Thursday, May 26, 2022
Home भारत 144 वर्षापूर्वीच्या 'सिकंदराबाद क्लबला' भीषण आग, 20 कोटींहून अधिक नुकसान झाल्याचा...

144 वर्षापूर्वीच्या ‘सिकंदराबाद क्लबला’ भीषण आग, 20 कोटींहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज


Secunderabad Club Fire : हैदराबादमधील सर्वात जुन्या असलेल्या ‘सिकंदराबाद क्लबला’  भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. 144  वर्षापूर्वी या सिकंदराबाद क्लबचे बांधकाम करण्यात आले होते. या आगीत कोट्यवधीचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश मिळाले आहे. दरम्यान, कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. सध्या घटनास्थळी अडकेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. 

विशेष म्हणजे ब्रिटिश राजवटीत 1878 मध्ये या ‘सिकंदराबाद क्लबची निर्मिती झाली होती. हा क्लब 144 वर्षे जुना असून, सुमारे 20 एकर परिसरात पसरलेला आहे. सिकंदराबाद क्लब हा देशातील 5 सर्वात मोठ्या, प्रतिष्ठित आणि जुन्या क्लबपैकी एक आहे. या क्लबमध्ये शहरातील मोठे अधिकारी आणि श्रीमंत व्यापारीच येतात. सामान्य लोकांना येथे येण्यास मनाई आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे 3 वाजताच्या सुमारास या क्लबमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. आग इतकी भीषण होती की, ती संपूर्ण क्लबमध्ये पसरली आहे. आगीच्या ज्वाळा लांबून दिसत होत्या.

आग लागल्याची माहिती क्लबच्या व्यवस्थापन विभागाने अग्निशमन विभागाला दिल्यानंतर अग्निशमाक विभागाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली. मिळालेल्या माहितीनुसार, आग विझवण्यासाठी सुमारे 10 फायर इंजिनांचा वापर करण्यात आला. आग विझवण्यासाठी 4 तासांहून अधिक वेळ लागला. घटनास्थळी प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. सुट्टीमुळे क्लबमध्ये कोणीही पाहुणे नव्हते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र क्लबमधील सुमारे 20 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आगीत क्लबच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. काही लोकांच्या म्हणण्यानुसार आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगितले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#वरषपरवचय #सकदरबद #कलबल #भषण #आग #कटहन #अधक #नकसन #झलयच #अदज

RELATED ARTICLES

‘हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’, संयमी एकनाथ शिंदे भडकले

मुंबई, 26 मे : शिवसेनेचे (Shiv Sena) ठाण्यातील बडे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिवहन मंत्री अनिल परब...

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

यूजर्सच्या गोपनीयतेचा केला भंग, ट्विटरला 15 कोटी डॉलर्सचा दंड

Fine On Twitter: मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर आपल्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ट्विटरला 15...

Most Popular

राहत्या घरी धक्कादायक अवस्थेत आढळला 21 वर्षीय टीव्ही अभिनेत्रीचा मृतदेह

मुंबई, 26 मे- मनोरंजन क्षेत्रात धक्कादायक सत्र सुरुच आहे.गेल्या काही दिवसांत अनेक अभिनेत्रींचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. 15 मे रोजी बंगाली अभिनेत्री...

टेरर फंडिंग प्रकरणात यासिन मलिकला जन्मठेप; वाचा मलिकवरील कारवाईची संपूर्ण टाईमलाईन

Yasin Malik Timeline : काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. एनआयए कोर्टाने...

हिचं वय फक्त 18 वर्ष, ‘या’ बिझनेसमधून कमवते कोट्यवधी

एका 18 वर्षांच्या मुलीने ऑनलाइन व्यवसाय करून अवघ्या 2 वर्षात सुमारे 4 कोटी कमावले आहेत.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

Diet For Healthy Skin: त्वचेचा आणि संतुलित आहाराचा आहे जवळचा संबंध, नितळ त्वचेसाठी या टिप्स लक्षात ठेवा

सौंदर्य आणि आहार यांचा खुप जवळचा संबंध आहे. पण, ही गोष्ट अनेक महिलांना माहित नसल्याने त्या आहाराकडे दुर्लक्ष करून केवळ विविध सौंदर्यवृद्धीसाठी उपाय...

धक्कादायक.. 21 वर्षीय अभनेत्रीची आत्महत्या, बॉयफ्रेंडमुळे संपवलं जीवन?

बॉयफ्रेंडमुळे घडलेल्या 'त्या' घटनेमुळे 21 वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...