Saturday, August 13, 2022
Home भारत 12 मिनिटांत 84 लाखांची लूट, पिस्तुल दाखवून लुबाडलं 2 किलो सोनं आणि...

12 मिनिटांत 84 लाखांची लूट, पिस्तुल दाखवून लुबाडलं 2 किलो सोनं आणि लाखो रुपये


पटना, 3 ऑगस्ट : बिहारमधील (Bihar) गयामध्ये (Gaya) एका गोल्ड लोन कंपनीत (Gold Loan company) दरोडा टाकून दरोडेखोरांनी दिवसाढवळया लाखो रुपये लुटून नेले. मंगळवारी दुपारी चार दरोडेखोरांनी पिस्तुलचा (Pistal) धाक दाखवत 12 मिनिटांत दरोडा टाकला. तब्बल 2 किलो सोनं (2 KG Gold) दरोडेखोरांनी लुटून नेलं.

अशी घडली घटना

गया-नवादा मुख्य रस्त्यावर आशीर्वाद गोल्ड लोन संस्था आहे. या ठिकाणी काही चौकशी करण्याच्या बहाण्यानं सुरुवातीला दोघे आत आले. त्यानंतर थोड्या वेळाने त्यांचे आणखी दोन साथीदार आत आले. त्यांनी अचानक खिशातून पिस्तुल काढून कर्मचाऱ्यांना धमकावलं आणि त्यांच्याकडील मोबाईल फोन काढून घेतले. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना एका कोपऱ्यात नेऊन उभं केलं. यावेळी दुकानाचे व्यवस्थापक बाहेर गेले होते. मात्र ते येईपर्यंत दरोडेखोरांनी वाट पाहिली आणि त्यानंतर पिस्तुल बाहेर काढली.

सायरन वाजला तरी…

दरोडेखोरांनी संस्थेतील कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून लॉकरची किल्ली मागितली. ती किल्ली मिळाल्यानंतर त्यांनी लॉकर उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र चुकीच्या पद्धतीने तो उघडण्याचा प्रयत्न झाल्याने अलार्म वाजायला सुरुवात झाली. हे पाहून दरोडेखोरांनी लॉकर उघडण्याचा प्रयत्न थांबवला आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा धमकावलं. तातडीनं अलार्म बंद केला नाही, तर जीवे मारण्याची धमकी दिल्याने कर्मचाऱ्यांनी अलार्म बंद केला.

त्यानंतर दरोडेखोरांनी लॉकर उघडून त्यातून 2 किलो सोनं आणि 3 लाख रुपये लंपास केले. लूट केल्यानंतर दरोडेखोरांनी बाईकवरून पळ काढला. दरोडेखोर दोन वेगवेगळ्या बाईकवरून वेगवेगळ्या दिशेला फरार झाले.

हे वाचा -मोठी बातमी! शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, या विषयांवर झाली महत्त्वाची चर्चा

पोलीस तपास सुरू

ही घटना घडल्यानंतर तातडीनं पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे  पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मात्र, अलार्म वाजूनही आजूबाजूच्या दुकानातील कुणीही मदतीला न आल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरोडेखोरांच्या घाईगडबडीमुळे अलार्म वाजला होता आणि आजूबाजूची दुकाने उघडी होती. तरीही या घटनेचा कुणालाही पत्ता लागला नाही.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#मनटत #लखच #लट #पसतल #दखवन #लबडल #कल #सन #आण #लख #रपय

RELATED ARTICLES

तो बिर्याणी खातो आणि…; टीम इंडियाच्या गोलंदाजाबद्दल हे काय बोलून गेला Rohit sharma

रोहित शर्मा आता आगामी आशिया कपसाठी सज्ज झाला आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Maharashtra Breaking News : देश-विदेशसह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक,...

Most Popular

घरच्या घरी exercise करताय? ‘या’ चुका करणं टाळा

नियमित वर्कआउट किंवा व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर वॉर्मअप करणं खूप महत्वाचं आहे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

विश्वचषक फुटबॉल स्पर्धा २१ ऐवजी २० नोव्हेंबरपासून

एपी, जीनिव्हा : यजमान कतारला सलामीचा सामना खेळता यावा आणि त्यापूर्वी उद्घाटन सोहळय़ाचे आयोजन करता यावे, या हेतूने आगामी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला नियोजित...

बेन्झिमा, कोर्टवा, डीब्रूएनेला नामांकन; ‘युएफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी तिघे शर्यतीत

वृत्तसंस्था, निऑन : चॅम्पियन्स लीग विजेत्या रेयाल माद्रिद संघाचा तारांकित आघाडीपटू करीम बेन्झिमा आणि गोलरक्षक थिबो कोर्टवा यांच्यासह मँचेस्टर सिटीचा प्रमुख मध्यरक्षक केव्हिन...