Thursday, May 26, 2022
Home लाईफस्टाईल 11000 वोल्टचा करंट लागल्यानंतरही बचावला पण...; अशी अवस्था झाली की पाहूनच हादराल

11000 वोल्टचा करंट लागल्यानंतरही बचावला पण…; अशी अवस्था झाली की पाहूनच हादराल


लंडन, 13 मे : एखाद्याला विजेचा शॉक लागला की त्याचं वाचणं अशक्यच. काही लोकांचा तर जागच्या जागीच मृत्यू होता. पण एका व्यक्तीने मात्र सर्वांनाच धक्का दिला आहे. तब्बल 11 हजार वोल्टचा करंट लागल्यानंतरही ही व्यक्ती बचावली आहे. मृत्यूच्या दारातून ही व्यक्ती परत आली खरी. पण त्यानंतर त्या व्यक्तीची जी अवस्था झाली ती पाहून तुम्ही हादराल (Man got 11000 volt electric shock dead for few minutes).
यूकेच्या मॅनचेस्टरमध्ये राहणारा 29 वर्षांना डॅरेन हॅरिस ( (Darren Harris) 2020 साली त्याच्यासोबत भयंकर दुर्घटना घडली. विजेच्या झटक्यामुळे तो मृत्यूच्या दारात पोहोचला होता (Man got 11000 volt electric shock survived).
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार डॅरेन वोलव्हरहॅम्प्टन एका बंद पडलेल्या स्टील प्लांटमध्ये अर्बन एक्सप्लोरिंग करायला गेला होता. अर्बन एक्सप्लोरिंग म्हणजे अशा बंद किंवा पडीक ठिकाणी एखाद्या गोष्टीचा शोध घ्यायला जाणं.  डॅरेन ज्या बिल्डिंगमध्ये गेला होता ती कोसळण्याच्या स्थितीत होती. त्यामुळे तिथे वीज नसावी असं त्याला वाटलं. त्यामुळे त्याने नकळतपणे एका विजेच्या तारेला स्पर्श केला. तेव्हा त्याला 11 हजार व्होल्टचा शॉक लागला. विजेचा धक्का बसताच तो खूप दूरवर फेकला गेला आणि जवळजवळ त्याचा मृत्यूच झाला होता.
हे वाचा – जिवंतपणी नरकयातना! कोरोना रुग्णासोबत भयंकर कृत्य; संतापजनक VIDEO समोर
डॅरेनने सांगितल्यानुसार काही क्षण तो मृतावस्थेतच होता. अचानक तो शुद्धीवर आला पण त्याच्या शरीराभोवती आगीचा विळखा होता. त्याला आपल्या हात आणि मानेच्या आतील हाडही दिसत होता. चेहरा भाजून गळल्यासारखा झाला होता. त्याचं शरीर म्हणजे आगीचा गोळा झाला होता. त्याच अवस्थेत तो तिथून बाहेर पडला. धावत रस्त्यावर आला. तिथून एक अॅम्ब्युलन्स जाताना दिसली आणि त्या अॅम्ब्लुलन्ससमोरच तो आडवा पडला. त्यानंतर त्याला शुद्ध आली ती रुग्णालयात. 27 दिवसांनंतर त्याचे डोळे उघडले.

त्याला बर्मिंघमच्या क्विन एलिझाबेथ रुग्णालयात दाथल करण्यात आलं होतं. तिथं तो इंड्युस्ड कोमात होता. इंड्युस्ड कोमा म्हणजे औषधं देऊन कोमात टाकणं. त्याच्या शरीराचे कित्येक अवयव फेल होऊ लागले. डॉक्टरांनी त्याच्या तब्बल 23 सर्जरी केल्या. आर्टिफिशिअल स्किनला त्याच्या इतर त्वचेशी जोडलं. पण या प्रक्रियेत त्याचं नाक आणि कान कापावं लागलं.
हे वाचा – Shocking! जोशाजोशात गेला जीव; बाथरूममध्ये शारीरिक संबंधादरम्यान महिलेचा मृत्यू
डॉक्टर्सनी डॅरनसा नशीबवान म्हटलं आहे. कारण अशा स्थितीत याआधी कुणी वाचल्याचं त्यांनी कधीच पाहिलं नाही. डॅरेन बरेच कालावधी डिप्रेशनमध्ये राहिला. त्याने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. पण आता तो स्वतःला स्वीकारत आहे. आता 3डी प्रिटिंग तंत्रज्ञानामार्फत तो आपले कान पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी त्याने क्राऊड फंडिंगचीही मदत घेतली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#वलटच #करट #लगलयनतरह #बचवल #पण #अश #अवसथ #झल #क #पहनच #हदरल

RELATED ARTICLES

‘हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’, संयमी एकनाथ शिंदे भडकले

मुंबई, 26 मे : शिवसेनेचे (Shiv Sena) ठाण्यातील बडे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिवहन मंत्री अनिल परब...

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

यूजर्सच्या गोपनीयतेचा केला भंग, ट्विटरला 15 कोटी डॉलर्सचा दंड

Fine On Twitter: मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर आपल्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ट्विटरला 15...

Most Popular

महिंदा राजपक्षेंच्या अडचणी वाढल्या, सीआयडीकडून तब्बल तीन तास चौकशी, नेमकं प्रकरण काय?

कोलंबो : श्रीलंकेत ९ मे रोजी शांततेच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Mahinda Rajapaksa) यांच्या समर्थकांनी हल्ले केले होते. महिंदा...

Monsoon : मान्सून श्रीलंकेत दाखल, उद्या केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता

<p>Monsoon : मान्सून श्रीलंकेत दाखल, उद्या केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Realme Smartphone: रियलमीच्या पॉवरफुल ५जी स्मार्टफोनचा आज पहिला सेल, ४८MP कॅमेऱ्यासह मिळेल दमदार फीचर्स; पाहा किंमत

नवी दिल्ली :Realme Narzo 50 Pro 5G Sale: Realme ने आपला दमदार स्मार्टफोन Narzo 50 Pro 5G ला गेल्यावर्षी भारतात लाँच केले होते....

Important Days in June : जून महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

Important Days in June 2022 : अवघ्या पाच दिवसांवर जून महिना येऊन ठेपला आहे. अशातच, आम्ही तुम्हाला सांगणार...

IAS अधिकाऱ्यांना कुत्रे घेऊन फिरण्यासाठी खेळाडूंची स्टेडिअमधून हकालपट्टी

मुंबई, 26 मे : कोणत्याही स्टेडिअमवर पहिला हक्क हा खेळाडूंचा असतो. वेगवेगळ्या प्रकारातील सामन्यांबरोबरच खेळाडूंच्या सरावासाठी देखील स्टेडिअम महत्त्वाची आहेत. या स्टेडिअमवर आयएएस...

Smartphone Tips: रिपेअरिंगसाठी स्मार्टफोन सर्व्हिस सेंटरमध्ये देण्याआधी करा ‘हे’ काम, अन्यथा होणार मोठे नुकसान

नवी दिल्ली: Smartphone Safety : आजच्या या स्मार्ट आणि हायटेक जगात स्मार्टफोन न वापरणारी क्वचितच असेल. स्मार्टफोन शिवाय रोजच्या आयुष्याची कल्पना करणे देखील...