Monday, July 4, 2022
Home भारत 11 हजार वोल्टचा झटका! विजेच्या शॉकमुळे जिवंत जळाली वृद्ध व्यक्ती; तडफडून मृत्यू

11 हजार वोल्टचा झटका! विजेच्या शॉकमुळे जिवंत जळाली वृद्ध व्यक्ती; तडफडून मृत्यू


पाटणा, 22 जून : विजेचा करंट किती भयंकर ठरू शकतो, याचाच प्रत्यय देणारं एक प्रकरण समोर आलं आहे. विजेचा करंट लागताच एक व्यक्ती जिवंत जळाली आहे. वीज कोसळावी तशी या व्यक्तीवर विजेची तार कोसळली आणि जागच्या जागी तडफडून या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बिहारच्या बेतियामधील ही धक्कादायक घटना आहे (Person burnt alive by current).
कुर्मी टोला गावात राहणारे 65 वर्षांचे भुटी प्रसाद आपल्या घराच्या दरवाजाजवळ बसले होते. त्याचवेळी त्यांच्यावर 11 हजार वोल्टची तार कोसळली (Person burnt alive by 11000 volt current). विजेची तार कोसळताच त्यांचं शरीर पेटलं. त्यांच्या घरातील लोक धावत बाहेर आले पण विजेचा करंट असल्याने पुढे जायची हिंमत कुणीच केली नाही. कुणीच काही करू शकलं नाही आणि कुटुंबाच्या डोळ्यादेखत जळून तडफडून त्यांचा जीव गेला.
हे वाचा – मांजर खातपित नाही म्हणून डॉक्टरकडे नेलं; मेडिकल रिपोर्ट पाहताच मालकाला बसला धक्का
दैनिक भास्करच्या वृत्तानुसार भुटी प्रसाद यांचा नातू राज कुमारने सांगितलं, सहा वर्षांपूर्वी त्यांच्या घराच्या वरून ही 11 हजार वोल्टच्या लाइनची तार टाकण्यात आली. कित्येक घरांच्या वरून ही तार जाते. ही तार घरांवरून हटवण्याची मागणी करण्यात आली होती, पण प्रशासनाने लक्ष दिलं नाही. तारेच्या करंटमुळे याआधीही दोघांचा मृत्यू झाला आहे.
11 हजार व्होल्टचा झटका किती खतरनाक?
विजेच्या शॉकबाबत म्हणायचं तर आपण  440 व्होल्टच्या झटक्याबाबत ऐकलं आहे. घरांमध्ये सिंगल फेजमधून येणारा विद्युतप्रवाह केवळ 220 व्होल्टचा असतो. या 220 व्होल्टच्या करंटवर आपल्या घरातली जवळपास सर्व उपकरणं चालतात. मोठी उपकरणं सिंगल फेजवर चालत नाहीत. मोठी उपकरणं चालण्यासाठी थ्री-फेज कनेक्शन (Three Phase Connection) आवश्यक असतं. तीन-फेज कनेक्शनमध्ये 440 व्होल्ट पॉवर असते. म्हणजेच 440व्होल्ट मोठी उपकरणं चालविण्यास सक्षम असतं. छोटी उपकरणं थेट 440 व्होल्टच्या मदतीनं चालविली तर ती खराब होतात.
हे वाचा – VIDEO : हातात साधा पॅन घेऊन खतरनाक मगरीला मारायला गेले आजोबा; धक्कादायक शेवट
वीजेचा झटका लागून मृत्यू  झाल्याच्या अनेक घटना आपल्या आसपास घडत असतात.  जेव्हा वीजप्रवाह आपल्या शरीरातून वाहून जमिनीत जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या शरीराला वीजेचा धक्का म्हणजे शॉक बसतो. पण
मानवी शरीर 50 व्होल्टपेक्षा जास्त क्षमतेचा झटका फार सहन करू शकत नाही. 440 व्होल्टचा करंट लागल्यास मृत्यूची शक्यता सर्वाधिक असते. पण एखाद्याला 11000 व्होल्टचा झटका लागला तर काय हे तुम्ही या बातमीतून समजलंच असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#हजर #वलटच #झटक #वजचय #शकमळ #जवत #जळल #वदध #वयकत #तडफडन #मतय

RELATED ARTICLES

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

देहविक्री करून सैन्याला आर्थिक मदत करताहेत या महिला; काय आहे नक्की प्रकरण? वाचा

खार्किव : Ukraine Women:अनेक वेळा महिलांना बळजबरीने देहविक्री करावी लागते. आपल्या सन्मानाला सौदा करणे इतके सोपे नाही. अनेक महिलांना या परिस्थितीला मजबूरीने सामोरे...

Workout Tips: फक्त २ मिनिटांच्या ‘या’ व्यायामाने स्वतःला ठेवा तंदुरुस्त

मुंबई, 4 जुलै: शरीराला तंदुरुस्त (Fit) ठेवण्यासाठी आणि चरबी कमी (Fat Lose) करण्यासाठी व्यायाम (Exercise) ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, हे आपणा सर्वांना...

Most Popular

दैनंदिन राशीभविष्य: आठवड्याचा पहिला दिवस ‘या’ राशींसाठी असेल खास; असा जाईल दिवस

आज दिनांक ४ जुलै २०२२. वार सोमवार. तिथी आषाढ शुक्ल पंचमी. आज चंद्राचे भ्रमण दिवसभर सिंह राशीतून होईल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष वैवाहिक...

टरबूजाच्या बिया विवाहित पुरुषांसाठी वरदान, जोडीदाराकडून होईल प्रेमाचा वर्षाव

मुंबई, 3 जुलै : लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Men's Health) नसेल तर वैवाहिक जीवन आनंदी (Happy Marital Life) होते. त्यामुळे लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Physical...

आज शिंदे सरकारची खरी परीक्षा; बहुमत चाचणीसाठी ठरली रणनीती, मॅजिक फिगर गाठणार का?

मुंबई 04 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणात 10 दिवसांच्या बंडखोरीनंतर मोठा बदल घडवणारे शिवसेनेचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde Government) यांच्या नव्या सरकारची आज फ्लोर...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

‘मध्यावधी लागणारच! गुजरातबरोबर महाराष्ट्राच्या निवडणुका, ही तात्पुरती व्यवस्था’: संजय राऊत

Sanjay Raut On Maharashtra Election : शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिल्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत...

ठाकरेंना पुन्हा एक धक्का! मध्यावधी निवडणुका लागणार, पवारांचं भाकित TOP बातम्या

मुंबई, 4 जुलै : राज्यात विधानभवनात पार पडलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे गटाचा वियज झाला आहे. यानंतर उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे....