Friday, August 12, 2022
Home क्रीडा ४ ऑलिम्पिकमध्ये ४ सुवर्णपदकं; दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्येच्या देशातील पैलवानने घडवला इतिहास

४ ऑलिम्पिकमध्ये ४ सुवर्णपदकं; दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्येच्या देशातील पैलवानने घडवला इतिहास


Tokyo Olympics 2020 : टोकियो : क्यूबाचा कुस्तीपटू मिजाइन लोपेझने यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. ग्रीको-रोमन कुस्तीच्या 130 किलो वजनी गटात त्याने सुवर्णपदक जिंकलं. मिजाइन लोपेझचे हे ऑलिम्पिकमधील चौथे सुवर्ण आहे. यासह एकाच स्पर्धेत सलग चार सुवर्ण जिंकणारा तो पहिला पुरुष कुस्तीपटू बनला आहे. तसेच चार सुवर्णपदके जिंकणारा तो ऑलिम्पिकच्या इतिहासातील पाचवा खेळाडूही ठरला आहे. लोपेझ आधी कार्ल लुउस (लांब उडी), अल ऑर्टर (डिस्कस थ्रो), काओरी इचो (कुस्ती) आणि मायकेल फेल्प्स (200 मीटर मेडले) यांनी एका स्पर्धेत सलग चार सुवर्ण जिंकले आहेत. 38 वर्षीय मिजाइन लोपेझने अंतिम सामन्यात जॉर्जियाच्या इकोबी कझायाचा 5-0 असा पराभव करत हा कारनामा केला आहे.

मिजाइन लोपेझने 2008 आणि 2012 च्या ऑलिम्पिकमध्ये 120 किलो वजनी गटात आणि 2016 आणि आता 2020 मध्ये 130 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे. यासह तो सलग चार ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारा दुसरा कुस्तीपटू ठरला आहे. त्याच्या आधी जपानची महिला कुस्तीपटू काओरी इकोने असा पराक्रम केला आहे. तिने फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये 2004, 2008, 2012 आणि 2016 ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदके जिंकली आहेत.

मिजाइन लोपेझ विजयानंतर म्हणाला की, ‘जगातील सर्वोत्कृष्ट बनत हा इतिहास घडवताना मला चांगले वाटत आहे. माझी कारकीर्द खूप मोठी राहिली आहे. यासाठी खूप मेहनत केली होती तसेच विक्रमही मोडले आहेत. 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत लोपेझ 41 वर्षांचा होईल, पण तरीही त्याने पाचव्या ऑलिम्पिक सुवर्णपदकाचा दावा नाकारलेला नाही. तो पुढे म्हणाला की, मला हो किंवा नाही म्हणायचे नाही, पण मिजाइन जिवंत आहे, हे सर्वांना सांगेन.

मिजाइन लोपेझचा देश क्यूबा हा जगातील सर्वात लहान देशांपैकी एक असून त्याची लोकसंख्या एक कोटीपेक्षा जास्त आहे. विशेष गोष्ट म्हणजे भारताची राजधानी दिल्लीची लोकसंख्याही क्यूबापेक्षा जास्त आहे. बॉक्सिंग आणि कुस्तीमध्ये क्यूबा मजबूत असून वारंवार ऑलिम्पिक पदके जिंकत आहे.

चौथे सुवर्णपदक जिंकल्यानंतर मिजाइनने त्याच्या प्रशिक्षकांना खांद्यावर उचलत मॅटभोवती प्रदक्षिणा मारली. तर दुसरीकडे त्याने प्रतिस्पर्धी खेळाडूचा आदर करत त्याच्या डोक्याचं चुंबनही घेतलं. या ऐतिहासिक विजयानंतर क्युबाचे राष्ट्रपती मिगुएल डियाझ कॅनाल यांनी मिजाइनला फोन केला आणि त्याचे अभिनंदनही केले. दोघांनी एका व्हिडिओ कॉलवर संवाद साधला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिजाइनने प्रतिस्पर्धी खेळाडूला त्याच्याविरुद्ध एकही गुण घेऊ दिला नाही.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत मिजाइनने तुर्कीच्या रिझा कायाल्पचा 2-0 असा पराभव केला. 2016 मध्ये त्याने रिओ ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत कायाल्पला पराभूत केले होते. त्यावेळी त्याने 6-0 ने मात दिली होती. कायाल्पने इराणच्या अमीन मिर्झाजादेहचा 7-2 असा पराभव करत कांस्य पदक आपल्या नावे केले.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#४ #ऑलमपकमधय #४ #सवरणपदक #दललपकष #कम #लकसखयचय #दशतल #पलवनन #घडवल #इतहस

RELATED ARTICLES

Raosaheb Danve : मी रेल्वे मंत्री मात्र, माझ्या गावात अजून रेल्वे नाही : मंत्री रावसाहेब दानवे

Raosaheb Danve : 10 वर्ष आमदार (MLA) त्यानंतर 25 वर्ष खासदार म्हणून काम केले. मात्र अद्यापही माझ्या गावात...

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

Most Popular

‘हा’ पिटुकला प्रिंटर आहे खूपच कामाचा, घरीच प्रिंट करू शकता स्वतःचे फोटो; किंमत खूपच कमी

नवी दिल्ली: वेगवेगळ्या कामांसाठी आपल्याला कागदपत्रं प्रिंट करावी लागतात. अगदी कॉलेजची मार्कशीट असो अथवा छोट्या नोट्स बनवायच्या असतील, आपण दुकानात जाऊन प्रिंट काढतो....

अशी कोणती कागदपत्रं ट्रम्पकडे आहेत, ज्यामुळे FBI घरापर्यंत पोहचली; अमेरिका हादरली

Donald Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवासस्थानी FBIने टाकलेले छापे कशासाठी होते या संदर्भात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अस्वीकरण: ही...

वयाच्या 50 नंतरही राहाल निरोगी आणि फिट; आहार आणि व्यायामाच्या या टिप्स फॉलो करा

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : जेव्हा आपले वय 50 वर्षांपेक्षा जास्त असेल तर आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. योग्य आहार न घेतल्याने...

सुपर चषक फुटबॉल : रेयाल माद्रिदला जेतेपद; अलाबा, बेन्झिमाच्या गोलमुळे एनट्रॅक फ्रँकफर्टवर मात

एपी, हेलसिंकी : डेव्हिड अलाबा आणि कर्णधार करीम बेन्झिमा यांनी केलेल्या गोलच्या बळावर स्पॅनिश संघ रेयाल माद्रिदने जर्मन संघ एनट्रॅक फ्रँकफर्टवर २-० अशी...

मायेची तिजोरी; लेकाचं यश जेव्हा आई फाटक्या साडीमध्ये गुंडाळून ठेवते….

आईने अंचितच्या आतापर्यंतच्या सर्व ट्रॉफी आणि मेडल्स फाटलेल्या साडीत बांधून ठेवल्या आहेत.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...