Saturday, November 27, 2021
Home लाईफस्टाईल 'हो, माझ्या नवऱ्यानं लग्न केलं’, दिया मिर्झासह विवाह केल्यानंतर पतीच्या पहिल्या पत्नीने...

‘हो, माझ्या नवऱ्यानं लग्न केलं’, दिया मिर्झासह विवाह केल्यानंतर पतीच्या पहिल्या पत्नीने सोडलं मौन


ज्या जोडप्यांचे एकमेकांसोबत पटत नाही, त्यांनी त्यांच्या नात्याला कितीही वेळ देण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांच्यात निर्माण झालेला दुरावा कधीही कमी होत नाही, हे बाब नाकारता येणार नाही. अशा जोडप्यांमध्ये दिवसेंदिवस केवळ मतभेद वाढू लागतात, तसंच एकत्र असूनही ते कधीच एकमेकांसोबत नसतात. दरम्यान नात्यात वाद-भांडण वाढवण्यापेक्षा जोडप्यानं वेगळे होणे कधीही चांगलेच.

पण विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की वैवाहिक संबंध तोडल्यानंतरही एखादे जोडपे एकमेकांच्या आनंदाला महत्त्व देऊ शकतात का? बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) चे पती वैभव रेखी (Vaibhav Rekhi) यांच्या पहिल्या पत्नीचं असं म्हणणं आहे की, घटस्फोटानंतरही लोकांना आपले आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. (फोटो सौजन्य -इंडिया टाइम्स/दिया मिर्झा इंस्टाग्राम)
(बॉलिवूडमधील या ५ अभिनेत्रींनी लग्नानंतर आपल्या नावापुढे पतीचे आडनाव जोडले नाही, कारण…)

​सुनैनानं सोडलं मौन

दिया मिर्झाने १५ फेब्रुवारी रोजी उद्योगपती वैभव रेखीसह लग्न केलं. दियानं आपल्या पहिला पती साहिल संघाला घटस्फोट दिला होता. तर वैभव देखील घटस्फोटित आणि एका मुलीचे वडील आहेत. दरम्यान वैभव व दियाच्या लग्नाच्या वृत्ताने सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. पण यादरम्यान बहुतांश लोकांनी वैभवची पहिली पत्नी सुनैनावर निशाणा साधण्यास सुरुवात केली होती. ज्यावर योग इंस्ट्रक्टर सुनैनानं म्हटलं की, ‘हो, माझ्या पतीने दियासोबत लग्न केलं. यादरम्यान मला कित्येक मेसेज आले. ज्याद्वारे लोकांनी विचारलं की मी आणि समायरा ठीक आहोत का?

सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचे आभार मानते, आम्ही पूर्णतः ठीक आहोत. मुंबईमध्ये आमचे नातेवाईक नाहीत आणि ही एक चांगली गोष्ट आहे की आता येथे समायराचं कुटुंब वाढतंय. समायरा तिच्या आईवडिलांच्या नात्यात प्रेम पाहू शकली नाही. आता या वैवाहिक नात्यात तिला प्रेम दिसेल, ही आनंदाची बाब आहे’. सुनैनाने जे काही सांगितलं त्यावरून हे स्पष्ट दिसतंय की आपल्या पतीला त्याच्या आयुष्यात पुढे जाताना पाहून ती खूश आहे.

(Dilip Kumar and Madhubala दिलीप कुमार-मधुबाला यांची प्रेमकहाणी एका अटीमुळे अपूर्ण राहिली, तुम्ही सुद्धा ही चूक करताय?)

​लग्न तुटल्यानंतर वाद कशासाठी?

सामान्यतः जीवनात लग्न मोडल्यानंतर आपल्यापैकी बहुतांश लोकांमध्ये वाद आणि भांडण होत असल्याचं पाहिले जाते. पण ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे की जर दोन लोक वैवाहिक नात्यात खूश नव्हते, मग विभक्त झाल्यानंतर त्यांना एकमेकांचा इतका हेवा का वाटतो? घटस्फोट घेतल्यानंतर आपले नाते कसे टिकवायचे आहे, हे पूर्णपणे पती -पत्नीवर अवलंबून आहे. जर तुम्ही एकमेकांच्या आयुष्यातून पुढे जाऊन नवीन सुरुवात केली, तर समोरासमोर आल्यानंतर एकमेकांचा सामना करण्यास तुम्हाला संकोच वाटणार नाही. त्याचबरोबर दोन्ही कुटुंबातील संबंधही अबाधित राहतील, जे वैभव आणि सुनैनाच्या प्रकरणात पाहायला मिळतंय.

(‘मी त्याला ब्लॉक करेन’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं बॉयफ्रेंडसोबतच्या नात्यावर सोडले मौन, हे करण्यासाठी लागते धैर्य)

​नात्यांचे महत्त्व समजून घेणे गरजेचं

ज्या लोकांना नात्यांतील महत्त्व लक्षात येते, त्यांचे संबंध कधीही खराब होत नाहीत. सैफ अली खान-अमृता सिंह, आमीर खान-किरण राव आणि अर्जुन रामपाल-मेहर जेसिया, मलायका अरोरा-अरबाज खान ही अशी काही जोडपी आहेत ज्यांनी घटस्फोट घेतल्यानंतरही आई-वडिलांची भूमिका उत्तमरित्या निभावत आहेत. पती-पत्नी वेगळे होऊ शकतात, पण आई-वडील विभक्त होऊ शकत नाही, हे त्यांना चांगलंच माहिती आहे. वैभव रेखीसह देखील असेच काहीसे पाहायला मिळाले, जेव्हा त्यांनी दियासह लग्न केलं त्यावेळेस त्यांची मुलगी कायम सोबत होती. दिया सुद्धा तिचा योग्य पद्धतीने सांभाळ करतेय.

(दिलीप कुमार-सायरा यांच्या आयुष्यात मूल का नव्हते? अभिनेत्याशी संबंधित गोष्टी शिकवतात की नेमकं कसं असतं खरं प्रेम)

​नातेसंबंध जपताही येतात

प्रेमाशिवाय जगणे कठीण आहे, हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. पण इच्छा असल्यास आपण प्रेम नसलेले नातेसंबंधही जपू शकता. हे सर्व काही तुमच्या दोघांवर अवलंबून आहे. दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला तर ते नाते टिकवण्याचा निर्णय देखील दोघांनीच घेतला पाहिजे. व्यस्त जीवनशैलीमुळे आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावून बसतो आणि ते दूर गेल्यानंतर आपल्याला त्याची जाणीव होते पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. हे नुकसान टाळण्यासाठी आपण आपल्या मनातील भावना पार्टनरसमोर व्यक्त करणं गरजेचं आहे.

(जेव्हा अमिताभ बच्चन सर्वांसमोर जया यांच्यावर खूप भडकले, बऱ्याचदा महिलांना या समस्येचा करावा लागतो सामना)

दिया मिर्झा

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#ह #मझय #नवऱयन #लगन #कल #दय #मरझसह #ववह #कलयनतर #पतचय #पहलय #पतनन #सडल #मन

RELATED ARTICLES

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची...

Vodafone Idea: Vi ने पुण्यात केले ५जी ट्रायल, मिळाला भन्नाट स्पीड; पाहा डिटेल्स

हायलाइट्स:वीआयने केले ५जी ट्रायल.पुणे आणि गांधीनगरमध्ये पार पडले ट्रायल.ट्रायलसाठी Ericsson, Nokia सारख्या कंपन्यांशी भागीदारी.नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी Vi (Vodafone Idea) ने ५जी...

Most Popular

उर्फी जावेदचा फ्रंट ओपन टॉप, ट्रोलर्स म्हणाले, ‘अचानक सोसाट्याचा वारा आला तर….’

उर्फी जावेदचा विचित्र फॅशन सेन्स, आता तर फ्रंट ओपन टॉप घालून....   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

Corona च्या नव्या स्ट्रेनला WHO नं दिलं नाव, म्हणाले…

जिनेव्हा, 27 नोव्हेंबर: कोरोना व्हायरस (Corona Virus) पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटनं सर्वांचीच चिंता वाढवली आहे. जागतिक...

नवीन कोरोना व्हायरस ‘चिंतेचा’, WHOनं दिलं ‘हे’ नाव, धोका अधिक!

Omicron B.1.1.529 : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नवीन कोरोनाव्हायरस व्हेरिएंट अतिशय "चिंतेचा" ( concern) असल्याचे घोषित केले आहे....

… तर टीम इंडिया DRS साठी नकार देईल! न्यूझीलंडच्या ऑल राऊंडरनं लगावला टोला

कानपूर, 27 नोव्हेंबर:  भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील कानपूर टेस्टच्या दुसऱ्या दिवसावर न्यूझीलंडनं वर्चस्व गाजवलं. टीम साऊदीनं (Tim Southee) 5...

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची...

दररोज फक्त एक ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी जादुई ठरेल! कधी, कशी घ्यायची जाणून घ्या

दिल्ली, 27 नोव्हेंबर: अनेकांना कॉफी (Coffee) प्यायला आवडते. सकाळी झोपेतून उठल्यावर, ऑफिसमध्ये काम करताना किंवा थकल्यावर मेंदू आणि शरीराला पुन्हा तरतरी आणण्यासाठी कॉफी...