पोलंडची खेळाडू Katarzyna Zillmann ही एक रोव्हर खेळाडू आहे. आपल्या टीमसह उत्तम कामगिरी करत तिनं सिल्व्हर मेडल मिळवलं. त्यावेळी आपल्या मैत्रिणीचे आभार मानताना तिनं आपण लेस्बियन से सांगून टाकलं. याबाबत आपण यापूर्वीदेखील जाहीर चर्चा केली असून लोकांना याबाबत चर्चा करायला फारसं आवडत नसल्याचंही जिलमन हिनं म्हटलंय.
काय म्हणाली जिलमन
आपल्या लैंगिक आयुष्याविषयी नागरिकांनी खुलेपणानं बोलायला हवं असं जिलमनचं म्हणणं आहे. यापूर्वीदेखील काही जाहीर मुलाखतींमध्ये आपण लेस्बियन असल्याचं सांगितलं होतं, असं ती म्हणाली. मात्र हा विषय ऑलिम्पिकमध्ये समोर आल्याबद्दल अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत. ऑलिम्पिक हा काही लैंगिक विषयाची चर्चा करण्याचा प्लॅटफॉर्म नाही, असं अनेक टीकाकारांचं म्हणणं आहे. तर याबाबत आपल्याला कुठल्याही प्लॅटफॉर्मवर बोलायला हरकत नसून आपण नेहमीच एलजीबीटी समुदायाचं समर्थन करत असल्याचं जिलमननं म्हटलं आहे.
स्पोर्ट्स अगेन्स्ट होमोफोबिया ही मोहिम सध्या आपण राबवत असून माझी ओळख वापरून याबाबत समाजकार्य करणाऱ्यांना मदत करत असल्याचं जिलमननं सांगितलं आहे. हा संदेश लिहिलेला टी-शर्ट घालून आपण त्यासाठी वावरत असल्याचं ती म्हणते.
हे वाचा -Tokyo Olympics: पुरुष हॉकी सेमीफायनलमध्ये बेल्जियमकडून भारतीय टीमचा 5-2 ने पराभव
खेळाडूच देतात प्रेरणा
आपल्याला या क्षेत्रात करिअर करायचं असून तुम्ही माझ्या आदर्श आहात, असा एक मेसेज रोविंग स्पोर्ट्समध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या मुलीनं जिलमनला पाठवला आहे. असा एक मेसेज हजारो लाखो ट्रोल्सवरचा जालीम उपाय असतो आणि त्यामुळे आपल्याला दुप्पट प्रेरणा मिळते, असं जिलमन सांगते.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#हय #म #लसबयन #आह #ऑलमपक #पदक #जकतच #खळडच #गपयसफट