Saturday, May 21, 2022
Home करमणूक हॉलिवूडसाठी बॉलिवूड सोडणार नाही, महेशबाबू वादानंतर शाहरुखचा जुना Video Viral

हॉलिवूडसाठी बॉलिवूड सोडणार नाही, महेशबाबू वादानंतर शाहरुखचा जुना Video Viral


मुंबई : साउथ फिल्म इंडस्ट्री सध्या चांगलीच फॉर्मात आहे. पुष्पा, आरआरआर, केजीएफ, बीस्ट या दाक्षिणात्य सिनेमांनी टॉलिवूडमध्येच नव्हे तर जगभरात कमाईचा धुमाकूळ घातला आहे. आता सिनेमा इंडस्ट्रीला कोणतीच प्रांतिक बॉर्डर राहिलेली नाही. बॉलिवूडचे अनेक कलाकार साउथच्या सिनेमात झळकतात तर साउथचे कलाकारही हिंदी सिनेमात दिसतात. त्यामुळेच कलाकारांनी आता बॉलिवूड हॉलिवूड आणि टॉलिवूड यांच्यातील सीमा ओलांडल्या आहेत. यावरूनच साउथ सुपरस्टार महेश बाबूला बॉलिवूड पदार्पणाबाबत विचारलं आणि त्याने दिलेल्या उत्तराने वातावरण चांगलच ढवळून निघालं.

महेशबाबू शाहरुख

बॉलिवूडमध्ये कधी येणार या प्रश्नावर बोलताना महेश बाबू म्हणाला की बॉलिवूडला मी परवडणार नाही. माझं मानधन देण्याची बॉलिवूडची आर्थिक ताकद नाही. महेश बाबूने केलेल्या या वक्तव्यावरून चर्चा रंगत आहेत. काही बॉलिवूड कलाकारांनी महेश बाबूच्या या मताचा आदर केला आहे तर काही कलाकारांनी विरोधाचं शस्त्र उपसलं आहे. दिग्दर्शक महेश भट्ट यांनी महेश बाबूच्या निर्णयाचं समर्थन केलं होतं. कंगना रणौतनेही महेश बाबूला पाठिंबा दिला. सुनील शेट्टीने मात्र तुझा चष्मा बदल म्हणत महेश बाबूवर ताशेरे ओढले. एकूणच काय तर महेश बाबू आणि बॉलिवूड प्रकरणात अनेक कलाकार त्यांचं मत व्यक्त करत आहेत.

सलमान भावाचा संसार मोडला, २४ वर्षांनी विभक्त होणार सोहेल- सीमा

महेशबाबू

याच वातावरणात सध्या किंग खान शाहरूख खानचा एक जुना व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. एका मुलाखतीचा हा व्हिडिओ असून यामध्ये शाहरूख खान काहीही झालं तरी हॉलिवूडसाठी बॉलिवूड सोडणार नाही असं सांगताना दिसत आहे.या मुलाखतीत शाहरूखला असं विचारलं की, बॉलिवूडचा सुपरस्टार आहेसच पण हॉलिवूडची ऑफर आली तर घेशील का?

त्यावर शाहरूख म्हणतोय की, मला उंची नाही. मला इंग्रजी बोलता येत नाही. त्यामुळे मला काहीही न बोलणाऱ्या व्यक्तीचा रोल द्यावा लागेल. हॉलिवूडच्या हिरोला लागणारी पर्सनॅलिटी माझ्याकडे नाही. मी हॉलिवूडसाठी योग्य नाही त्यामुळे मला तिथे काहीच स्थान नाही. मला सालसा डान्स येत नाही. अर्थातच त्याच्या चाहत्यांनी किंग खानच्या या उत्तराचं सोशल मीडियावर तोंड भरून कौतुक केलं आहे. म्हणून तू किंग आहेस असं म्हणत त्याच्यावर कमेंट येत आहेत.

झाकीर हुसेन यांनी सोडली नाही पंडित शिवकुमार शर्मांची साथ

शाहरूख खान अजूनही लाखो तरूणींच्या गळ्यातील ताईत आहे. लवकरच तो टायगर ३, रॉकी ओर रानी की प्रेमकहानी या सिनेमात दिसणार आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या या किंग खानने बॉलिवूडसाठी हॉलिवूड सोडणार नाही म्हणत चाहत्यांच्या मनातील स्थान घट्ट केलं आहे. महेश बाबूच्या वक्तव्याने तापलेल्या वातावरणात शाहरुखच्या या जुन्या व्हिडिओला हजारो लाइक्स मिळत आहेत.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#हलवडसठ #बलवड #सडणर #नह #महशबब #वदनतर #शहरखच #जन #Video #Viral

RELATED ARTICLES

वर्षभरापूर्वी लग्न;4 दिवसांपूर्वी अपघातात गमावला पती,नंतर पत्नीचं धक्कादायक पाऊल

मध्य प्रदेश, 21 मे: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) निवारीमध्ये पतीच्या मृत्यूने पत्नीला इतका धक्का बसला की आत्महत्या करण्यासाठी तिने ओरछा येथील जहांगीर महल...

IPL 2022 : दोन कारणांमुळे दिल्ली कॅपिटल्स अडचणीत, आता चूक झाली तर खेळ समाप्त

मुंबई, 21 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील साखळी फेरीचे सामने रविवारी संपणार आहेत. शनिवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians...

मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180, वडाळा आरटीओ, विजयनगर

BMC Election 2022 Ward 180, Wadala RTO, Vijayanagar : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180  हा वडाळा आरटीओ, विजयनगर...

Most Popular

”भारतातील परिस्थिती चांगली नाही”,लंडनमध्ये जाऊन राहुल गांधींचा BJP वर हल्लाबोल

लंडन, 21 मे: काँग्रेस (Congress) पक्षाची सध्याची स्थिती फारशी चांगली नाही. गुजरातमध्ये तर विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकण्यास सुरुवात केली आहे....

दोन ट्रक-कारचा अपघात, जबरदस्त धडकेनंतर भीषण आग; Live Video

गुजरात, 21 मे: गुजरातच्या (Gujarat) अरवली जिल्ह्यात (Aravali District) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन ट्रक आणि कारची एकमेकांना धडक बसली. ही...

Vastu Tips घरामध्ये ‘अशा’ प्रकारे वापरा कापूर! सकारात्मकता येईल आणि धनातही वाढ होईल, जाणून घ्या

Vastu Tips : तुमच्या घरात जर आनंदाचे वातावरण असावे असे तुम्हाला वाटत असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घरातील...

दैनंदिन राशिभविष्य : आर्थिक लाभ होणार पण ‘या’ राशीने मात्र खर्च टाळावा

आज दिनांक 21 मे 2022 वार शनिवार. आज वैशाख कृष्ण षष्ठी. चंद्र आज मकर राशीत भ्रमण करेल. तिथून तो राहुशी केंद्र योग करेल. पाहूया आजचे...

Sim Card: तुमच्या नावावर किती जणांनी घेतले आहे सिम कार्ड? या सोप्या प्रोसेसने मिळेल संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : Sim Card: आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकाकडे असणे गरजेचे झाले आहे. प्रत्येक कामासाठी आज आधार कार्ड अनिवार्य आहे. बँकेत...

Lal Mahal Lawani : लाल महालात चंद्रा गाण्यावर रिल्सचं शुट

Lal Mahal Lawani : पुण्याच्या लाल महालात लावणी सादर केल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात  चौघांविरुद्ध...