Monday, July 4, 2022
Home लाईफस्टाईल हृदयविकाराची नेमकी कारणे कोणती ? जाणून घ्या प्रतिबंधात्मक उपाय

हृदयविकाराची नेमकी कारणे कोणती ? जाणून घ्या प्रतिबंधात्मक उपाय


Health Tips : सध्याच्या धावपळीच्या जीवनात हृदयविकाराचे प्रमाण फार मोठ्या संख्येने वाढताना दिसते आहे. आपल्या आजूबाजूला हृदयविकारा संबंधित अनेक घटना आपण ऐकल्या आहेत. नुकतेच गायक केके हे सुद्धा हृदयविकाराच्या झटक्यानेच त्यांचे निधन झाले.    बदलती जीवनशैली, अवेळी जेवण, बाहरेचं खाणं या सगळ्या गोष्टी तर कारणीभूत आहेतच. पण, या बरोबरच अजून कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत. या संदर्भात डॉ. प्रताप सी. रेड्डी, अध्यक्ष, अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप यांनी माहिती दिली आहे जाणून घ्या. 

हृदयविकार ‘सायलेंट किलर’ ठरू शकतो का?

सुमारे 75 टक्के रुग्णांना आपल्या या आजाराची कल्पना नसते, परिणामी केवळ एक चतुर्थांश रुग्ण आपल्यात दिसून येणाऱ्या लक्षणांवर कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय किंवा शस्त्रक्रियेचे उपचार घेत राहतात. आज, ‘इस्केमिक हार्ट डिसीज’ सारखे हृदय आणि रक्तवाहिन्या संबंधीचे रोग आणि ‘स्ट्रोक’ सारखे ‘सेरेब्रोव्हॅस्क्युलर इव्हेंट्स’ ही जागतिक स्तरावर मृत्यूची प्रमुख कारणे बनली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, जगभरातील या मृत्यूंपैकी एक पंचमांश मृत्यू भारतात होतात विशेषत: सर्वात चिंताजनक बाब अशी की हे सर्व भारतीय 20 ते 40 वयोगटातील तरुण आहेत आणि तरुणांमध्ये त्यांचे प्रमाण वाढते आहे.

हृदयक्रिया अचानक बंद पडण्याची कारणे?

सध्याच्या धावपळीच्या काळात अनेकदा शरीराकडे लक्ष देणे आपण टाळतो. यातूनच ताणतणाव, उच्च उष्मांक असलेला आणि असंतुलित आहार आणि कमी शारीरिक हालचाली यांसारख्या अनेक घटना हृदयविकाराच्या वाढीला कारणीभूत ठरत आहेत.

हृदयविकार प्रतिबंधक धोरणांमुळे टाळता येऊ शकतात का?

हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या अकाली मृत्यूंपैकी 80 टक्के मृत्यू हे आरोग्याचे सक्रिय व्यवस्थापन आणि जोखीम कमी करण्यासाठीचे प्रतिबंधक धोरण यांमुळे टाळता येऊ शकतात. या जोखमीच्या घटकांचा प्रभाव कमी करण्यासाठी आपण आरोग्य संवर्धन आणि प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला पाहिजे. आरोग्यविषयक मूलभूत स्थिती समजून घेतल्याशिवाय, केवळ वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रित केलेले निरोगीपणाचे पारंपरिक कार्यक्रम यापुढे पुरेसे ठरणार नाहीत. विविध चाचण्यांची आणि त्वरीत निदानाची मजबूत क्षमता उभारणे, त्याचबरोबर जनजागृतीचे उपक्रम राबविणे यातून या दिशेने काही भरीव कार्य होऊ शकते. प्रत्येक व्यक्तीचा कौटुंबिक इतिहास आणि त्याची जीवनशैली वेगवेगळी असते. त्यांचा सकारात्मक विचार करून एक प्रभावशाली कार्यक्रम तयार करणे, या व्यक्तींना विश्वासार्ह आरोग्य माहिती पुरविणे आणि स्वत:च्या आरोग्याची सक्रियपणे जबाबदारी घेण्यास त्यांना प्रोत्साहित करणे या गोष्टी करणे आवश्यक आहे.

आपत्कालीन परिस्थितीत काय कराल?

आपत्कालीन परिस्थितीत वेळ महत्वाचा असतो आणि रुग्णाने लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचणे महत्वाचे असते. सध्या ठिकठिकाणी ‘इमर्जन्सी कार्डियाक अॅम्ब्युलन्स’ सेवा मोफत उपलब्ध असते. रूग्णालयात नेण्यात येत असतानाही रुग्णावर तात्काळ स्वरुपात रूग्णवाहिकेत प्राथमिक उपचार करता येतात. प्रत्येकाने या अशा रुग्णवाहिका सेवांचे फोन नंबर जवळ ठेवले पाहिजेत; जेणेकरून आणीबाणीच्या काळात ही सेवा मिळविणे सोपे होईल.

महत्वाच्या बातम्या : 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#हदयवकरच #नमक #करण #कणत #जणन #घय #परतबधतमक #उपय

RELATED ARTICLES

धर्म, मानवता आणि वेदांताचा सुरेख मिलाप घालणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात…

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

Most Popular

पाचव्या टेस्टवर टीम इंडियाची पकड, बॉलर्सच्या धमाक्यामुळे 132 रनची आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट मॅचवर टीम इंडियाची (India vs England 5th Test) पकड आणखी मजबूत झाली आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी...

धर्म, मानवता आणि वेदांताचा सुरेख मिलाप घालणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात…

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा...

Todays Headline 4th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

टरबूजाच्या बिया विवाहित पुरुषांसाठी वरदान, जोडीदाराकडून होईल प्रेमाचा वर्षाव

मुंबई, 3 जुलै : लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Men's Health) नसेल तर वैवाहिक जीवन आनंदी (Happy Marital Life) होते. त्यामुळे लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Physical...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

स्टोक्सला मिळाल्या दोन लाईफलाईन, पण लॉर्ड ठाकूरने केलं काम तमाम! Video

एजबॅस्टन, 3 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test) यांच्यातल्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी...