मुंबई: मालिकांचे प्रमोशन किंवा मालिकेची उत्सुकता निर्माण करण्यासाठी नवीन फंडे काढले जातात. त्यासाठी मालिकांमध्ये काही दृश्य अतिरंजित केली जातात. त्यामुळं एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलीन करण्यापासून ते लोकांच्या भावना भडकवण्यापर्यंतचे मुद्दे आता समोर येत आहेत. असं असतानाच अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील एका दृश्यावर प्रेक्षकांना नाराजी व्यक्त केली आहे.
नुकताच मालिकेत एक सीन दाखवण्यात आला होता. स्वीटूचा चुलत भाऊ चिन्या रेल्वेने प्रवास करत असतो. तर नेहमीच कटकारस्थानं करणारा मोहित त्याच डब्ब्यातून प्रवास करताना दाखवला आहे. चिन्या लोकलच्या दरवाज्यात उभा असतो. हे पाहून मोहित त्याच्या एका हातावर सेफ्टीपीन टोचवतो. त्यामुळं खांबाला धरून उभा असलेला चिन्याचा हात निसटतो आणि तो खाली पडतो.
हे दृश्य पाहून प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. गरिबांची थट्टा , त्यांच्या विरोधात नेहमी कटकारस्थानं दाखवणं ही एक विकृती असल्याचं मत प्रेक्षकांनी व्यक्त केलं आहे.
हे दृश्य पाहून प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. गरिबांची थट्टा , त्यांच्या विरोधात नेहमी कटकारस्थानं दाखवणं ही एक विकृती असल्याचं मत प्रेक्षकांनी व्यक्त केलं आहे.
तसंच मालविका साळवींचं घर स्वत:च्या नावावर करुन घेते आणि घर खाली करण्यासाठी काही गुंडांना पाठवते. गुंड ज्या प्रकारे साळवी कुटुंबाला घराबाहेर काढतात ते पाहूनही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्ती केली आहे

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#ह #तर #वकत #मरठ #मलकतल #त #दशय #पहन #परकषक #भडकल