Saturday, July 2, 2022
Home भारत हिमाचल प्रदेशात दरड कोसळून मोठी दुर्घटना; ढिगाऱ्याखाली 80 नागरिक अडकल्याची भीती

हिमाचल प्रदेशात दरड कोसळून मोठी दुर्घटना; ढिगाऱ्याखाली 80 नागरिक अडकल्याची भीती


किन्नौर, 11 ऑगस्ट : हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) किन्नौर (Kinnaur) येथे पुन्हा एकदा दरड कोसळून (landslide) मोठी दुर्घटना घडली आहे. किन्नौर जिल्ह्यातील निगुलसेरी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 5 वर ही दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून थेट एचआरटीसी बसवर आली यामुळे ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. किन्नौर जिल्ह्यातील मुरंग-हरिद्वार मार्गावर ही बस चालते. या मार्गावरुन जाणाऱ्या अनेक गाड्यांवर दरड कोसळल्याने गाड्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या आहेत.

घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, सैन्य दलाचे जवान घटनास्थळी मदत आणि बचावकार्यासाठी दाखल झाले आहेत. मोठ्या वेगाने बचावकार्य सुरू कऱण्यात आले आहे. या दुर्घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासोबत फोनवरुन घटनेची माहिती घेत सर्व योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दरड कोसळल्याची माहिती सर्वप्रथम बसच्या चालकाने दिली. या बसमध्ये जवळपास 35 ते 40 प्रवासी प्रवास करत होते. किन्नौर येथील भावानगर जवळ ही दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर बस दिसेनाशीच झाली आहे. अनेक गाड्यांवर दरड कोसळल्याने जवळपास 80 नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

25 जुलै रोजी सुद्धा घडली होती दुर्घटना

गेल्या महिन्यात म्हणजेच 25 जुलै रोजी सुद्धा किन्नौर येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. सांगला-छितकूल मार्गावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांनी आपले प्राण गमावले होते. तर तीन जण जखमी झाले होते. हिमाचल प्रदेशात जोरदार पाऊस कोसळत आहे आणि त्याच दरम्यान अशा दुर्घटना घडत आहेत.

Published by:Sunil Desale

First published:

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#हमचल #परदशत #दरड #कसळन #मठ #दरघटन #ढगऱयखल #नगरक #अडकलयच #भत

RELATED ARTICLES

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंकडून व्हीप जारी, बंडखोर काय करणार?

मुंबंई, 2 जुलै : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेनेतील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील मुख्य...

Most Popular

आता Smartphone वर करता येईल कमाई, या Apps चा वापर करुन पैसे कमावण्याची संधी

नवी दिल्ली, 1 जुलै : सध्याच्या काळात इंटरनेट आणि स्मार्टफोन प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यामुळे जवळपास सर्वच गोष्टी ऑनलाइन करता येतात....

दिया मिर्झाने केले उद्धव ठाकरेंचे कौतुक, भडकले ‘द कश्मीर फाइल्स’फेम विवेक अग्निहोत्री

मुंबई: एखाद्या सिनेमा-मालिकेतील भासावेत असे 'ट्विस्ट अँड टर्न्स' महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Political Crisis) पाहायला मिळाले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रिपद सोडावे...

VIDEO: संयमी द्रविडचं हे रूप पाहिलं नसेल, पंतच्या शतकानंतर केलं असं सेलिब्रेशन

नवी दिल्ली, 02 जून : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 व्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऋषभ पंतने एजबॅस्टन येथे 'वन मॅन शो' कामगिरी...

पूरग्रस्त चिपळूणकरांसाठी देण्यात आलेल्या तूर डाळीला लागला भुंगा, पुरवठा विभागाचा गलथानपणा समोर

Tur dal : अन्न आणि पुरवठा विभागातील गलथान कारभाराचा एक नमुना पुढे आला आहे. जुलै 2021 मध्ये पूर...

7 दिवसात बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई; 50 कोटींहून अधिक कमाई

मुंबई, 01 जुलै: वरूण धवन ( varun dhawan)  कियारा अडवाणी (  kiara advani)  नीतु कपूर ( Neetu Kapoor) आणि अनिल कपूर ( Anil Kapoor) यांच्या...