Saturday, July 2, 2022
Home भारत हिमाचलमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसवर दरड कोसळली, दरडीखाली 30 जण अडकल्याची शक्यता

हिमाचलमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसवर दरड कोसळली, दरडीखाली 30 जण अडकल्याची शक्यता
शिमला : हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यात आपल्याकडे झालेल्या तळीये दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. किन्नौर जिल्ह्यातील महामार्गावर दरड कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात दरडीखाली प्रवासी बस आणि काही लहान वाहने ढिगाऱ्याखाली अडकली. या दरड दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता आहे.

दुपारी पावणे एकच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचं कळतंय. बचावकार्य सुरू असून एक मृतदेह हाती लागला आहे. घटनास्थळी मोठे दगड कोसळत असल्याने बचावकार्यात अडथळा येत आहे. प्रवासी बस मधील 25-30 प्रवासी अद्याप बेपत्ता आहे. त्यातील सहा जणांना वाचवण्यात यश आले आहे.

मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी घेतली अपघाताची माहिती

किन्नोर येथे झालेल्या अपघातानंतर मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना बचाव कार्य वेगाने करण्याच्या सूचना दिल्या आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकुर म्हणाले, "मी पोलिसांना आणि स्थानिक प्रशासनाला बचाव कार्य वेगाने करण्याचे आदेश दिले आहेत. एनडीआरएफ ला देखील अलर्ट दिला आहे. एक प्रवासी बस आणि कार अडकल्याची माहिती मिळाली आहे. या बद्दलची सविस्तर माहिती अद्याप मिळालेली नाही. किन्नोर येथे झालेल्या अपघातानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांनी फोन करून अपघाताची माहिती घेतली. तसेच घटनास्थली लवकरात लवकर सुविधा पोहचवण्याचे आदेश दिले आहे.

एनडीआरएफ आणि आरोग्य विभागाला अलर्ट

मिळालेल्या माहितीनुसार बसमध्ये किती प्रवासी आहेत हे सरकारकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ज्या स्थानकावरून बस निघाली त्या ठिकाणावरून बसमधील प्रवाशांची यादी मागवण्यात आली आहे. एनडीआरएफ आणि आरोग्य विभागाला अलर्ट देण्यात आला आहे.

बचावकार्यात अडथळे

कमिशनर आबिद हुसैन सादिक म्हणाले, घटनास्थळी बचावकार्य वेगाने सुरू आहे. परंतु अजूनही दगड कोसळत असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहे. अद्याप घटनेची सविस्तर माहिती पुढे आलेली नाही. स्थानिक प्रशासन आणि पोलिस वेगाने काम करत आहे

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#हमचलमधय #परवशन #भरललय #बसवर #दरड #कसळल #दरडखल #जण #अडकलयच #शकयत

RELATED ARTICLES

Sanjay Kute on BJP Politics : देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्याच बेबनाव? ABP Majha

शिवसेनेच्या बंडखोरीत आमदारांसोबत सातत्यानं दिसले ते भाजपचे संजय कुटे....  सुरतपासून शिवसेनेच्या आमदारांसोबत असलेल्या संजय कुटेंनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिलीए... संजय कुटे हे...

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

Health Tips : जास्त जांभूळ खात असाल तर वेळीच सावध व्हा; अन्यथा…

जांभळाचे जास्त सेवन केल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते. वास्तविक, यामध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते, अशा परिस्थितीत त्याचे जास्त सेवन करणे बद्धकोष्ठतेचे कारण असू...

Most Popular

WhatsApp यूजर्संना भेट, दोन दिवसांनंतरचे मेसेजही डिलीट करता येणार, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीःwhatsapp upcoming feature update soon : WhatsApp आपल्या यूजर्सचे मन जिंकण्यासाठी लागोपाठ आपल्या अॅपमध्ये अपडेट आणत आहे. व्हॉट्सअॅपवर मेसेज डिलीट करण्याचे फीचर...

Smartphone Offers: प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याची योग्य वेळ, Samsung Galaxy S21 FE 5G वर मिळतोय ३७ हजारांपर्यंत ऑफ

नवी दिल्ली:Samsung Galaxy S21 FE 5G Price: प्रीमियम सेगमेंटचा स्मार्टफोन खरेदी करायची प्रत्येक युजरची इच्छा असते. पण, जास्त किमतींमुळे, असे हँडसेट बर्‍याच युजर्ससाठी...

Todays Headline 2nd July : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम...

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

संरक्षण क्षेत्रात भारताला मोठं यश, डीआरडीओने केली मानवरहित विमानाची उड्डाण चाचणी

बंगळुरू, 1 जुलै : भारताने संरक्षण क्षेत्रात (Indian Defence Sector) मोठी कामगिरी केली आहे. डीआरडीओद्वारा (DRDO) विकसित करण्यात आलेल्या मानवरहित विमानाचे (Unmanned Aircraft) पहिले उड्डाण...