आता त्यांच्या लढ्याला यश आलं आहे. आता हे दोन्ही समुदाय कार्डिफच्या लंडन रोविन क्लब येथील टॅफ नदीत अस्थी विसर्जन करू शकणार आहेत. शनिवारपासून याठिकाणी अस्थी विसर्जन करायला सुरुवात झाली आहे. संबंधित कार्यक्रमांत कार्डिफ काऊंन्सिलचे सदस्य आणि मंत्री मार्क ड्रेकफोर्ड यांनी देखील या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली होती.
हेही वाचा-आयर्लंडमध्ये शेकडो वर्षं जुनं शिवलिंग, पाहा रहस्यमय शिवलिंगाचा इतिहास
2016 मध्ये स्थापित झालेल्या अंत्यसंस्कार ग्रुप ऑफ वेल्स (ASGW) च्या अध्यक्षा विमला पटेल यांनी सांगितलं की, ‘कार्डिफ काऊंन्सिलनं या बांधकामासाठी आर्थिक मदत दिली आहे. साऊथ वेल्समध्ये राहणाऱ्या हिंदू आणि शीख समुदायाच्या सदस्यांनी देखील आर्थिक योगदान दिलं आहे.’ ‘अनेक वर्षांच्या संघर्षानंतर, शेवटी आमच्यासाठी याठिकाणी एक ठिकाण मंजूर करण्यात आलं आहे. जेथे हिंदू आणि शीख समुदायातील लोकं येऊन आपल्या प्रियजनाच्या अस्थी विसर्जित करू शकतात,’ असंही पटेल यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा-…म्हणून पुणेकर जगात भारी; EcoKaari वस्तूंची जर्मनी, ब्रिटन, अमेरिकेतही निर्यात
हिंदू आणि शीख समुदायाच्या अंत्यसंस्कारासाठी समर्पित जागा नसल्याचा मुद्दा सर्वप्रथम 1999 मध्ये जसवंत सिंग यांनी कार्डिफ काऊंन्सिलकडे उपस्थित केला होता. 2013 मध्ये, ASGWच्या चन्नी कलेर यांच्या प्रयत्नातून जागा शोधण्याच्या मोहिमेला चालना मिळाली. यासाठी कलेर यांनी अनेक हिंदू आणि शीख संस्थांशी संपर्क साधला होता. पटेल यांनी सांगितलं होते की, वेल्समध्ये हिंदू आणि शिखांच्या तीन पिढ्या राहत आहेत. पहिल्या पिढीला अस्थी विसर्जन करण्यासाठी आपल्या मायदेशी जावं लागतं होतं.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#हदशख #समदयल #UKमधयह #करत #यणर #असथ #वसरजन #अनक #वरषचय #सघरषल #आल #यश