Saturday, May 21, 2022
Home लाईफस्टाईल हार्ट फेल्युअर म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

हार्ट फेल्युअर म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय


Heart Failure Awareness Month : हार्ट फेल्युअर हा आजार हृदयाशी संबंधित आहे. भारतात जवळपास 1 कोटी रूग्ण या आजाराशी संबंधित आहेत. आपल्या हृदयाशी संबंधित असणाऱ्या या आजाराकडे फारसे लक्ष दिले जात नाही. आणि त्यामुळे गंभीर परिणाम होतात. खरंतर हृदयाशी संबंधित कोणता आजार होतो किंवा तो आजार झाला आहे हे आपल्याला अनेकदा कळत नाही. आणि त्यामुळे याची जनजागृती करणे तितकेच महत्वाचे आहे. जनजागृतीमुळे हार्ट फेल्युअरची स्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास कशाप्रकारे मदत होऊ शकते हे तज्ज्ञांनी वारंवार सांगितले आहे. हृदयाशी संबंधित या आजाराच्या धोक्याचे घटक आणि याची लक्षणे समजून घेणे महत्त्वाचे आहे. ही लक्षणं कोणती ते जाणून घ्या. 

हार्ट फेल्युअर म्हणजे काय ?

जवळपास 17 टक्के रूग्णांचे हार्ट फेल्युअर या आजाराचे निदान झाल्यानंतर 90 दिवसांमध्ये मृत्यू होतो. या साठीच वेळीच उपचार होणे गरजेचे आहे. उपचार मिळविण्यासाठी रुग्णांनी आपल्या हृदयरोगतज्ज्ञांना कोणताही आडपडदा न ठेवता आपली सर्व माहिती देणे आणि त्यांच्या सातत्याने संपर्कात राहणे गरजेचे आहे. अशा वेळी जीवनशैलीमध्ये सुधारणा करून वेळोवेळी उपचार घेऊन, तसेच व्यायाम, योग करून तुम्ही यावर मात करू शकता. तसेच निरोगी आयुष्य जगू शकता. त्याचप्रमाणे शरीरात जर काही बदल जाणवत असतील तर वेळीच याबाबत डॉक्टरांना माहिती देणे गरजेचे आहे.    

या संदर्भात, मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील कार्डिअक सायन्सेस विभागाचे संचालक डॉ. जमशेद दलाल म्हणतात, “माझ्या प्रॅक्टिसदरम्यान गेल्या वर्षभरात हार्ट फेल्युअरच्या प्रमाणात जवळ-जवळ 20 टक्‍के वाढ झाल्याचे मी पाहिले आहे. जागरुकतेचा अभाव आणि हार्ट फेल्युअरविषयीचे गैरसमज या गोष्टी यामध्ये अडचण निर्माण करत आहेत. त्यामुळे वेळीच उपचार होत नाहीत. औषधांपासून ते प्रगत उपकरणे आणि शस्त्रक्रियांपर्यंत उपचारांचे विविध पर्याय वापरून या आजाराचे परिणामकारकरित्या व्यवस्थापन करता येते. या आजारावर अनेक औषधे उपलब्ध आहेत. त्यापैकी अलीकडेच उपलब्ध झालेली काही औषधे तुमच्या जीवनमानाचा दर्जा वाढवितातच पण त्याचबरोबर हृदयाच्या कार्यामध्ये सुधारणा घडवून आणत आयुष्यही वाढवितात’. 

हार्ट फेल्युअरची लक्षणं : 

  • धाप लागणे, थकवा, पाय वा पोटाला सूज येणे.
  • विनाकारण वजन वाढणे.
  • नेहमीची कामे करताना थकवा येणे.
  • झोपताना श्वास नीट घेता यावा यासाठी पायाखाली उशी घ्यावी लागणे.

यांसारख्या सरसकट आढळून येणा-या लक्षणांकडे रुग्णांनी नेहमी लक्ष देणे गरजेचे आहे. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculatorअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#हरट #फलयअर #महणज #कय #जणन #घय #लकषण #आण #उपय

RELATED ARTICLES

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

Sim Card: तुमच्या नावावर किती जणांनी घेतले आहे सिम कार्ड? या सोप्या प्रोसेसने मिळेल संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : Sim Card: आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकाकडे असणे गरजेचे झाले आहे. प्रत्येक कामासाठी आज आधार कार्ड अनिवार्य आहे. बँकेत...

”भारतातील परिस्थिती चांगली नाही”,लंडनमध्ये जाऊन राहुल गांधींचा BJP वर हल्लाबोल

लंडन, 21 मे: काँग्रेस (Congress) पक्षाची सध्याची स्थिती फारशी चांगली नाही. गुजरातमध्ये तर विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकण्यास सुरुवात केली आहे....

Most Popular

तुमचं मूलही दिवसेंदिवस लठ्ठ होत चालंलय? आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घ्या उपाय

नवी दिल्ली, 21 मे : अ‌ॅक्टीव नसल्यामुळे किंवा अनेक कारणांमुळे लहान वयातच अनेक मुले लठ्ठ होत आहेत. चाइल्डहुड ओबेसिटी रिपोर्टनुसार (Childhood Obesity Report)...

कोरोनानंतर भारतावर आता Monkeypox चा धोका; मार्गदर्शक सूचना जाहीर

मुंबई : काही देशांमध्ये नवा संसर्ग मंकीपॉक्सचं प्रमाण वाढताना दिसतंय. यानंतर आता भारतातही खबरदारीचे उपाय सुरू झाले आहेत. त्यामुळे आता परिस्थितीवर बारकाईने लक्ष...

Flood News : अरे बापरे! 2251 गावे पुराच्या पाण्याखाली, 7.12 लाख लोक प्रभावित

गुवाहाटी : Asaam Flood : आसाममध्ये धोधो पाऊस कोसळला. यामुळे मोठा पूर आला आणि हजारो घरे पुराच्या पाण्यााखाली गेलीत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन...

श्रीकृष्ण जन्मभूमीवर बांधलीये इदगाह मशीद?; मंदिर- मशीद वाद नेमका काय?

मथुराः वाराणसीतील काशी विश्वेशर मंदिराच्या बाजूला उभ्या असलेल्या ज्ञानवापी मशिदीवरुन सध्या देशातील वातावरण तापलं आहे. ज्ञानवापी मंदिराच्या सर्व्हेक्षणात शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात...

बळकावलेल्या भागात चीनकडून पूल; परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण

परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरणवृत्तसंस्था, नवी दिल्ली: सन १९६०पासून चीनने बळकावलेल्या भागात सध्या पूलउभारणी सुरू आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. लडाखमधील पँगाँग सरोवराच्या...

अभिनंदन नीता भाभी…; नीता अंबानींविषयी केलेलं विजय मल्ल्याचं ते ट्विट व्हायरल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं भवितव्य आता मुंबई इंडियन्सच्या हातात आहे. अशातच विजय मल्लाचं ट्विट व्हायरल झालं आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...