Saturday, August 20, 2022
Home लाईफस्टाईल हंगामी सर्दी-तापाची लक्षणं कशी असतात? कोरोना आणि हंगामी तापातील फरक असा ओळखा

हंगामी सर्दी-तापाची लक्षणं कशी असतात? कोरोना आणि हंगामी तापातील फरक असा ओळखा


नवी दिल्ली, 04 जुलै : सीझनल फ्लू म्हणजे हंगामी ताप हा सर्व ऋतूंमध्ये आढळणारा फ्लू आहे. उन्हाळ्यात उष्माघात किंवा निर्जलीकरणामुळे होतो तर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात सर्दी आणि फ्लूच्या माध्यमातून शरीरात घुसतो. आता थंडीचा हंगाम सुरू होऊन दीड महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. हा हंगामी ताप आता आपला प्रभाव दाखवत आहे. किंबहुना, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस आणि घसरलेले तापमान यामुळे अनेकांना सर्दी-खोकला-सर्दी अशी लक्षणे दिसू लागली आहेत. कोरोना साथीच्या काळात आपल्याला हंगामी फ्लूबद्दल अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. नवीन अभ्यासांवरून आरोग्य तज्ज्ञ सल्ला देतात की, जर अशी लक्षणे तीन दिवसांपेक्षा जास्त काळ टिकून राहिली तर त्वरित चाचणी करा. कारण ही लक्षणे कोरोना (Covid-19) ची देखील असू शकतात. अशा स्थितीत या हंगामी फ्लूची लक्षणे काय आहेत हे जाणून घेणे (Symptoms of Seasonal Flu) आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.

सामान्य फ्लू आणि कोरोनाची लक्षणे खूप समान आहेत. यामुळेच अनेकवेळा लोक सर्दी किंवा ताप आल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचा विचार करून घाबरतात आणि अनावश्यक ताण घेऊ लागतात.

हंगामी फ्लूची लक्षणे

हंगामी फ्लूची ताप किंवा थंडी वाजून येणे, खोकला, धाप लागणे, थकवा, घसा खवखवणे, नाक बंद होणे, डोकेदुखी, स्नायू दुखणे किंवा शरीर दुखणे, अशी लक्षणे असतात. सध्याच्या काळात कोविड-19 आणि सिझनल फ्लू अशी दोन्ही प्रकारचे रुग्ण आढळत असल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये.

हे वाचा – Men’s Health 40 : तुम्हीही चाळिशी पार केलीय? मग आहारात या 5 गोष्टी असायलाच हव्यात

वेगळे काय

कोविड-19 ची वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे म्हणजे सतत खोकला, उच्च तापमान, चव आणि वास कमी होणे, अशी लक्षणे हंगामी फ्लूमध्ये दिसत नाहीत. मात्र, ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकारात चव किंवा वासाची समस्याही दिसत नाही. तुमची लक्षणे दोन ते चार दिवस राहिल्यास आणि कोविड-19 ची शंका असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर त्याची तपासणी करा.

हे वाचा – कांदा-लसूण खाल्ल्यानंतर चार-चौघात तोंड उघडण्याची होते पंचाईत? दुर्गंधी घालवण्याचे हे आहेत उपाय

तज्ज्ञ काय म्हणतात

एनबीसी न्यूजच्या एका लेखात, अमेरिकेतील मेरीलँड विद्यापीठाशी (University of Maryland) संलग्न असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे सहायक संशोधन प्राध्यापक कर्स्टन कोलमन (Kristen K. Coleman)  म्हणतात, “खोकला, सर्दी, ताप, थकवा आणि स्नायू दुखणे ही सामान्य लक्षणे आहेत. हे सर्व सामान्य फ्लूमध्ये आणि कोरोना (कोविड-19) संसर्गाच्या वेळी देखील दिसतात. पण तोंडाची चव गेली किंवा वास निघून गेला तर हे कोरोनाचे स्पष्ट लक्षण असू शकते. याशिवाय, सर्दीमुळे सतत नाक वाहणे, घसा खवखवणे, हे देखील कोरोनाचे सौम्य ते मध्यम लक्षण असू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#हगम #सरदतपच #लकषण #कश #असतत #करन #आण #हगम #तपतल #फरक #अस #ओळख

RELATED ARTICLES

रिकाम्या खुर्च्या अन् थिएटरमध्ये सन्नाटा! तापसीच्या ‘दोबारा’कडेही प्रेक्षकांनी फिरवली पाठ!

Do baaraa : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिचा बहुचर्चित ‘दोबारा’ (Dobaaraa) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला...

कॅन्सरग्रस्तांच्या मृत्यूमागे नेमकं कारण काय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

वृत्तसंस्था, वॉशिंग्टन : जगभरात २०१९मध्ये ४४.५ लाख कॅन्सरग्रस्तांच्या मृत्यूमागे धूम्रपान, मद्यपान, उच्च स्तरावरील बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) यांसह अन्य जोखीम घटक कारणीभूत आहेत,...

मुंबईत 111, तर ठाण्यात 37 गोविंदा जखमी; काल दिवसभरात 88 गोविंदांवर उपचार करुन डिस्चार्ज

Dahi Handi Festival 2022 : यंदा तब्बल दोन वर्षांनंतर राज्यसभारत दहीहंडी (Dahi Handi) उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात...

Most Popular

भुतियाचा भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज

नवी दिल्ली : भारताचा माजी फुटबॉल कर्णधार बायच्युंग भुतियाने सध्या चर्चेत असलेल्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) निवडणुकीत थेट अध्यक्षपदासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज...

20th August 2022 Important Events : 20 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

20th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. आणि ऑगस्ट महिन्यातील आजचा दिवस म्हणजेच 20...

औरंगाबादमधील भोंदूबाबाचा भांडाफोड, डोक्यावर हात ठेऊन आजार बरे करण्याचा दावा

Aurangabad Bhondubaba : मंडळी कोणी तुमच्या डोक्यावर हात ठेवल्याने तुमचे दुर्धर आजार बरे होतात असं म्हटलं तर आपण...

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज नऊ वर्ष, प्रकरणात आतापर्यंत काय झालं? वाचा सविस्तर…

Dr. Narendra Dabholkar Murder Case : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या...