Saturday, July 2, 2022
Home टेक-गॅजेट स्वस्तात मस्त! ७ हजारांच्या बजेटमध्ये मिळतायत ‘हे’ दमदार फीचर्ससह येणारे स्मार्टफोन्स

स्वस्तात मस्त! ७ हजारांच्या बजेटमध्ये मिळतायत ‘हे’ दमदार फीचर्ससह येणारे स्मार्टफोन्स


Smartphone Under 7000: नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल व बजेट कमी असल्यास काळजी करण्याचे कारण नाही. बाजारात अगदी ५ हजार ते ७ हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणारे एकापेक्षा एक शानदार स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. तुम्ही अगदी ७ हजारांच्या बजेटमध्ये रेडमी, नोकिया, टेक्नो सारख्या ब्रँड्सचे स्मार्टफोन्स खरेदी करू शकता. तुम्ही जर सध्या फीचर फोन वापरत असाल व स्मार्टफोनमध्ये अपग्रेड करण्याचा विचार असल्यास हे फोन तुमच्यासाठी चांगले पर्याय ठरतील. या एंट्री लेव्हल स्मार्टफोन्सच्या माध्यमातून तुम्ही कॉलिंग, चॅटिंग, सोशल मीडिया इत्यादी कामे अगदी सहज करू शकता. या किंमतीत तुम्ही Redmi 9A Sport, JioPhone Next, Nokia C01 Plus, Lava X2 आणि Tecno Pop 5 LTE सारखे स्मार्टफोन्स खरेदी करू शकता. या फोन्सच्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Redmi 9A Sport

redmi-9a-sport

Redmi 9A Sport स्मार्टफोनची सुरुवाती किंमत फक्त ६,७९९ रुपये आहे. ही किंमत फोनच्या २ जीबी रॅम + ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवू शकता. रेडमीच्या या फोनमध्ये ६.५३ इंच एचडी+ स्क्रीन दिली असून, यात फोटोग्राफीसाठी १३ मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तर पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोन MediaTek Helio G२५ सह येतो.

वाचा: Email Scams: इंटरनेटच्या जगातील सर्वात मोठा स्कॅम, लोकांनी गमावले तब्बल १८७ अब्ज रुपये; पाहा कसे?

​JioPhone Next

jiophone-next

कमी बजेटमध्ये येणारा JioPhone Next देखील तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. या फोनसोबतच तुम्हाला जिओच्या प्लान्सचा देखील फायदा मिळेल. या फोनला तुम्ही फक्त ४,५९९ रुपयात खरेदी करू शकता. फोन २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजसह येतो. यात फोटोग्राफीसाठी १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. तर पॉवर बॅकअपसाठी ३५०० एमएएचची बॅटरी मिळेल. JioPhone Next ला तुम्ही वेगवेगळ्या ईएमाय ऑफरसह देखील खरेदी करू शकता.

​Nokia C01 Plus

nokia-c01-plus

Nokia C01 Plus मध्ये ५.४५ इंच एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. यात फोटोग्राफीसाठी ५ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि तर फ्रंटला सेल्फी व व्हिडिओ कॉलिंगसाठी २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोन Unisoc SC९८६३A प्रोसेसर सपोर्टसह येतो. तर पॉवर बॅकअपसाठी ३००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोन २ जीबी रॅम + १६ जीबी स्टोरेजसह येतो. Nokia C01 Plus फोनला ६,२९९ रुपयात खरेदी करू शकता.

वाचा: Movies Download Website: ‘या’ ५ वेबसाइट्सवरून मोफत डाउनलोड करता येईल लोकप्रिय चित्रपट-सीरिज, एकही रुपये खर्च नाही; पाहा लिस्ट

​Lava X2

lava-x2

Lava X2 स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio A२५ प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. यात पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. लावाचा हा फोन ६.५ इंच एचडी+ आयपीएस डिस्प्लेसह येतो. यात फोटोग्राफीसाठी रियरला ८ मेगापिक्सलचा ड्यूल कॅमेरा दिला आहे. तर सेल्फी व व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. फोनमध्ये २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज दिले असून, याची किंमत फक्त ५,९९९ रुपये आहे.

​Tecno Pop 5 LTE

tecno-pop-5-lte

Tecno Pop 5 LTE स्मार्टफोन देखील कमी बजेटमध्ये येणारा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये ६.५२ इंच डॉट नॉच एचडी+ डिस्प्ले दिला आहे. तर पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. फोनमध्ये रियरला ८ मेगापिक्सल आणि फ्रंटला ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोन २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसह येतो. Tecno Pop 5 LTE फोनची किंमत ६,४९९ रुपये आहे.

वाचा: Mobile Plans : Jio चे ५०० रुपयांच्या बजेटमधील स्वस्त प्रीपेड प्लान्स, Disney+ Hotstar सह अनलिमिटेड कॉलिंग-डेटा फ्रीअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#सवसतत #मसत #७ #हजरचय #बजटमधय #मळतयत #ह #दमदर #फचरससह #यणर #समरटफनस

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

Most Popular

पाक तुरुंगात 682 भारतीय कैद, पाकिस्तानची कबुली

Indian Prisoner In Pakistan Jail: पाकिस्तानने शुक्रवारी सांगितले की, त्यांच्या तुरुंगात 682 भारतीय कैदी आहेत. भारत आणि पाकिस्तानने...

कन्हैया लाल हत्याकांडानंतर राजस्थान सरकारचा मोठा निर्णय, 32 IPS अधिकार्‍यांची बदल्या

Rajasthan IPS Transfer : उदयपूरमधील कन्हैया लाल हत्याकांडानंतर राजस्थानमधील वातावरण तापलं आहे. या घटनेनंतर राजस्थान सरकारनं मोठा निर्णय...

गर्लफ्रेंडसोबत खाजगी वेळ घालवणं सुपरस्टारला पडलं महागात, 10 वर्षाच्या मुलाकडून करोडोंचं नुकसान

मुंबई : जोडीदारासोबत वेळ घालवणं ही एका नात्यासाठी चांगली गोष्ट आहे. प्रत्येक नवरा-बायकोनं किंवा जोडीदारानं कामात कितीही व्यस्त असलं तरी एकमेकांसाठी वेळ नक्की...

दवबिंदू आरोग्यासाठी असतात फायदेशीर; अनेक त्रासांवर कसे उपयुक्त ठरतात वाचा

मुंबई, 01 जुलै : सकाळी सकाळी झाडे, फुले, पाने, हिरवे गवत यावर पडलेले दवबिंदू (Morning Dew) पाहून मन प्रफुल्लीत होते. असे म्हणतात की दवबिंदूंनी झाकलेल्या...

OnePlus कडून नवीन स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

मुंबई : वनप्लस या अँड्रॉइड स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीने OnePlus Nord 2T हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त बॅटरीसह अनेक फीचर्स...

काय आहे Vegan Diet करण्याचे फायदे? बॉलिवूड सेलिब्रिटींमध्येही आहे लोकप्रिय

मुंबई, 30 जून : आजच्या काळात प्रत्येकजण फिट राहण्यासाठी अनेक प्रकारचा आहार घेत आहे. वजन कमी करण्यापासून ते निरोगी शरीरापर्यंत शाकाहारी असण्याचे (Benefits Of Being...