Sunday, January 16, 2022
Home टेक-गॅजेट स्वत:ची Car घेण्याचं स्वप्न होईल पूर्ण, वाहन कर्ज घेताना या गोष्टी लक्षात...

स्वत:ची Car घेण्याचं स्वप्न होईल पूर्ण, वाहन कर्ज घेताना या गोष्टी लक्षात ठेवाच


नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : बहुतांश सर्वसामान्य लोकांची दोन स्वप्नं (Dreams) असतात. स्वतःच्या मालकीचं घर घेणं (Own House) आणि कार (car) घेणं. कार घेणं हे आपल्या देशात स्टेटस सिम्बॉलही मानलं जातं. प्रत्येकाला स्वत:कडील रोख रकमेद्वारे कार घेणं शक्य नसल्याने कार घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्था मदतीला येतात. यामुळे तुमची आवडती कार घेण्यासाठी तुम्हाला कर्ज (Loan) देतात. आपलं कारचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्ज घेताना काही बाबींची माहिती असणं आवश्यक आहे.

आपल्याला आपल्या कुटुंबासह आरामात प्रवास करता यावा याकरता कार(Four Wheeler) घेतली जाते. काहीवेळा कामासाठीही दूरवर जावं लागत असल्याने कार घेणं अधिक फायद्याचं ठरतं. सध्याच्या कोरोना साथीच्या संकटानेही सार्वजनिक वाहनातून गर्दीतून प्रवास करण्यापेक्षा स्वतःच्या वाहनाने सुरक्षित प्रवास करण्याची गरज अधोरेखित केली आहे. त्यामुळेही कार घेण्याकडे कल वाढला आहे. सर्वांना आपल्या उत्पन्नातून (Income) साठवलेल्या पैशातून कार घेणं शक्य नसतं. त्यामुळे बँका आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन कार घेण्याचं प्रमाण वाढलं. आजकाल गृहकर्जाइतकीच (Home Loan) मागणी वाहन कर्जाला (Auto Loan)असते. बँका, वित्तीय संस्थांकडून वाहन कर्ज देण्याचं प्रमाण मोठं आहे.

या वाहन कर्जाच्या सोयीमुळे अगदी कमी पैसे असतील तरीही कार घेण्याचं मोठे स्वप्न पूर्ण होऊ शकतं. बहुतेक बँका (Banks), वित्तीय संस्था (Financial Institutions) कारची मूळ किंमत अधिक कर वगैरे भरून जी ऑन रोड किंमत (On Road Price)होते, त्याच्या जवळपास 80 ते 90 टक्के रक्कम कर्जाऊ देतात. तर काही बँका किंवा संस्था अगदी 100 टक्केदेखील कर्ज देतात. यामुळे तुम्ही सुरुवातीला काहीही रक्कम म्हणजे डाउन पेमेंट न भरता तुमची आवडती कार घरी आणू शकता.

नवी कार घेताय? Car loan घेताना आवश्यक आहेत हे पात्रता निकष आणि कागदपत्रं

गृहकर्जाप्रमाणेच वाहन कर्जासाठी फिक्स (Fix) आणि फ्लोटिंग (Floating)असे दोन प्रकारचे व्याजदर (Interest Rate) उपलब्ध असतात. आपल्याला जो सोयीचा वाटतो त्यानुसार आपण कर्ज घेऊ शकतो. फिक्स म्हणजे निश्चित व्याजदराचा पर्याय घेतल्यास जितकं कर्ज घेतलं आहे त्यासाठीचा व्याजदर मुदत संपेपर्यंत एकच कायम असतो. तर फ्लोटिंग म्हणजे अनेकदा रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरणातील बदलांमुळे किंवा अन्य कारणांमुळे बँका वेळोवेळी व्याजदरात बदल करतात. त्या त्या वेळी बदललेल्या व्याजदरानुसार बँका कर्जावरील व्याज आकारतात. याचा फायदा कर्जदारांना होतो. त्यांचा कर्जाचा हप्ता म्हणजेच ईएमआय कमी होतो. अर्थात व्याजदर वाढल्यास वाढीव दराने व्याज द्यावं लागतं.

आजकाल कर्ज देताना क्रेडिट स्कोअरची (Credit Score) पडताळणी केली जाते. तसंच अनेक बँका त्यावर आधारित व्याजदर देतात. त्यामुळे स्वस्त कर्ज मिळण्यासाठी तुमचा क्रेडीट स्कोअर महत्त्वाचा ठरतो. याकरता तुम्ही आधी कर्ज घेतलं असेल तर त्याची परतफेड वेळेत केलेली असणं महत्त्वाचं असतं. तुम्हाला कसलाही दंड लागू झालेला नसेल हे महत्त्वाचं ठरतं.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गृहकर्जावर सबसिडी मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया

वाहन कर्जासाठी सर्वसाधारणपणे सात ते आठ वर्षे मुदत असते. त्यापेक्षा जास्त मुदत असल्यास कर्जाचा मासिक हप्ता कमी बसला तरी व्याजरूपाने अधिक रक्कम भरली जाते. तसंच या कर्जाचा व्याजदर 7 ते 9 टक्क्यांच्या आसपास असतो. प्रत्येक बँक आणि वित्तीय संस्थेचा व्याजदर वेगळा असतो. या कर्जासाठी जामीनदार असण्याच्या अटीबाबत प्रत्येक बँक आणि वित्तीय संस्थेनुसार फरक असतो. तसंच कर्ज मुदतीआधी फेडायचं असेल तर बँक काही शुल्क आकारते. त्याचा दरही प्रत्येक बँक आणि वित्तीय संस्थेनुसार वेगळा असतो.

Life Insurance Policy घेताना या गोष्टी लक्षात ठेवाच, होईल फायदा

18 ते 75 वर्षे वयापर्यंतची कोणतीही भारतीय व्यक्ती कर्ज घेऊ शकते. त्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न किमान 20 हजार असणं आवश्यक आहे. तसंच नोकरदार व्यक्ती असेल तर ती ज्या ठिकाणी काम करत असेल तिथले एक वर्ष काम करत असल्याचं प्रमाणपत्र देणं आवश्यक असतं.

देशातील बहुतेक बँका आणि वित्तीय संस्था वाहन कर्ज देतात. साधारण 7 ते 9 टक्के दराने कारच्या ऑन रोड किंमतीच्या 80 ते 90 टक्के रकमेचे 7 ते 8 वर्षे मुदतीने मिळणारे कर्ज सर्वोत्तम ठरतं. वाहन कर्ज अगदी सहजपणे आणि विना कटकट मिळतं. गृहकर्जाच्या तुलनेत हे कर्ज कमी असतं. ते बुडण्याचा धोकाही कमी असतो. कर्ज रक्कम कमी असल्याने हप्ताही कमी असतो. त्यामुळे भारतीय स्टेट बँकेसह आयसीआयसीआय, एचडीएफसी अशा सर्व बँका अगदी सहजपणे वाहन कर्ज देतात. तसंच अनेक वित्तीय संस्थाही कर्ज देत असल्यानं अनेकांना आपली आवडती कार घेण्याचं स्वप्न अगदी सहज आणि लवकरात लवकर पूर्ण करता येते.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#सवतच #Car #घणयच #सवपन #हईल #परण #वहन #करज #घतन #य #गषट #लकषत #ठवच

RELATED ARTICLES

Carrot Benefits | हिवाळ्यात गाजर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

 गाजर खाण्याचे (Carrot Benefits) अनेक फायदे आहेत.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

सक्तीच्या लसीकरणाचा निषेध असो! ‘या ‘देशातील जनता उतरलीय रस्त्यावर; वाचा सविस्तर

देशात सर्वांसाठी लसीकरण सक्तीचं असेल, असा कायदा सरकारने केला आणि त्याला विरोध करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

Wadha : आर्वीतील बहुचर्चित अवैध गर्भपात प्रकरणी डॉ. नीरज कदमला अटक

<p>राज्यभर गाजत असलेल्या वर्धामधील आर्वीतील बहुचर्चित अवैध गर्भपात प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आलीय. याप्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. रेखा कदम यांचे पती नीरज...

Most Popular

Tonga Tsunami : 30 वर्षातील सर्वात मोठा ज्वालामुखीचा स्फोट; जपानला त्सुनामीचा तडाखा!

टोंगामधील ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टी, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडलाही त्सुनामीचा इशारा देण्यात आलाय. (Photo : PTI) अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

टीम इंडिया कधीच कोणाचे उधार ठेवत नाही; ४८ तासात द.आफ्रिकेचा हिशोब चुकता केला

नवी दिल्ली: भारताचा क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या कसोटीत भारताचा पराभव झाला आणि टीम इंडियाने कसोटी मालिका...

रविवार विशेष : पराभवानंतरचा पंचनामा!

ऋषिकेश बामणे दक्षिण आफ्रिकेतील सर्वात लहान उंचीच्या तेम्बा बव्हुमाने विजयी चौकार लगावला आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघावर मोठी नामुष्की ओढवली. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड...

माझ्याविरोधात मोठं कटकारस्थान रचलं जातंय…किरण मानेंचा निर्मात्यांवर गंभीर आरोप

मुंबई: सोशल मीडियावर विविधांगी भूमिका घेतल्यानं अभिनेते किरण माने यांना 'मुलगी झाली हो' या मालिकेतून काढण्यात आलं आहे. या घटनेचे पडसाद आता सोशल...

ईशा गुप्ताने ब्रालेस फोटोशुटनंतर बेडरूमधील टॉपलेस फोटो केला शेअर

मुंबई, 15 जानेवारी - बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताला (Esha Gupta) काही दिवासापूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. मात्र याहीपेक्षा ती सध्या तिच्या बोल्ड फोटोशुटमुळे...

कसोटी नेतृत्व सोडण्याची हीच योग्य वेळ कोहली

पीटीआय, केप टाऊन गेली सात वर्षे भारतीय कसोटी संघाला मेहनत, अथक परिश्रम आणि चिकाटीच्या बळावर प्रगतीच्या दिशेने नेल्यानंतर आता थांबण्याची वेळ आली आहे, अशा...